खिशात पैसा आहे पुर्वीचा वारसा आहे, जवळ पदव्यांची मालीका आहे. समाजाला आवळा देऊन कावळा गोळा करावयाचा आहे. अशी काही असतात परंतू अशी ही काही आहेत की त्यांना असे वातावरण मिळाले नसते. समाजाचा पैसा, प्रतिष्ठा ही समाजासाठीच उपयोगी आली पाहिजे. आणि या साठीच आपला जन्म झाला आहे ही खुणगाठ उरात बाळगुन वावरत आसतात आपलं गाव नव्हे तर महाराष्ट्र कावेत घेऊन उभे असतात. आयुषयभर चालत आसतात तेंव्हा आशा बांधवांना आपण आपले म्हणतो असे एक नेतृत्व महाराष्ट्राला पुण्याने दिल ते नम्र आहे, विनम्र आहे. पण तत्व विचारप्रणाली, समाज हित यासाठी जेवढे सहनशिल आहे तेवढेच समाज इतिहासाठी कुठे ही वाकणार नाही उलट त्याच हितासाठी एक वेळ मोडेल पण वाकणार नाही ही प्रणाली गेली ८० वर्ष राबवणारे महाराष्ट्राचे कर्तुत्व व नेतृत्व म्हणजे श्री. अंबादास शिंदे होत.
वडील कै. बाबुराव शिंदे यांच्या पुण्याच्या रविवार पेठेत तेलबिया गाळप व विक्रीचा व्यवसाय घरात २/३ तेलघाणी या घाण्यावर घरची व मजुरीची माणसे राबत. तयार झालेली तेल व पेंड विक्री साठी दुकानदारी ही होती. व्यवसाय मुळे बाबुराव शिंदे वरवंड ता दौंड येथे ते काही काळ होते. याच छोटेखानी गावात श्री. अंबादास शिंदे यांचा जन्म झाला. पण जन्मानंतर वउीलांचे वास्तव्य पुण्याच्या रविवार पेठेत सुरू होते. याच ठिकाणी ते लहानाचे मोठे होत होते. याच ठिकाणी बागडत होते. याच ठिकाणी शाळेत जात होते. शाळेत जात असताना घर कोलमडू लागले. कवळ्यावयात आभाळ कोसळले. घर पुर्ण पणे उध्वस्त झाले. काही कळावे, काही शिकावे, काही बनावे आसे हे वय या वयात स्वत:चे शिक्षण, स्वत:चे दोन वेळचे जेवण सोबतच्या बहिनींची जीवन घडविणे हे सर्व करताना उध्वस्त घर सोबतीला पुढे आयुष्यभर ते आसे का वागले. त्यांच्या जवळ सत्य, सेवा व पिळवणुक प्रवृत्तीला आळा ही ठेवण जी घडली ती याच काळात. दोन वेळचे जेवन व बहिणींचे संगोपन करिताना त्यांना माणूस वाचता आला. समाज समजु शकला, गरिबींचे असाहाय्य चटके जीवनाच्या प्रत्येक दिवसाला नवे शिक्षण देत होते. श्री. शिंदे हे गप्पांच्या आेघात सांगून गेले. घरावर आभाळ कोसळले म्हणुन मी पुढील आयुष्यात, विचाराचा पाईक झालो. विचारांची तोडफोड केली नाही. आणि कोण करीत असेल तर सर्व शक्ती नुसार उभे राहिलो हे ते मान्य करतात. कारण इतकी प्रखर वास्तवता ते बालवयात अनुभवलेले पारंपापारीक व्यवसायाला आलेली निंद्रा त्यात भांडवल नाही. घरात कर्ता नाही. रविवार पेठेत त्यांनी भाजीचा व्यवसाय सुरू केला. जवळच्या मंडईतुन भाजी अणावयाची ती सकाळ दुपारी विकुन कसे तरी घर चालवायचे या जीवनाच्या झगड्यात २ वर्ष गेली. पुन्हा बेकरी व्यवसाय सुरू केला. जम बसवावा तर जवळ भांडवल नाही. भांडवल नसल्याने स्पर्धेत टिकाव धरता येणार नाही घर चालले पाहिजे घरातील लहान बहिणी शिक्षित झाल्या पाहिजेत त्यांची लग्न झाली पाहिजेत या साठी पैसा पाहिजे या तुटपुंज्या भांडवलावरील पैशात तुंटपुंजा पैसा येतो तेंव्हा कायम स्वरूपी नोकरी हवी म्हणून तेे धडपडत असताना त्यांना ऑमुनेशन फॅक्टेरीतील नोकरी मिळाली तेथे ते युनियनचे कामगार नियुक्त पदाधीकारी झाले आपल्या कार्य काळात त्यांनी सोबतच्या कामगारांचे प्रश्न सोडवले.
वयाच्या दहाव्या वर्षी अभाळ कोसळलेले मायेची उब संपलेली इंदोरी ता. मावळ येथील भागवत त्यांचे मामा चुलते यांच्या बरोबर हे सुदुंबरे येथील पुण्यतिथी साठी जात. समाजिक प्रक्रियेत सहभागी होत. वयाच्या १० व्या वर्षी प्रथम तेथे गेले आणि इथे स्वत:चे जगण्याचे प्रश्न सोडवता सोडवता तेली समाज काळजाच्या सात कप्यात तेली पण. संताजी मन कोरले गेले . तो उमेदीचा काळ होता. या काळात स्वयंसेवक पथक आसे. पुणे येथे धान्य गोळा गरणे. कधी बैलगाडीने किंवा मोटारीने ते सर्व साहित्य सुदुंबरे येथे नेहणे. येथे गेल्यावर झुडपे उपटने स्वच्छता करणे तंबू ठोकणे पिण्याच्या पाण्याची सोय करणे महाप्रसाद बनविण्यास सहकार्य करणे, उत्सव अध्यक्ष व उद्घाटक यांना वाजत गाजत फाट्या पासून मंदिरात आणने ही कामे स्वंय सेवकांची आसत श्री. शिंदे हे त्यात सहभागी होत आसत एक स्वयंसेवक म्हणुन हिररीने भाग घेत. यामुळे शंकराव करपे, रावसाहेब पन्हाळे, विष्णूपंत शिंदे रमकांत दिवटे यंाचा संपर्क आला. या संपर्कातून समाज कार्याचे धडे ते गिरवू लागले. सत्य प्रामाणिक पणा व स्पष्ट बोलणे ही प्रणाली याच ठिकाणी तयार झाली.
समाज म्हणजे समाज आसतो. उच्च नीच हा भेद नसतो. गरिब श्रिमंत हा विचार नसतो विचार प्रक्रियेत वयाचे बांधन नसते. समानता हा पाया म्हणजे समाज असतो. श्री. संत संताजींनी पंढरीचा पांडुरंग निवडला तो समतेचा पुरस्कृता होता म्हणून याच संताजींच्या विचाराचा धागा समाजाने पकडलेला या समाजाच्या संस्थेत या समाजाच्या विचार सभेत सामील असताना जे पटणार नाही ते स्पषट मांडणे ही अंबादासजी जीवणप्रणाली कै. पांडूरंग धोमकर समाज अध्यक्ष असताना समाजाची वास्तू ही पुरग्रस्थांचे मदत केंद्र होते. यावेळी कै. धोमकर, कै. विठ्ठल प्रधान कै. बाबुराव रोकडे, कै. आनंत व्हावळ, कै. बा. ना केदारी, कै. धोंडीराम चोथे, कै. पुरूषोत्तम व्हावळ या मंडळी बरोबर मदत कार्य करीत होते या वेळी पुरग्रस्त वधु वरांची लग्न ही त्यांनी लावली.
गोरगरिब व सामान्य बांधवांची भुमीका ते घेऊन ते संचार करीत. ज्यांच्या घरात साधी लाईट नाही त्या घरांचे ते आण्णा झाले. त्यांच्या प्रश्नासाठी, त्यांच्या सुखात, त्यांच्या दु:खात ते सामील होत. म्हणुन या सर्वानी त्यांना आण्णा ही पदवी प्रेमाने बहाल केली. या प्रेमा पोटीच ते समाजाचे लोकनीयुक्त सेक्रेटरी ही झाले. याच काळात विवाह सुचक मंडळ स्थापन झाले., याच काळात घसोटी पुलाला श्री. संत संताजी जगनाडे नाव मिळाले. सुदुंबरे संस्थेची एक मिटींग होती. संस्थेने घटना समिती नेमली होती. समितीने बरेच चांगले बदल केले होते. सर्व बदल मंजूर करण्यासाठी कार्यकारणीची मिटींग वाघोली येथे आयोजित केली होती. यावेळी काही बदला बाबत शिंदे यांनी तिव्र प्रतिक्रीया व्यक्त केली. ते एकटे विरोधात होते. तो विरोध असतानाही आहे तसे ठराव मंजूर झाले एकमताने घटना दुरूस्ती असे सांगितले परंतु श्री. शिंदे यांनी एकमताला कडकडून विरोध बहुमताने मंजुर झाले असा ठराव करावयास लावला.
त्यांच्या ध्यानी मनी नसताना श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली संस्था सुदुंबरे या संस्थेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी आली या पुर्वी काही दिवस गोंधळी वातावरणा होते. आशा बिकट परस्थितीत त्यांनी अध्यक्षपद स्विकारले. धर्मकारण व समाजकारण ही विचाराची बैठक पुर्वजांनी निर्माण करून वाढवलेली तीच पद्धत सुरू ठेवली राजकारण, अर्थकारण व समाजाकरण ही तेली महासभेची बैठक. या दोन्ही समाज संस्थेत समन्व्य साधुन जो सर्वाचा सर्वगटांचा, सर्व पक्षांचा म्हणजे समाजाचा भव्य महामेळावा झाला. तो यांच्याच काळात. स्वागताची, महाप्रसादाची जबाबदारी संस्थेकडे आली. लाखो बांधव एकाच वेळी पुण्यतिथीला येणे हा इतिहास घडवायचा होता. या लाखो बांधवाना महाप्रसाद देण्यास संस्थेकडे पैसा ही नव्हता. तंव्हा आण्णा सोबत्यांना घेऊन फिरू लागले. बांधवांकडे ते जात उपस्थीत बांधवांना आण्णा दिसताच विचारणा करित. आगदी अपेक्षा असेल तेवढी देणगी किंवा वस्तू मिळत परंतू मंचर येथिल मेहेर यांना विचारणा केली. आम्हाला तेल ८० डबे हवेत आपण किती द्याल. मेहेर काहीच बोलले नाहीत. फक्त घरात जा्न आले व इतर गप्पा मारू लागले रात्री १० वाजले जेवण झाले तरी गप्पा सरेनात शेवटी आण्णा म्हणाले निदान १० डबे तरी तेल द्या तेंव्हा मेहेर म्हणाले तुम्ही ४ तासा पुर्वी मागणी केली तेंव्हाच ८० डब्यांचा ट्रक सुदूंबर्यात गेलाय. ही किमया संताजींची तसेच श्री. अंबादास शिंदे यांच्या कार्याच्या विश्वासाची ठेव किमान ४ लाख बांधव तेथे एकत्र आले न भुतो असा मेळावा झाला कै. रावसाहेब केदारी व सहकारी २० बांधवांनी उपस्थीत राहून सुरू केलेल्या उत्सवाला यांच्या काळात ४ लाख बांधवांच्या उपस्थीचे गोंडस फळ आले. शासनाकडे व संबंधीत राजकीय मंडळीकडे पाठपुरावा करून मंदिर बांधकाम व सभा मंडपाचे स्ट्रक्चर उभे करून घेतले.
शर्ट, लेंगा, पायात चप्पल डोक्यावर टोपी व गळ्यात कापडी पिशवी. कपड्यांना इस्त्री असतेच असे नाही या वेशात घराला कुलूप लावतील बाहेर गेलेले आण्णा कधी येतील याचा भरवसा नाही. घरात काय तर गरजेच्या वस्तु उत्पन्न काय तर मिळणारे शासकीय निवृत्ती वेतन. हे असे सामान्य जीवन जगणारे. परंतू वाटचालीत जेंव्हा तफावत सुरू होते तेंव्हा अण्णा राजकीय पद, घोडा गोड्या, वार्याच्या वेगाच्या गाड्या संभाळणारे किंवा मी पैसा वाला आहे. माझ्या शब्दावर सर्व नाचतात तुम्ही नाचा म्हणनारे पैसा व मनगट वाले समोर येताच हेच आण्णा मोडतील पण वाकणार नाहीत. समाज हीता साठी, इनाम सोडणार नाही. मी आर्थीक गरिब आहे. परंतू ज्या संताजींनी शब्दांची शस्त्रे करून इतिहास घडविला संताजींचा विचार वंश असल्याने पदासाठी सत्ते साठी तत्व सोडणार नाही ही ओळख त्यांनी अनेक वेळा दाखवली यातुनच एक सर्व सामान्यांचे नेतृत्व महाराष्ट्राने अनुभवले.
श्री. आण्णानां तिन मुली व मुलागा त्यांची पत्नी ह्या करपे घराण्यातील. श्री. शिंदे यांचे पुर्ण जिवन समाजा साठी खर्च केलेले त्यांनी आपल्या आयुष्याचे सर्व क्षण स्वत:साठी खर्च केले आसते. किंवा समाजाच्या मिळालेल्या सत्तेचा वापर स्वहितासाठी केला आसता तर ते आज एक आर्थिक बलवान म्हणून समोर आले आसते. परंतु त्यांनी तसे नकरता समाजासाठी राबले व राबतात ८१ वर्षातही ते त्याचं जिंद्दीने वावरतात त्यांना हार्दीक शुभेच्छा.
शब्दांकन मोहन देशमाने