महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती तर्फे गुणवंत विद्यार्थी व करियर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती तेली समाज च्या वतीने रविवार दिनांक 15/07/2018 रोजी दुपारी 12 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती येथे करियर मार्गदर्शन व गुणवंत विध्यार्थी व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रजवलीत करून श्रीसंत संताजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. सर्व प्रथम नवनिर्वाचित मा. आमदार रामदासजी आंबटकर यांना समाज भूषण पुरस्कार देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शंकरराव हिंगासपुरे यांचे हस्ते समाजबांधवांचे वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर मा. आमदार रामदासजी आंबटकर , शंकरराव हिंगासपुरे , सुनीलभाऊ साहू , संजयभाऊ मापले , संजयभाऊ तिरथकर, संजयभाऊ शिरभाते, संजयभाऊ हिंगासपुरे, श्रीकृष्णराव माहोरे , विजयभाऊ शिरभाते, किरणताई गुलवाडे , प्रतिक पिंपळे , सागर शिरभाते , नगरसेविका स्वातीताई जावरे , नगरसेविका निताताई राऊत, नगरसेविका कुसुमताई साहू , राविभाऊ खांडेकर , जयंत आमले , दीपक गिरोलकर , प्रविण भस्मे , प्रकाशजी मंजेलवार , पंजाबराव तायवाडे, राजुभाऊ हजारे , सुगंचंदजी गुप्ता आदी मान्यवर मंडळी उपस्थि होते .त्यानंतर प्रा. आशीष तरार यांचे करियर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. खासदार रामदासजी तडस यांचे स्वागत त्यांचे हस्ते विभागीय अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शंकरराव हिंगासपुरे यांचा सत्कार घेण्यात आला . प्राध्यापक संजयभाऊ तिरथकर , प्राध्यापक संजयभाऊ शिरभाते , प्रविण भस्मे यांचाही सत्कार शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन मा. खासदार रामदासजी तडस यांचे हस्ते करण्यात आला .
या प्रसंगी मा. खासदार रामदासजी तडस , मा. आमदार रामदासजी आंबटकर , मा. आमदार सुनीलभाऊ देशमुख , मा. आमदार राविभाऊ राणा यांनी उपस्थित समाजबांधव व विध्यार्थी यांना समाज व सामाजिक बांधिलकी , राजकारण व समाजकारण , शिक्षण या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय महासचिव संजयजी मापले यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.धोटे सर यांनी केले आभार प्रदर्शन प्रा.संजय शिरभाते यांनी केल यावेळी तेली समाजातील अनेक मान्यवर मंडळी , समाजबांधव , विध्यार्थी व पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता खालील समाज बांधवांनी अहोरात्र मेहनत घेतली सुनील साहू , विजय शिरभाते , दीपक गिरोलकर , प्रतिक पिंपळे , सागर शिरभाते , वैभव बीजवे, सुनील चौकडे , सुधीर माहोरे , कुशल बीजवे , देवानंद ईचे , अमोल आगाशे , संजय ढोले , शंकरराव नाचनकर , अविभाऊ जसवंते , अविभाऊ देउलकर , सचिन फणसे , योगेश मावळे त्याबद्दल त्यांचा मा. खासदार रामदासजी तडस साहेब यांचे हस्ते गौरव करण्यात आला