पुण्या परिसरातील पवार पुण्यात व्यवसायाने स्थीर झाले. आपला व्यवसाय संभाळत ते समाज कार्यात उभे राहिले ते दोन वेळा ८२ भवानी पेठे येथिल तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष होते. समाजाच्या कार्या बरोबरच त्यांचे इतर सामाजीक कार्य पुण्याचे वैभव म्हंटले तर योग्य ठरेंल स्वारगेट जवळील रेखीव नगर म्हणुन सुभष नगर म्हणून संबोधले जाते. त्याची उभारणी त्यांनी केली. पुणे सातारा रोड वरील आदर्श सोसायटी राजश्री शाहू सोसायटी ही त्यांचीच धडपड. या ठिकाणी नव निर्मीती करिताना त्यांनी समाज बांधवांना पहिली पसंती दिली त्यामुळे तिन ही ठिकाणी आज किमान १०० समाज बांधव वास्तव्य करून आहेत. आरक्षणाचे जनक म्हणुन राजश्री शाहू महाराज ओळखले जातात. यांच्या नावे एक बँक स्थापन करण्याची हालचाल सुरू झाली. बहुजन समाजातील दुर्बल घटक ही खरी धडपड होती. पवार संस्थापक सदस्या पैकी एक होते. बँकेत सेवक भरती पासून बँकेचा लाभ समाजातील घटकांना झाला पाहिजे ही त्यांची भुमीका होती ती त्यांनी निभावली सुद्धा त्यामुळे आज पर्यंत समाज बांधव या प्रगतीशील बँकेचे संचालक म्हणुन कार्यरथ आहेत बहुजन समाजात आपण तेली असुन ही आपल्या बुद्धीच्या बळावर आपला ठसा उमटवू शकतो हे त्यांनीसिद्ध केले. मराठा समाजाच्या विविध शैक्षणीक संस्था उभारणीत व व्यवस्थपनेत त्यांनी क्रियाशील सहभाग घेतला समाजातील अनेक त्याच्या त्यागा मुळे सहकार्या मुळे हे बरे दिवस आले आसे काही लाभार्थी नम्र पणे सांगतात. हि कै. ऍड. गोविंदराव पवरांची खरी धडपड आहे.