धोम ता. वाई, जि. सातारा येथील देशमाने पुण्यात आले. आणि सर्वांचे धोमकर झाले. शिक्षण बेताचेच जगण्याच्या धडपडीत ते उमेदवारी करित होते. नव ज्ञान आत्मसात करावे हा छंद चुणचुणीत व हुशार म्हणुन कै. केशवराव भगत यांच्या संपर्कात आले यांच्या जवळ त्यांनी समाजकारण व्यवसायीक बाबत धडे गिरवले चिवट झुंज देऊन ते एक मेकॉनिकल म्हणुन वावरू लागले. स्वारगेट जवळ खडकमळा आळी जवळ आपला व्यवसाय सुरू ठेवला. जवळ शुन्य होते परंतू कमविलेले ज्ञान, प्रामाणिक पणा या बळावर त्या क्षेत्रात पांडबा मिस्त्री नाव कमविले. माल ट्रकचे इंजिन, मालट्रकचे पाटे यांचे काम खात्रीशीर हवे असेल तर पुणे येथे पांडवा मिस्त्री या शिवाय कोण नव्हते ही त्यांची त्यांच्या व्यवसायातील ठेवण होती. आपण कष्टातून ज्ञान घेतले आपण समाज बांधवांच्या सहकार्यातून उभे राहिलो हे प्रत्येक पाऊलाला जपत असत. याच मुळे अनेक समाजाचे युवक त्यांच्याकडे त्याच्या वर्कशॉप मध्ये काम करित. नुसते काम न करता त्यांनी मशनरीचे ज्ञान घ्यावे ही त्यांची ठेवण होती. याच मुळे बरेच समाज बांधव त्यांच्याकडे प्रशिक्षीत झाले यातील बरेच जण याच क्षेत्रात उभे राहिले व जीवनापत यशस्वी ही झालेले आपल्याला दिसून येतात.
कै. केशवराव भगतांच्या जवळ असल्याने त्यांना समाजाचा ओढा होता. याच मुळे ते लोकशाही मार्गाने समाजाचे अध्यक्ष ही झाले. यासाठी कै. आप्पासाहेब भगत, कै. विष्णूपंत शिंदे कै. जगन्नाथ व्हावळ यांनी साथ सोबत दिली. यांच्याच कार्यकाळात १९६१ मध्ये पुणे येथे महापूर आला या महापूरात शेकडो कुटूंबांचे संसार उध्वस्त झाले. घरेदारे जमीनदोस्त झाली. आशा वेळी धोमकर यांनी अध्यक्ष म्हणून पुढाकार घे्न समाज कार्यालयात आसरा दिला. पुरग्रस्तांना मदत केंद्र सुरू केले. या मदत कार्यात धोमकर यांना कै. रघुनाथ चिंचकर, कै. विष्णु लक्ष्मण शिंदे, कै. जगन्नाथ वहावळ, कै. पुरूषोत्तम वाव्हळ, कै. अमृतराव कर्डीले, कै. आनंतराव वाव्हळ, श्री. अंबादास शिंदे, बाबुराव रोकडे आशा मंडळींनी सहकार्य ही केले. जवळ जवळ १२ वर्ष ते समाज अध्यक्ष होते. इतका प्रदिर्घ काळ त्यांना मिळाला होता. या सर्व काळात त्यांचे उल्लेखनीय कार्य म्हणजे पुरग्रस्त समाज बांधवांना मदत केंद्र चालु ठेवणे. अंदाजे वर्षभर ते चालवले. याच मदत केंद्रात जे पाचशे समाज बांधव रहात त्यातील अनेकांची लग्न त्यांनी जमवून तेथेच लावून ही दिली.
कै. अनंत धोमकर हे त्यांचेे चिरंजीव हे सुद्धा समाज कार्यात असत ते समाजाचे विश्वस्त होते. कै. पांडुरंग धोमकर यांच्या सुन श्रीमती मंगल अनंत धोमकर ह्या दानशुर गर्जुनशेठ बरडकर यांच्या कन्या. धोमकर झाल्या नंतर संसार संभाळत. महिलांनसाठी सेवाभावी संस्था चालवितात त्या पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडी उपाध्यक्ष आहेत.
सामान्य कुटूंबात जन्मलेले कै. पांडुरंग धोमकर हे समाजकारणी होते त्यांनी समाज कार्या बरोबरच आपल्या परिसरातील अनेक मंडळे व संस्था सहभाग घेऊन उत्कृष्ट समाज कार्य केले. त्यांच्या स्मृतीस अभिवादन.