जय संताजी प्रतिष्ठान जिल्हा बीड तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे अध्यक्ष माननीय आमदार जयदत्त (आण्णा ) क्षीरसागर, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय घटनेचे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र विधानसभा आहेत. कार्यक्रम सोमवार दिनांक 2/7/2018 रोजी दुपारी साडेबारा वाजता स्थळ माजलगाव मठ, स्व. सोनाजीराव क्षिरसागर सभागृहाजवळ, रविवार पेठ बीड येथे. तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या शुभहस्ते बीड जिल्हा तेली समाजातील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी वैद्यकीय अभियांत्रिकी पदवीधारक व राष्ट्रीय व राज्य पातळीवर प्रमाणपत्र प्राप्त खेळाडूंचा गुणगौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सदर कार्यक्रमात तेली समाजातील सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक जय संताजी प्रतिष्ठान जिल्हा बीड यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade