श्री शनैश्वर फौंडेशन मुंबईच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत संस्थेतर्फे एकूण रुपये १,१०,००,००० (रुपये एक कोटी दहा लाख) पेक्षा जास्त रकमेचे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्वारे वितरण केले आहे. गेल्या वर्षी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा हा संकल्प पूर्ती सोहळा म्हणून साजरा करण्यात आला होता. रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रुपये १ कोटीचा संकल्प करुन कायम शिक्षण निधी गोळा करण्यात आला. आपल्या सर्वांच्या विश्वासामुळे, सहकार्यामुळे व आशिर्वादाने १ कोटी २५ लाख रुपयांचा शैक्षणिक कायम निधी उभारण्यात आम्हाला यश मिळाले. व त्याच दरम्यान महाराष्ट्रभर पसरलेल्या समाजातील ४०० पेक्षा जास्त विद्याथ्र्यांनी हि शिष्यवृत्ती घेवून आपले व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.
मागील वर्षाच्या शैक्षणिक कालावधीत काही दुःखद घटनांना सुध्दा सामोरे जावे लागले. दि. २३ डिसेंबर २०१७ रोजी जम्मू काश्मिर मधील राजोरी जिल्हयात नियंत्रण रेषेवरील शत्रूच्या गोळीबारात भंडारा जिल्हयातील पवनी येथील मेजर प्रफुल्ल अंबादासजी मोहोरकर, या आपल्या समाजातील वीरपुत्रास हौतात्म्य प्राप्त झाले. त्यानंतर दि. ३०डिसेंबर २०१७ रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग या ठिकाणी पालघर जिल्हयातील विरार येथील आपले दुसरे वीरपुत्र मेजर प्रसाद गणेश महाडीक यांनाही वीरमरण प्राप्त झाले.
या दोन्ही लष्करी अधिकाऱ्यांनी देशाच्या संरक्षणासाठी आपले कर्तव्य पार पाडत असताना प्राणार्पण केले. फौंडेशनने या दोन जवांनाच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत असतानाच त्यांच्या असीम कर्तुत्वाची व त्यागाची गाथा समाजातील सर्वांना स्फूर्तीदायक ठरावी यासाठी फौंडेशनच्या वतीने समाजातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना या शूरविरांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्त्या जाहिर केल्या आहेत. या दोन्ही शूरविरांच्या कुटुंबियांनी मोठ्या मनाने आपले दुःख आवरुन या उपक्रमास आशिर्वाद दिले आहेत. आम्ही त्यांचे ऋणी आहोत.
या वर्षी महाराष्ट्राच्या विविध भागातून २०१८-१९ च्या शैक्षणिक वर्षाकरिता खालील प्रकारच्या शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. १. प्रतिवर्षाप्रमाणेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, व्यवस्थापन शास्त्र इ. व्यावसायिक
अभ्यासक्रमांसाठी निवड झालेले विद्यार्थी. 2. केंद्रीय लोक सेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या Common Enterance Exam for India Services साठी IAS, IPS इ. उच्चश्रेणीच्या पदासाठी होणाऱ्या, प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होवून अंतिम निवडीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार, 3. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यस्तरीय प्रथम श्रेणीच्या (Deputy Collector, Dy. S. P. Dy. Registrar इ.) प्राथमिक परीक्षांतील उत्तीर्ण विद्यार्थी. भौतिक (Physics), रासायनिक (Chemistry), गणित (Mathematics) यासारख्या मूलभूत विषयांत पदव्यूत्तर (M.Sc./M.A.) अथवा संशोधनात्मक (Ph.D.) अभ्यासक्रम स्विकारणारे विद्यार्थी. 4. चार्टर्ड अकांग्टंट (C.A.), कॉस्ट अकांटंट (ICWA), चार्टर्ड फायनान्स अॅनालिसीस्ट (C.E.A.), कंपनी सेक्रेटरी (C.S.), ह्यूमन रिसॉर्सेस डेव्हलपमेंट (H.R.D.), इ. अभ्यासक्रमांची निवड करुन त्यांची प्राथमिक चाचणी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. । महाराष्ट्रातील ख्यातनाम महाविद्यालयांत कमर्शियल आर्टस्, फाईन आर्टस, इ. च्या विविध शाखांत प्रवेश मिळवून या विषयातील पदवी / पदविकांचा अभ्यासक्रम स्वीकारलेले विद्यार्थी.
प्रतिवर्षी प्रमाणे वरील विषयांपैकी क्र. १ द्वारे येणाऱ्या अर्जाची छाननी करुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांस वार्षिक रु. १०,०००/- (रुपये दहा हजार) या प्रमाणात शिष्यवृत्ती दिली जाईल व त्या विद्यार्थ्याने आपला शैक्षणिक स्तर समाधानकारक राखल्यास त्याला, त्याने स्वीकारलेल्या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाईल. क्र. २ ते क्र. ६ मध्ये निर्देशिलेल्या अभ्यासक्रमासाठी आलेल्या अर्जाची छाननी झाल्यानंतर त्यांनी निवडलेला अभ्यासक्रम/अभ्यास यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी, त्यासाठी लागणारी आर्थिक गरज व अर्जदार विद्यार्थ्यांची आर्थिक निकड या सर्व बाबींचा फौंडेशनच्या शिक्षण तज्ञांकडून व मार्गदर्शकांकडून विचार विनिमय करुन शिष्यवृत्तीची रक्कम व कालावधी निश्चित केला जाईल व सदर रक्कम निवडलेल्या विद्यार्थ्यांस देण्यात येईल.
सदर निवड ही फौंडेशनच्या शैक्षणिक समितीमार्फत आजवर निःपक्षरित्या केली गेलेली आहे व यापुढेही केली जाईल तसेच समितीचा निवडीबाबतचा निर्णय अंतिम समजून त्याप्रमाणे शिष्यवृत्ती वाटपाची कार्यवाही केली जाईल. सदर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या पत्त्यावर स्वतःची संपूर्ण माहिती, पत्रव्यवहाराचा पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक व ई-मेल अॅड्रेस इ. लिहून पाठविल्यास त्यास शिष्यवृत्तीसाठीचा अर्ज विनामूल्य पाठविण्यात येईल. अर्जाची प्राथमिक छाननीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी काही केंद्रावरुन On line video conferencing द्वारे संपर्क साधून प्रत्यक्ष मुलाखत घेण्याचा मानस असून, त्यानंतर अंतिम निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक विद्याथ्र्याने अर्जात नमूद केलेल्या जागेत स्वतःचा दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अॅड्रेस इ. सविस्तर माहिती देणे अत्यावश्यक आहे. प्राथमिक चाचणीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी याबाबत संपर्क साधून, त्यांची मुलाखत घेतल्यानंतरच अंतिम निवड केली जाणार आहे याची प्रत्येक अर्जदाराने जाणीव ठेवावी.
फौंडेशनच्या आजवरच्या वाटचालीस आपले मार्गदर्शन, सहकार्य, विश्वास व आर्थिक सहभाग याच्या पाठींब्यामुळे आम्ही हे पार पाडू शकलो याची आम्हांस नम्र जाणीव आहे. सर्व देणगीदारांस आयकर नियम 80 G च्या तरतूदीनुसार करमाफी मिळते याची अवश्य नोंद घ्यावी तसेच आपल्या परिसरातील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपल्या विभागातील गरजू विद्यार्थ्यांस या शिष्यवृत्ती योजनेची माहिती जरुर द्यावी, ही विनंती करीत आहोत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०१८ आहे याची नोंद घ्यावी.
हे सर्व कार्य आम्ही केले असे म्हणण्यापेक्षा आपल्या विश्वासामुळे, असंख्य देणगीदारांमुळे, आमच्या हितचिंतकांच्या श्रमांमुळे शक्य झाले असे आम्ही मानतो. हा जगन्नाथाचा रथ आपल्यासारख्यांच्या आशिर्वादाने व सहकार्याने असाच सतत पुढे जात राहो. याहून महत्वाचे म्हणजे आमच्या सुशिक्षित, व्यावसायिक क्षेत्रातील प्रशिक्षित विद्यार्थ्यांन मधून उद्याचे जोमदार समर्थ सामाजिक नेतृत्व तयार होत आहे. युवा मंचाच्या माध्यमातूनही मुले पुढे येत आहेत. पुन्हा एकदा आपण आमच्याशी विश्वासाने सहकार्य करा असे आवाहन करीत आहोत. आपला लोभ,विश्वास, प्रेम आहेच, तो वृध्दिगंत होईल याची खात्री बाळगतो ! धन्यवाद!! शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्याचा व अर्ज भरुन पाठविण्याचा पत्ता श्री शनैश्वर फौंडेशन, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना द्वारा: श्री प्रभाकर संतु कोते- विश्वस्त बी/२६, श्री सतगुरु को-ऑप. हौ. सोसायटी, ९० फूट रोड, भांडूप गांव, भांडूप (पूर्व), मुंबई ४०० ०४२. भ्रमणध्वनी : ९८२१४ ३१७१८