- विष्णु गरूड,
प्रवक्ता आर.पी.आय. ओबीसी सेल महाराष्ट्र
हिंदू धर्मा तील वर्णव्यवस्थेमध्ये गाव गाड्यातील बारा बलुतेदार हा खर्या अर्थाने आज ही गाव गाड्याच्या कारभारात गावातील राजकिय पुढार्यांकडून दबावाखाली समाजिक - राजकिय जीवनात जगत आहे. तोच प्रकार शहरी भागातही आज मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळतो. जे ओबीसी कार्यकर्ते सामाजिक निष्ठा ठेवून काम करत आहे. त्यांना हा अनुभव वेळोवेळी येत आहे. हिंदु धर्माच भूत ओबीसींच्या मानगुटीवर बसवणार्या दोन सवर्ण जाती एक क्षत्रीय व दुसरी ब्राह्मण या इतिहास काळापासुन ते आजपर्यंत ओबीसींच्या राजकीय - सामाजीक - शैक्षणिक हक्कासाठी कधीही पुढाकार घेत नाही हे वास्तव आज ओबीसींनी अधोरेखित केले पाहिजे. जो ओबीसी या समाज घटकातील सवर्ण मंडळी च्या कारभारात ढवळाढवळ करणार नाही. त्यांच्या हाकेला हजर राहिल त्या सवर्णांच्या बरोबर आपली पोळी भाजून घेऊन त्या सवर्णांबरोबर राहील अशा ओबीसींच्या कार्यकर्त्याला राजकीय पक्षातील सवर्ण दलालांनी ओबीसींचा नेता म्हणून विविध पक्षात (राजकीय) ओबीसीं चे मुखवटे उभे केले. या मुखवट्यांनी मग जातीच्या वधुवर मेळाव्यात जाऊन आपल्या सवर्ण नेत्याची दलाली करून आमचा नेता - आमचा पक्ष ओबीसींसाठी काय काय करतो हेच सांगत असतो. आता ओबीसींतील समाज बांधवांनी भले गरीब असो श्रीमंत सर्वांनी आपल्या सामाजिक - राजकिय - शैक्षणिक हक्कासाठी एकत्र आले पाहिजे. आज महाराष्ट्राचा जर विचार केला तर सहकार क्षेत्रात - सामाजिक क्षेत्रात - राजकिय क्षेत्रात मनगट शाहीच्या जोरावर बरीच मंडळी सर्व सामान्यांची आर्थिक सामाजिक - शैक्षणिक लुट करत आहे. असे असतानाही ओबीसींचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्नाला मोठ्या प्रमाणावर काही राजकीय सामाजिक संघटना करत आहे याचा सखोल विचार ओबीसींनी वेळीच करायला हवा. सहकार क्षेत्रातील बँका, पतसंस्था , साखर कारखाने आर्थिक वरचढ आणणारा वर्ग मात्र राजकारणात अप्रत्यक्षरित्या आपल्या वर नियंत्रण ठेवून आहे. जी मंउळी सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार करून सहीसलामात बाहेर पडतात अशा मंडळींना आजही सलाम करावा लागतो. व त्यांना प्रतिष्ठा मिळते हे दुर्देव आहे. यांच्या शिक्षण संस्था स्वत:चे उद्योगात कारभार मात्र अगदी काटेकोर पणे चालतो एक रूपयाचाही तोटा या मंडळींना येत नाही. अशा स्वार्थी चतुर सवर्ण राजकीय मंडळींचा खर्या अर्थाने ओबीसींना धोका आहे. ब्राह्मण मंडळी पासून एवढ्या मोठ्या प्रमाणात ओबीसींना धोका नाही. ब्राह्मण माणूस आपली जात चोरत नाही, आपला खिसा कापत नाही कि आपल्याला वेळोवेळी राजकारणात विकत घेत नाही.
मात्र आपल्याला विविध प्रकारची आमिषं दाखवून तिर्थयात्रेला नेणारा सवर्ण राजकीय व्यक्तीं पासुन सावध राहिले पाहिजे.
हिंदू धर्मातील रूढी परंपरा न चुकता पाळणारा ओबीसी समाज मात्र स्वत:च्या राजकिय सामाजिक एैक्यासाठी एकत्र येत नाही. हा मोठा विरोधाभास आहे. हे एैक्य व्हाव म्हणून हिंदू धर्मातील ३३ कोटी देवांपैकी एक ही देव अजून ओबीसींसाठी कसा धावुन येत नाही. याचा विचार केला पाहिजे. भले देव धावुन येत नाही मग या देवांच्या देवळाची मालकी असणारा सवर्ण मालक - सवर्ण पुजारी तसेच हिंदू धर्माचा भावनिक ठेका घेणारी ब्राह्मणी व्यवस्था पुढे का येत नाही. याचा आता ओबीसी बांधवांनी देव - धर्म करतांना विचार करायला हवा. आपल्या अनेक पिढ्यांनी देवा धर्मासाठी वेळ दिला हाती काहि लागले नाही. कोणी जर म्हणत असेल आमचा बंगला आहे, आमची गाडी आहे. आमची स्थावर मालमत्ता आहे देवाने आम्हाला सगळे दिले आहे. तर ते साफ चुकीचे आहे जर तुमचा देव एकच आहे तर मग दोन भावांच्या दोन बहिणींच्या संपत्ती मध्ये मोठा विरोधीभास का ?
सागण्याच तात्पर्य एवढेच कि देव काही देत नसुन मानवी शरीर रचनेत मेंदू, च काय्र भाग बरोबर नाक - कान, हात पाय डोळे यांचा वापर शिस्तेने जर केला तरच आपल्या संपत्ती मध्ये वाढ होते. पण केवळ सपंत्ती आली म्हणजे आपण सुधारलो असा जर कोणाचा समज असेल तर तो ही चुकीचा आहे. ओबीसी मध्ये जे स्थीर स्थावर आहेत . अशा पैकी बहुतेक ओबीसी बांधवाला भोगवाद चंगळवादाने ग्रासले आहे. त्यामुळे ओबीसींच्या सामाजिक एैक्या मध्ये मोठा अडथळा निर्माण होत आहे. कष्टकरी वर्ग हा सर्व बाजुंनी पिचलेला आहे. त्यामुळे त्याला या व्यवस्थेचे चटके बसुनही तो रस्त्यावर लढाईसााठी उतरू शकत नाही, ज्यांच्याकडे सर्व काही ठिकठाक आहे त्यांच्यात ब्राह्मण्य आले ले आहे आशा विचित्र कात्रीत ओबीसीनी आपल्याला पकडून ठेवले असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.
आता वेळ आलेली आहे सर्व ओबीसींनी एकत्र येण्याची. मंडल आयोगाने भारतीय राज्यघटनेने दिलेले आरक्षणाचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी. केवळ लग्न, मयत, वाढदिवस, पुजा-पाठ अशा कार्यक्रमांना एकत्र आल्याने ओबीसींचा प्रश्न सुटणार नाही. याच बरोबर शासनाचे दरवाजे ठोठावण्यासाठी सुद्धा हक्कानी पुढे आल पाहिजे. व ज्याच्या मागे आपण जाणार आहोत असा नेता जर चुकला तर त्याला जाब विचारण्याइतकी नैतिक ताकद आपल्या ओबीसींमध्ये असली पाहिजे.
ओबीसी बांधवांनी आता धर्मग्रंथापेक्षाही परिवर्तनवादी संत साहित्य महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छ. शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार केशव ठाकरे, स्वामी विवेकानंद हिंदू राजाचा सुपुत्र भगवान गौतम बुद्ध यांच साहित्य वाचले पाहिजे. याचे कारण म्हणजे वरील साहित्य वाचनाने दलित बांधव आपल्या सामाजिक हक्कासाठी रस्त्यावर उतरतो हे विसरून चालणार नाही.
सरतेशेवटी एकच विनंती ओबीसी मधील घटकांनी सोयरीक जमवतांना गरीब श्रीमंतीला थारा देऊ नका. मतदान करताना आपल्या ओबीसी उमेदवाराला (बनावट कुणब्याला नव्हे) मत द्यायचे कारण सत्ते शिवाय शहाणपण नाही. ओबीसींची मतांची ताकद दिसल्या शिवाय बनावट कुणब्यांच्या विरोधात बोलत नाही त्यांच्या नादी लागू नका कारण बॉम्बस्फोटा इतकीच स्फोटक परिस्थिती यांच्या वागण्यात आहे जरी अंगावर खादी असली तरी अशा ढोग्यांचे विचार नकली आहे.