वधु वर मेळावे काळाची गरज हा ही विचार अस्तीवात नव्हता तेंव्हा गणेश पेठेतील पांगुळ आळीतील शेलार वाड्यात कै. शंकरराव भाऊसाहेब कर्डीले रहात होते. तेव्हा पुण्याच्या प्रत्येक पेठेत समाज रहात होता प्रत्येकाच्या सुखात दु:खात समाज बांधव सामील होत होते बाहेरून आलेला समाज बांधव या प्रवाहात सामील होत आसे. कर्डीले तसे समाज विचाराचे आपले घर पाहुन ते ८२ भवानी पेठे येथे रोज जात. आजुबाजुच्या गावात ८२ पेठ मध्ये ही लग्न असेल तर हजेरी लावत. मग पत्रिका असो अगर नसो समाज लग्नातुन ते उपवर वधु शोधत. या शोधलेल्या उपवर वधुची पुर्ण माहिती ते गोळा करीत स्वत:च्या खर्चाने बाहेर गावी ही जात तेथे माहिती देत नुसते माहिती न देता परस्पर विश्वास देऊन लग्न जमवत. त्या लग्नात मान पान ही नाकारत उलट काही दिवसानी लावलेले लग्न सुखात जगते का याची विचारपुस करीत. कै. शंकरराव कर्डीले हे नाव मागे पडून कर्डीले मामा ही पदवी समाज बांधवांनी त्यांना दिली. या सर्व धडपडीत संसाराकडे पाठ फिरवली. घर अडचनीत आले परंतू कर्डीले मामा या पदवीला कमी पणा न येऊ देता ते आयुष्याच्या शेवट पर्यंत लग्न जमवत होते.
श्री. शाम भगत, श्री. मनोहर डाके, ही तरूण मुले ८२ भवानी पेठ येथे जमत नोकरी मुळे रविवार मिळत आसे कर्डीले मामा वयोवृद्धा झाले होते. त्यांचे काम पुढे गतीशील करावयाचे होते कै. रत्नाकर उर्फ दादा भगत हे त्यावेळी अध्यक्ष होते. त्यांच्या मार्गदर्शना खाली श्री. शाम भगत व श्री. मनोहर डाके यांनी वधुवर सुचक मंडळ सुरू केले. आगदी मोफत माहिती पुरवणे यासाठी रविवार व गुरूवार या दोन दिवशी समाज कार्यालयात येणार्या बांधवांना माहिती देणे व नवीन नोंद करणे ही वेगळी बैठक समाज बाधवांनी सुखकर वाटु लागली. श्री. शाम भगतांचे वास्तव्य पुणे कॉम्प येथुन हाडपसर परिसरात झाले. फुरसंगी ते पुणे कार्यालय हे १० ते १२ किमीचे अंतर भगत सायकलवर येत. आगदी भर पावसात ही ते ४.३० ला हाजर आसत या साठी कोणताच मोबदला नाही. खरी समाज सेवा पुणेकरांनी सुरू केली हा अभिमानाचा इतिहास आहे तो. आजही चालू आहे.
श्री. शाम भगत, मनोहर डाके हे लहान पणा पासुन सुदुंबरे येथे जात. या ठिकाणी उत्सवा दरम्यान समाज बांधव उपास्थीत आसत. काही जन सोबत उपवर वधु-वर सोबत आणत या वेळी आपण तर याला वेगळे रूप दिले तर काय होईल यावर कै. बबनराव खळदे यांच्याशी चर्चा केली. पुण्यतिथी दिवशी विचार पीठावर उपस्थीत वधुवरांनी आपला परिचय करून द्यावा यातून गरजू वधु-वर पालकांची निवड करावी. असा विचार पक्का झाला १९८६ च्या पुण्यतिथी दिनी वधु-वर परिचय मेळावा निश्चित झाला. तसा तोंडी निरोप सर्वत्र गेला. पुण्यतिथी दिनी विचार पिठावर कै. बबनराव खळदे यांनी उपस्थीत वधुवरांना परिचीत केले व विचार मंचावर निमंत्रीत केले. १९८६ चा हा डिसेंबर महिना समाज क्रांतीचा महिणा ठरला ही अद्भुत कल्पना उपस्थीत बांधवांना पटली. या पुढील कार्यात अधीक व्यापक पना यावा यासाठी ८२ भवानी पेठ मधील समाज कार्यालयात सहविचार सभा आयोजित केली. या सभेला पुणे, कल्याण, मुंबई, पनवेल व नाशीक येथील बांधव उपस्थीत होते, विचार सभेने असे ठरले की १९८६ ला आपण वधु वर मेळाव्याचे रोपटे लावले. आता महाराष्ट्र पातळीवर दर वर्षी मेळावा वेग वेगळ्या शहरात भरवु. यासाठी सन १९८८ ला कल्याण जि. ठाणे सन १९८९ला नाशीक या पद्धतीने वाटचाल निश्चीत झाली या सभेला उपस्थीत बांधवांना जो अल्पोपहार दिला तो सुद्धा श्री. शामराव भगतांनी आपल्या घरून करून आणला होता.
महाराष्ट्रात फक्त आणि फक्त पुणे समाजाची नोंद घ्यावी इथे अध्यक्ष व विश्वस्त नियुक्त केले जात नाहीत तर लोकशाही पद्धतीने त्यांची निवड होत आसते. या दरम्यान वधुवर सुचक रोपटे ज्या दादा भगतांच्या काळात लावले गेले त्यांची सत्ता जावून कै. नंदुशेठ क्षिरसागर यांची सत्ता आली. सत्तेवर येताच प्रथम त्यांनी गोर गरिब बांधवांची सामुदाईक मोफत विवाह सोहळे सुरू केले. समाज कार्यालया बाहेर भव्य मंडप उभारून त्यांनी विवाह लावले. आपल्या पुणेकरांनी वधुवर मेळाव्याची संकल्पना सुरू केली त्याला विस्तारीत करण्यासाठी राज्य पातळीवर ८२ भवानी पेठ येथे वधु-वर परिचय मेळावा आयोजीत केला. या कार्याचे उद्घाटन त्या वेळचे मंत्री जयदत्त क्षिरसागर यांच्या शुभ हास्ते झाले. मेळाव्याला अफाट समुदाय आला समाज वास्तु अपुर्ण पडली म्हणुन मग नेहरू मेमोरीअल हॉल व इतर मोठ्या जागेत वधुवर मेळावे भरवू लागले. पुणे हे मेळाव्याचे केंद्र बनले अनेकांची लग्न यातुन जमु लागली या प्रारंभीच्या काळात फक्त ५० रूपये प्रवेश फी आकरली जात आसे. वधु-वर पुस्तीका वेगळी न छापता मोफत पणे गावकुस (तेली गल्ली) मासिकात प्रसिद्ध केली जात आसे. लोकशाही प्रणाली हा पुणे समाजाचा केंद्र बिंद आहे. येथे कुणाच्या तरी आशीर्वादाने कुणाच्या तरी मर्जीने कुणाच्या तरी अशीर्वादाने हाय कमंडाचा हुकूम म्हणुन निवड होत नाही. अगदी लोकशाही प्रणाली प्रमाणे निवड होत आसते १३/१४ वर्षा नंतर उच्च शिक्षित श्री. रामदास धोत्रे यांच्या नेतृत्वा द्वारे कार्यकारी मंडळ विजयी झाले आणि वधुवर मेळाव्याला भव्य दिव्य पणा आला. जागा अपुरी पडू लागली म्हणुन अल्पबचत भवन गणेश कला क्रिडा मंदिर या ठिकाणी मेळावे होव लागले. आकर्षक व रंगीत पुस्तीका हे वैशीष्ठ ठरले फक्त शंभर च्या दरम्यान वधुवर सुरवात करताना होती ती संख्या हजाराकडे गेली श्री. धोत्रे यांच्या कार्यकाळात वधु-वर मेळाव्याला गती आली ही गती सर्वश्री विठ्ठलराव किर्वे, संजय भगत, घनश्यम वाळंजकर प्रकाश कर्डील, माऊली व्हावळ, संजय पवार, दिलीप व्हावळ यांनी आपल्या कार्य काळात जोपासली.
कर्डीले मामा यांनी लग्न जमविण्याची प्रक्रिया सुरू केली. वधु वर सुचक किंवा परिचय करून देणे याच बरोबर प्रत्यक्ष लग्न जमविणे ही बाब कर्डीले मामांची सामाजातील उपवर वधु वरांचे मामा असणे ही अभिमानाची परंपरा. मामा आपल्या भाची व भाच्या साठी जे करतो ती भुमीका स्विकारणे तसे आवघड ही जबाबदार श्री सुभाष काका देशमाने पार पाडत आहेत, पुर्वी ते ८२ भवानी पेठ या संस्थेचे विश्वस्त होते. समाजाचे निरिक्षण होते. शासकीय सेवेतुन निवत्ृत्त होताच त्यांनी लग्न जमविणे ही सेवा वाढवली आपला फोन आपला प्रवास खर्च करून ते वावरतात स्पष्ट स्वच्छ माहिती देणे व एकमेकाला विश्वास देणे हे सुभाष काकांचे वैशीष्ठ.
पुणे येथे भव्य दिव्य मेळावे होतात. वधु -वर मेळाव्याला दुसरी एक बाजू असावी असा सुर दसमाज पातळीवर उमटतो या साठी संताजी प्रतिष्ठान कोथरूड या समाज संस्थे तर्फे मे २०१४ मध्ये मोफत वधु वर मेळावा ही संकल्पना राबवली मोफत प्रसिद्धी मोफत प्रवेश, मोफत जेवण, मोफत पुस्तीका. ही त्यागी व वेगळी कल्पना पुणेकर बांधवांनी चांगल्या प्रकारे यशस्वी केली. ही सुद्धा पुण्याची एक आठवण व साठवण जरूर आहे.
गावकूस (तेली गल्ली ) मासिका तर्फे सन १९८६ पासुन मोफत वधु वर पुसिद्धी संकल्पना राबवली. महाराष्ट्र भर स्वखर्चाने जावुन वधु-वर माहिती गोळा करणे व ती प्रसिद्धी करणे ते मासिक सभासदांना देणे. सोबत वधु वर विशेष अंक छापने ही परंपरा गावकूसने (तेली गल्लीने) राबवली म्हणनार्या पेक्षा पुणेकरांनी यशस्वी केली. सन २००५ पासुन तेली गल्ली मासिकाने वधु-वर मेळाव्या सारखी पुस्तीका कोणतीच फी न घेता तयार करून सभासदांना मोफत दिली जाते ही एैतिहासीक परंपरा पुणे करांचीच आहे. फक्त उच्चशिक्षीतांचा मेळावा संताजी फौंडेशन घेत आसते.
१९८६ मध्ये एक समाज सेवा या भुमीकेने श्री. शाम भगत श्री. मनोहर डाके यांनी सुदूंबरे येथे वधुवर मेळावा ही संकल्पना राबवली काळानरूप म्हणण्या पेक्षा मेळाव्याची स्पर्धा सुरू झाल्या नंतर भरमसाठ फी, नेत्रदिपक भव्य पणा यातही पुणेकर मागे जसे नाहीत तसे मोफत वधुवर सुचक काम करणारे श्री. शाम भगत कर्डीले मामांची परंपरा चालवणारे श्री सुभाष काका देशमाने दरवर्षी मोफत हजारो वधुवरांना प्रसिद्धी देणारे तेली गल्ली मासीकाचे श्री. मोहन देशमाने ही पुण्याची एैतिहासिक परंपरा आहे. ही पंरपरा महाराष्ट्राने स्विकारली आहे. हे यासाठी की या सर्वांची बिजे प्रथम पुण्यात रूजली व मग सर्वत्र उगवली व डोलत उभी राहिली. एक पुणेकर म्हणुन आम्हा सर्वांना या एैतिहासिक घटनांचा अभिमान आहे आम्ही वधु वर परिचय आम्ही वधु-वर मेळावे आम्ही वधुवरांच्या मोफत मेळावा आम्ही मोफत वधु-वर पुस्तीका हा इतिहास निर्माण केला.
- मोहन देशमाने