रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ संल्लग्न महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा रत्नागिरी तालुक्याच्या वतीनं तेली बंधुभगिनींचा भव्यदिव्य मेळावा बालाजी मंगल कार्यालय शांतीनगर येथे 15/4/2018 रोजी सकाळी10:30 वाजता आयोजित करण्यात आला होता. 28 जानेवारी 2018 ला जिल्हा वर्धा येथे संप्पन्न झालेल्या राज्यकार्यकारणीच्या बैठकीत प्रत्येक जिल्हास्तरावर युवा व महीला आघाडीस्थापन करण्यास सांगितले होते.त्या अनुषंगाने 25 फेब्रुवारी 2018 ला जिल्हाअध्यक्ष रघुविर शेलार यांनी जिल्हा कार्यकारणी घेऊन प्रत्येक तालुक्याने लवकरच युवक व महीला आघाडी स्थापन करण्याचे आवाहन केले.त्याचाच भाग म्हणून रत्नागिरी तालुक्याने मेळावा आयोजित केला होता.यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष सतीषजी वैरागी साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मेळाव्यात रत्नागिरी तालुका तेली युवा संघटना व रत्नागिरी तालुका तेली महिला संघटना यांची कार्यकारणी नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग अध्यक्ष सतिश वैरागी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रत्नागिरी जिल्हा तेली समाजाचे काम महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेसाठी आदर्शव्रत आहे असे अभिमानाने सांगतो.व तालुकाअध्यक्ष प्रभाकर खानविलकर व त्यांच्या सर्व टिमला मनापासून धन्यवाद देतो.
या मेळाव्यात रत्नागिरी तेली युवा संघटना अध्यक्षपदी बिनविरोध संदीप नाचणकर, उपाध्यक्ष सुरज गावखडकर, संतोष पावसकर, शुभम राऊत, कार्याध्यक्ष सचिन कोतवडेकर, खजिनदार साहिल बंदरकर, सचिव अविनाश चव्हाण, सहसचिव राजस कदम, सर्वेश विभुते, योगेश पावसकर, प्रसिद्धी प्रमुख अमित लांजेकर, सदस्य मनिष साळूंखे, मनोज कदम, प्रमोद रहाटे, सचिन राऊत, अमरदीप रसाळ, अनिकेत हरचिरकर, ओमकार भडकमकर यांची निवड झाली. तसेच रत्नागिरी तालुका तेली महिला संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध अध्यक्षपदी प्रियांका नाचणकर, उपाध्यक्षपदी प्रतिक्षा साळूंखे, श्रद्धा रहाटे, वैभवी शेट्ये,कार्याध्यक्ष प्रिया पावसकर, खजिनदार पूर्वा पावसकर, सचिव प्रतिक्षा कोतवडेकर, सहसचिव पूर्वा प्रवेष पावसकर, कांचन आंब्रे, प्रसिद्धी प्रमुख प्रतिमा शेलार, सदस्य प्रिया बंदरकर, वैदही झगडे, ऋतुजा पावसकर, साक्षी चव्हाण, सिद्धी महाडिक, अनिता खानविलकर यांची निवड झाली. या मेळाव्यात रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष रघुविर शेलार, संलग्न महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग अध्यक्ष सतिश वैरागी, जिल्हा कार्याध्यक्ष दीपक राऊत, जिल्हा सचिव प्रदीप रहाटे, खजिनदार सुरेश निंबाळकर, तालुका अध्यक्ष प्रभाकर खानविलकर, तालुका उपाध्यक्ष रामचंद्र साळूंखे, तालुका सचिव तुळशीदास भडकमकर, महिला आघाडी प्रमुख कल्पना लांजेकर, जिल्हा महिला संघटक शुभदा शेलार, डॉ. अस्मिता मजगावकर, संताजी पतपेढी अध्यक्ष संजय पुनसकर, माजी नगरसेवक बिपीन बंदरकर, विनायक राऊत, गुरुदत्त रहाटे, कृष्णा खानविलकर, सचिन नाचणकर व रत्नागिरी तालुका तेली समाजाचे तरुण युवक, युवती, महिला, पुरुष जेष्ठ नागरिक या कार्येक्रमाला उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी माजी रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा अध्यक्ष विजय पुनसकर.अविनाश कदम.सुभाष लांजेकर.अशोक नाचणकर.अनंत भडकमकर. यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या वेळी रत्नागिरी तालुका अध्यक्ष प्रभाकर खानविलकर करताना समाजाने संघटीत रहा असे सांगितले. महिला संघटक कल्पना लांजेकर यांनी सर्व महिलांनी संघटीत होऊन रत्नागिरी जिल्ह्यात काम करू असे संगितले.कार्याध्यक्ष दिपक राऊत यांनी देशभर निघालेल्या संविधान न्याय यात्रा व ओबीसी जातनिहाय जनगणना होणे का आवश्यक आहे हे सभागृहाला पटवून दिले. शैक्षणिक, व्यासायिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राचा प्रचार व प्रसार गावागावात व्हावा या दृष्टीने आपण सर्वानी जिल्हा संघासाठी करावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष रघुवीर शेलार यांनी केले शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.