महा.राज्य मागासवर्गीय आयोगापुढे भावी मराठा आरक्षणामुळे निर्माण होवू घातलेल्या ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीसाठी तेली समाजातर्फै महा.प्रांतिक तैलीक महासभा ठाणे व कोकण विभागातर्फे प्रतिनिधि उपस्थित होते..!
ठाणे:- मंगळवार दि.8 मे 18 रोजी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा ठाणे विभागातर्फे ठाणे विभागीय अध्यक्ष श्री सुनिल चौधरी,उपाध्यक्ष श्री जयवंत रसाळ,विभा.सचिव श्री नरेंद्र सुर्यवंशी,श्री सुनिल झगडे,सौ.रेखाताई झगडे,श्री नाना सावंत,श्री राजेंद्र चौधरी..तसेच कोकण विभागातर्फे विभागीय अध्यक्ष श्री सतिश वैरागी हे प्रत्यक्ष हजर होते व त्यांनी आयोगाचे अध्यक्ष श्री गायकवाड साहेब तसेच त्यांचे कमिटी मेंबरर्स कडे लेखी निवेदने तर दिलीच पण समाजाची भुमिकासुद्धा स्पष्ट केली.सदर निवेदनामधे समाजाचे विचार मांडतांना मराठा समाजास आरक्षण देण्याबद्दल विरोध नाही पण त्यांना सद्या ओबीसींना मिळत असलेल्या तुटपुंज्या आरक्षण संख्येत समाविष्ट न करता व ओबीसींवर अन्याय न करता त्यांना वेगळे म्हणजेच स्वतंत्र आरक्षण देण्यास आमची काहीच हरकत नाही.अशा आशयाचे विविध मंडळांचे पोचपावतीसह निवेदन देण्यात आले.
सद्या चालू असलेल्या ओबीसीमधे मराठा समाजास समाविष्ट करण्याच्या हालचालींची योग्यवेळी दखल न घेतल्यास आपल्यातील हिस्सा जर दिला गेला तर भविष्यात आपल्यावर अन्याय होइल म्हणून सदर आरक्षणाच्या चळवळीस विरोध न करता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी प्रत्येक तेलीसमाज मंडळांनी तसेच आज ज्यापण जाती ओबीसींमधे समाविष्ट आहेत त्या सर्व जातीच्या समाजधुरीणांनी करावी अशी अपेक्षा करीत आहे..!