८२ भवानी पेठ पुणे व २८६ मंगळवार पेेठ य दोन वास्तु समाजास दान केल्या ते कै. अप्पासाहेब भुजंगराव भगत, स्वातंत्र्य पुर्वकाळातील पुणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष कै. केशवराव अप्पासाहेब भगत, तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष कै. रत्नाकरदादा ीगत कै. विश्वनाथ भगत व श्री. रामचंद्र भगत यांचा वारसा परंपरेनुसार सुरू ठेवून सन २००२ ते सन २०१५ पर्संत विश्वस्त पदावर राहण्याचा मिळालेला मान अभिमानास्पद आहे. समाज बंधु भगिनींनो आपण सर्वाच्या सहकार्याने तिळवण तेली समजा पुणे ८२ भवानी पेठ पुणे २ या संस्थेचे सामाजिक कार्य करीत असताना २५ वर्षांपासुन सुरू असलेला वधुवर परिचय मेळाव्यात यशस्वी करण्यात सक्रिय सहभाग राहिलेला आहे. संस्थेच्या ८२ भवानी पेठ येथील दर्शनी भागात असलेले दुकानदार (भाडेकरू) यांच्यावर संस्थेच्या वतीने पुर्वीपासुन कोर्टात सुरू असलेला दिवाणी दाव्याचा निकाल संस्थेच्या बाजूने लागावा यासाठी सर्व विश्वस्तांबरोबर राहून विशेष प्रयत्न करून ती जागा समाजासाठी वापरात यावी यासाठी प्रयत्नशील. आपणा सर्वांच्या सहकार्याने व सर्व सहकारी विश्वस्तांच्या मदतीने सन २०१० ते २०११ रोजी संस्थेचे अध्यक्षपद मिळविण्यात यशस्वी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात संस्थेच्या मालकीच्या वास्तु २७१ महात्मा गांधी रोड पुणे कॉम्प, २८६ मंगळवार पेठ पुणे ११, ८२ भवानी पेठ पुणे २ दुरूस्ती करून वापरात दयाव्यात व संस्थेचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
१) तिळवण तेली समाज ८२ भवानी पेठ या वास्तुचे सर्व विश्वस्तांच्या विशेषकरून दिलीप व्हावळ यांच्या मदतीने दर्शनी भागातील साडेतीन हजार स्के. फुट जागा वापरात आणून संस्थेचे आर्थिक उत्पन्न वाढविले.
२) संस्थेच्या मालकीच्या २८६ मंगळवार पेठ पुणे येथे दुरूस्ती करून विद्यार्थी वसतीगृह सुरू केले.
३) ७१ महात्मा गांधी रोड पुणे कॉम्प या वास्तुकडे सर्व विश्वस्तांचे लक्ष वेधन्याकरिता १० वर्षाच्या कालखंडानंतर प्रथमच विश्वस्तांची मिटींग आयोजित केली.
समाज बंधु भगिनींनो आपणास हे सांगु इच्छितो की, हे सर्व १ वर्षाच्यार अल्पशा कार्यकाळात आपणा सर्वांच्या व विश्वस्तांच्या सहकार्याने करू शकलो.
मी समाजास वचन देऊ इच्छितो की, संस्थेच्या सर्व वास्तु वापरात आणुन संस्थेचे आर्थिक उत्पन्न वाढवून समाजासाठी वापरात यावे. ही तळमळ मनात बाळगलो आहे. आपल्या सर्वांच्या सहककार्याची अपेक्षा आहे.
श्री. संजय दत्तात्रय भगत
माजी अध्यक्ष तिळवण तेली समाज पुणे