पंढरीत ओबीसी काँग्रेस व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाच्यावतीने भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप
पंढरपूर दि.२८ (वार्ताहर) - पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. दर्शनानंतर आलेल्या भाविकांना आपल्या गावाकडे जाताना त्यांचे तोंड गोड व्हावे म्हणून शनिवार दि.२८ जुलै रोजी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरात पंढरपूर शहर ओबीसी काँग्रेस व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्यावतीने लाडू प्रसादाचे वाटप शहराध्यक्ष मधुकर फलटणकर, सेवादलाचे शहराध्यक्ष गणेश माने यांच्या हस्ते करण्यात आले. पंढरपूर हे राज्यातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र असून या ठिकाणी यात्रेनिमित्त लाखो भाविक येतात. अशावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण भाविकांना प्रसादाचे वाटप केले असून यापुढे देखील आणखी उपक्काम राबविण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष मधुकर फलटणकर यांनी सांगितले. यावेळी ओबीसीचे उपाध्यक्ष कुमार माने, गणेश भोसले, वैभव वाघमारे, तानाजी भोसले, शिवा संघटनेचे मा.शहराध्यक्ष नागेश चांदणे, गणेश कोरके, राजाभाऊ देवकर, शैलेश देशमाने, अर्जुन कांबळे, पिंटू महागावकर, सुनिल भोसले, दत्ता कांबळे यांच्यासह आदि उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade