तेली समाज अमरावती :- येथील चैत्राली झाडे हिने मागील वर्षी मिस इंडिया सिएटल वाशिंगटन चा मुकूट पटकावला होता. आता नुकताच अमेरकेत अत्यंत कठीण 350 कि.मी.चे सायकल मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला होता. ही सायकल स्पर्धा सिएटचे पोर्टलँड 220 मैल अंतर पूर्ण करावयाचे होते. दर्या, खोर्यातील व उंच टेकड्यातून जाणार्या रस्ता असतो. तसेच पहाटेपासून रात्रीचे 3 वाजता सुद्धा सायकल रायडिंग करावे लागले. चैत्राली नेही स्पर्धा वेळेत पूर्ण करून यश संपादन केले व परत एकदा आपल्या अंगी असलेल्या सर्वागीण पैलूचा परिचय दिला.
या स्पर्धे करिता चैत्रालीने 25,50,100 मैल प्रमाणे दर सप्ताहाचे शेवटी 3 महिण्यापासून सतत सराव केला. होता. डिलाईट अमिरिकन कंपनीत प्रोजक्ट मॅनेजर व घर सांभाळून ही कठीण स्पर्धा जिंकली. याबद्दल सर्व स्तरातून अमेरिकन व भारतीय मित्रपरिवाराकडून कौतुक होत आहे. प्राचार्य डॉ. झाडे, प्राचार्य डॉ. सदन व सौ. विद्या झाडे यांनी स्वागत केले आहे.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade