सकारात्मक मानसिकता यशाची गुरूकिल्ली असल्याचे मत पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन यांनी केले. मराठी तेली समाज विकास मंडळाच्या वतीने स्थानिक सातू स्थित जयभारत मंगलम् येथे १९ ऑगस्टला पार पडलेल्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते.
शैक्षणिक प्रगतीसाठी यशःप्राप्तीचा मार्ग या विषयावर व्याख्यान देताना महाजन यांनी क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये यशस्वी होण्याकरिता सकारात्मकतेचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. हाती घेतलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी युवा पिढीने सकारात्मक मानसिकता ठेवण्याचे आवाहन महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी केले तर, अध्यक्षस्थानी मराठा तेली समाज विकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत मेहरे होते. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे विभागीय अध्यक्ष शंकरराव हिंगासपुरे, अमरावती जिल्हा तैलिक समितीचे अध्यक्ष संजय आसोले, मराठा तेली समाज विकास मंडळाचे माजी सचिव सुधाकर बाखडे उपस्थित होते. प्रमुख व्याख्याते म्हणून पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन होते.
प्राचार्य महाजन म्हणाले, की आपल्या मानसिकतेला अपयशामुळे मर्यादा न घालता प्रयत्नात कुठे कमी पडलो, नेमकी चूक कुठे झाली हे शोधून पुन्हा नवीन जोमाने कामाला लागले पाहिजे. जेव्हढा कठीण प्रश्न तेव्हढीच प्रश्न सोडवण्याची जिद्द वाढली पाहिजे. कठीण प्रसंग हे आपली कसोटी पहाण्यासाठी आलेले असतात. त्यांना धीटपणे सामोरे जाणं यातच आपला खरा पुरुषार्थ सामावलेला आहे; हे निश्चित मनी बाळगावे. स्वक्षमतेवरील आत्मविश्वास जेवढा वाढेल, तेवढे आपण यशाजवळ जातो.आपली सद्सदविवेक बुद्धी वापरून निराशावादी दृष्टीकोन उखडून फेकता येतो.
प्रमुख अतिथी म्हणून अशोक डोंगरे, रघुनाथ वाडेकर, वामनराव बोलके, प्रा. डॉ. जयंत चतूर, डॉ. सुधीर खुरसुडे, देवानंद भोजे, शुभांगी आगाशे, ममता अफूने (चौधरी) यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात माजी संचालक मंडळ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव संजय रायकर यांनी केले. संचालन प्रा. स्वप्नील खेडकर, तेजस्वीनी माणिकराव, निखील माहरे व नितीन चौधरी यांनी केले तर आभार पोलिस उपनिरीक्षक ममता अफुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. संजय तिरथकर, गजानन बाखडे, नितीन बाखडे, यशवंत चतूर, दीपक व्यवहारे, अशोक मांगलेकर, रमेश बोके, उल्हास ताकपीरे, प्रा. तुषार गिरमकर, राजू काळे, प्रकाश तिडके, चेतन सरोदे, पंकज डहाके, अॅड. पंकज माहोरे, प्रा. हर्षल ताकपीरे, विठोबा मेहरे, गजानन काळे, बबन बाखडे, अशोक देशकर, संदीप काळे, आकाश डहाके यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात विभिन्न क्षेत्रातील शैक्षणिक, क्रीडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केलेल्या व स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.