समाजातील काही प्रतिष्ठीत लोक एकत्र येऊन. श्री. प्रकाशशेठ पवार यांच्या घरी या संस्थेची स्थापना करण्यात आली सदरच्या संस्थेचा मुळ उद्देश ही समाजातील घटकांना एकत्र घेऊन एक सामाजीक जाण व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन समाज जागृती करणे समाजातील घटक समाजापासुन दूर गेलेत त्यांना एकत्र आणणे व समाजाची एक मजबूत बांधनी करणे हा या भागाच मुळ उद्देश. याच उद्देशातुन संताजी फाउंडेशन पुणे या संस्थेच्या पदाधिकार्यांनी हळदी कुंकू सभारंभ, वधु-वर परिचय मेळावा, धार्मिक सहलींचे आयोजन समाज बांधवांसाठी दिवाळी फराळ, गरिब विद्यार्थ्यांना मदत, पालखी सोहळ्यास तंबुची मदत, वारकरी बांधवांना वैद्यकीय मदत तसेच समाजातील उच्चशिक्षित वधु-वरांचा मेळावा पुण्यात भरवण्यास सुरूवात केली. सदरच्या मेळाव्यात आज पर्यंत बरीच लग्न जमलेली आहेत.
समाज बांधवांना इतरत्र भरणार्या वधु-वर मेळाव्याची माहिती व वधुवर सुची पुस्तीका उपलब्ध करूण देणे तसेच आदर्श माता पुरस्कार इ. उपक्रम राबविणे.
तसेच मा. श्री. शरदराव पवार व श्री अजित पवार यांचे कडे समाजाचे प्रश्न मांडले मा. जी मुख्यमंत्री विलासराव देशमुख उतसेच माजी मुख्यमंत्रीश्री. पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना तेली समाजास राजकीय न्याय मिळावा म्हणुन प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन श्री. प्रकाश पवार यांनी आपले म्हणणं मांडले. समाजातील पति पत्नी मधील वैवाहिक वाद सांमज्यंस पणे मिटवले तसेच समाज बांधवांना वैयक्तिक आर्थिक तसेच इतर मदत करणे. उच्च शिक्षीत वधु-वर मेळावे घेणे.
संताजी फाऊंडेशनचे मुख्य उद्देश असा आहे की समाजातील सर्व बांधवांनी एकत्र येऊन समाजाची उन्नती करणे एकमेकांना सहकार्य करणे, निकोप व समृद्ध समाज तयार करून जे उच्चशिक्षीत / विचारवंत समाज बांधव समाजापासुन दुर आहेत अशांना एकत्र समाज प्रवाहात आणणे व त्यांना समाजा साठी आपण काही तरी करावे अशी भावना त्यांच्यात जागृत करणे व समाजाची वैचारिक व्यवसायीक शैक्षणिक अध्यात्मीक आर्थिक दृष्ट्या समाज प्रगत करणे हाच या संताजी फांउंडेशनचा उद्देश आहे. आणि या एकाच ध्येयाने संस्थेचे पदाधिकारी व मी सतत प्रयत्नशिल असतो.