शनीशिंगणापूर - अकोले तालुक्यातील राजूर येथून सालाबादप्रमाणे तेली समाजाची तेल व पंच नद्यांचे पाणी घेऊन निघालेल्या तेल कावडीचे पवित्र श्रावण महिन्यात मंगळवार दि. ४ रोजी शनीशिंगणापूरकडे प्रस्थान झाले असून ही कावड़ यात्रा शुक्रवारी शनिशिंगणापूर येथे पोहचणार आहे. ही तेल कावड महाराष्ट्रात एकमेव असून कावडीचे तेली समाज बांधव व सर्व समाजातील शनिभक्त तेल अर्पण करून दर्शन घेऊन ठिकठिकाणी स्वागत करतात. दिंडीचे व्यवस्थापन नितीन घटकर व किरण पाबळकर करत असन सर्व समाजाच्या पुढाकारातून तेल कावडीचे ८ वे वर्ष असून यातून सामाजिक बांधिलकी म्हणून वेगवेगळा संदेश दिला जातो. शनिशिंगणापूर येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता आगमन होऊन देवस्थानच्यावतीने भव्य असे. स्वागत करण्यात येणार आहे. कावड दर्शनासाठी तेली समाज बांधवांनी दर्शनासाठी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.