औरंगाबाद - प्रतिनिधी, गणेश उत्सवच्या माध्मातून सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते, या निमीत्ताने विचारांची देवाण घेवाण होती, व एकमेकांचा परिचय होऊन समाज संघटनेला गती मिळते, मराठा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज, वंजारी समाज, सर्वच जातींचे लोक आप आपल्या माणसां साठी आप आपल्या जातींसाठी एकत्र येत आहे,आता तेली समाजाने ही संघटीत होणे ही काळाची गरज आहे, आमदार जयदत्त अण्णा क्षीरसागर हे तेली समाजाचे नेतुत्व करतात ही तेली समाजासाठी अभिमानाची बाब आहे,तेली समाजाने अण्णांच्या पाठी मागे खंबीर पणे उभे राहावे. कारण की जयदत्त अण्णांच्या माध्यमातून तेली समाजाचे प्रश्न सुटु शकतात.
तेली समाज गणेश मंडळाच्या श्रींची आरती तेली समाजाचे नामवंत वकील अँड गजानन शिरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत व औरंगाबाद शहरातील नामवंत डॉ.लक्ष्मीकांत क्षीरसागर,व डॉ.सौ.मिनल लक्ष्मीकांत क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आली होती या प्रसंगी अँड गजानन शिरसागर बोलत होते,ते पुढे बोलतांना म्हणाले की औरंगाबाद शहरात तेली समाज मोठया प्रमाणात आहे,तेली समाजाच्या विविध सामाजीक कार्यक्रमातुन आपला तेली समाज संघटीत होतांना दिसत आहे,याचा मला आनंद वाटतो,व आगामी काळात तेली समाज गतीने संघटीत होईल असा माझा विश्वास आहे,जातींचे संघटन गरजेचे आहे.