उमरगा-लोहारा : उमरगा तालुक्यातील विविध क्षेत्रात नावलौकीक मिळविलेल्या तेली समाजातील गुणवंतांचा गुंजोटी येथे समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथ टोंपे तर प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष संतोष कलशेट्टी, शिवानंद कलशेट्टी, शिवानंद साखरे, शिवकुमार दळवी, विजयकुमार कलशेट्टी, काशिनाथ निर्मळे, प्रा. डॉ. सुर्यकांत रेवते, सतीश कोरे, संघटनेचे अध्यक्ष मोहन टोंपे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भारतीय सैन्य दलात उत्कृष्ठ सेवा केल्याबद्दल सेवानिवृत्त सैनिक सिद्राम दिक्षीवंत, सैन्य दलात नव्याने भरती झालेले अक्षय साखरे (रा.कसगी), जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल विजयकुमार देशमाने (रा.मुरूम), रोटरी क्लबचा राष्ट्र शिल्प शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल परमेश्वर साखरे (रा. कदेर), महावितरणमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उमेश दिक्षीवंत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरणबसप्पा कलशेट्टी, सुत्रसंचालन परमेश्वर साखरे तर सतीश कोरे यांनी आभार मानले.