पुणे येथे ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले सभागृहात पुणे जिल्हा तिळवण तेली समाजातर्फे अळकुटी येथील रामकृष्ण अशोकराव पिंगळे व अशोकराव पिंगळे यांचा प्यार की एक कहानी चित्रपटाचे लेखन व माय चित्रपटाचे डायरेक्टर मिस्टर रायटर हा किताब देवून नुकताच विश्वस्त घनश्याम वाळंजकर, प्राध्यापक डॉ.सुनील धोपटे तसेच कार्याध्यक्ष दिलीप शिंदे, बाळकृष्ण दारुणकर यांच्याहस्ते सत्कार केला. प्यार की एक कहानी या हिंदी पुस्तकास कोल्हापूर येथे महाराष्ट्राचा मिस्टर रायटर हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला होता. तसेच महाराष्ट्र स्टेट सायन्स प्रदर्शन शिबिरात मराठवाडा विद्यापीठाचे बलभिम आर्ट सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज येथे त्यांना कुलगुरु वाय. एन. बन्हाटे यांच्याकडून राज्यपातळीवरील प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सन्मानीत करण्यात आले. रामकृष्ण पिंगळे हा न्यू आर्टस, कॉमर्स कॉलेज अहमदनगर या कॉलेजचा विद्यार्थी आहे. यावेळी बी.टी.हाटे, डॉ.एस.एस.उंबरे, व्ही.जी.सानप हजर होते. त्यांच्या या यशाबद्दल अळकुटी सरपंच बाबाजी भडारी, तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.भास्कर शिरोळे, चेअरमन बाळासाहेब पुंडे, सह्याद्री उद्योग समूहाचे गंगाधर पानमंद, सुरेश पानमंद, माजी सभापती कुंदनकाका साखला, रयतचे जनरल बॉडी सदस्य शंकरराव माने, मुख्याध्यापक मंगेश जाधव, जिल्हा शिवसेना उपप्रमुख रामदास भोसले, बाळासाहेब ठुबे, माजी चेअरमन बाळासाहेब धोत्रे, महाद् भंडारी, अॅड.बन्हाटे बी.एल., अॅड.चंद्रकांत आवारी, हभप शिवाजी काळे, सुनील धोत्रे, अळकुटी ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन महेश शिरोळे, नवनाथ शिरोळे, अण्णा शिरोळे, नीळकंठ मुळे, तेली समाज अध्यक्ष चंद्रकांत वाव्हळ, तुकाराम काळे, सुनील वाघुले, सचिन घोडके, बबन धोत्रे, के.डी.केदारी आदि मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.