दि:०७/१०/२०१८ रोजी तेली समाज धाराशिव सचिव व मा. नगरसेवक अँड विशाल साखरे व रॉबिनहूड आर्मी उस्मानाबाद मार्फत मधूबन कुष्ठधाम उस्मानाबाद येथे सह्याद्रि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे सर्वेसर्वा आदरणीय श्री डॉ. दिग्गज दापके-देशमुख सर,डॉ.सतीश गवाड सर आणि दादासाहेब कोरके सरांच्या सहकार्याने आणि पोलीस उपनिरीक्षक श्री सोहन धोत्रे सरांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर व गोळ्या औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य तपासणी शिबीरा नंतर मधूनबन कुष्ठधाम मधील राहत असलेल्या सर्व सदस्यांच्या मागणी नुसार श्री कपिल नवगिरे (बारूळ.ता.तुळजापूर) यांच्या मार्फत बिर्याणीचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी रॉबिनहूड आर्मीचे अक्षय माने,सुरज मस्के,अॅड विशाल साखरे,अमृता माने,नवज्योत शिंगाडे,प्रा.सोहन कांबळे,धम्मपाल बनसोडे,भाग्यश्री सुगावे, धनश्री सुगावे,आकाश घंटे,विकी राऊत,राहुल गायकवाड हे उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade