तेली समाजाची शान दी ग्रेट शेलार सर्कस कै. तुकारामशेठ गणपत शेठ शेलार

the Great Shelar Circus & Teli samaj

    पुण्याच्या पेठेत फिरणारी १९१० च्या दरम्यानची ही व्यक्ती. डोक्यावर पाटी चखीत तेल. अंगावर जोड दिलेले पातळ. पायात चप्पलही नाही. उन्हातान्हात पाऊसात ही चिमाबाई हाळी पाटी करी आणि ओढातानीच्या संसाराला टाके देई. त्यावेळी पांगुळ आळीत भोज यांचा तवे बनविण्याचा कारखान्या या कारख्यात तेव्हां कै. तुकाराम शेठ महिना फक्त ३ पैशावर कामावर. त्यावर संसार चालविला जाई. वडिल दुष्काळात वडगांव शसाई येथून पुण्यात आले. पण भाकरीचा प्रश्न मिटला नव्हताच. शेलारांचे एक भाऊ जुन्या मूर्ती गोळा करीत  त्याला पॉलिश करून विकत  अनेक इंग्रज आधिकार्‍याशी ओळखी झाल्या. ते कराची येथे गेले त्याठिकाणी लोखंडी सामानाचा कारखाना सुरू केला. व्याप वाढला म्हणून त्यांनी तुकारामशेठला कराचीला आणले. सर्व जबाबदारी त्यांच्यावर देवून ते गेले.
    तुकाराम शेठ तो कारखाना चालवू लागले. कराचीत एक दिवस बाबा कार्लेंसकर यांची सर्कस आली. कालर्जेकर मराठी माणूस. मुलखात आपली माणसे भेटणे हा आनंद वेगळाच असतो शेलार कार्लेकर यांनी भेटले. पुण्यात व येथे लोखंडी झुंजनारे शेेलार मनाने व शरिराने धडधाकट होते. कार्लेकर यांनी विचारणा केली सर्कस मध्ये येण्याची आधि कसलाच विचार  न करता तुकाराम शेठ शेलार सकर्स मध्ये गेले. या वेळी सर्कस नावाजलेली परंतु आर्थिकबाबत ग्रासलेली. शेलार यांनी सर्कसीतले शिक्षण घेत तंबू व जनावरे वाढवून सर्कस आर्थिक बाबतही बलवान केली. देशभर सर्कस घेऊन जावू लागले. याच वेळी भडोज मुक्कामी श्री. शंकरराव लहाने मिळाले. त्यांनाही यांनी तयार केले. या तिघांच्या विचारातुन सर्कस गाजू लागली काही काळ असाच गेला. या नंतर मतभेद सुरू झाले. तुकाराम शेठ कार्लेकर सर्कस मधुन बाहेर पडले. आणि जवळ फक्त शुन्य मागचे मार्ग बंद झालेले. पण अनुभव बरेच होते. त्यांनी माकडे व बोडके घेतले. यांचीच सर्कस सुरू केली. नाटक व इतर थेटर मध्ये ते या सर्कसचे खेळ करू लागले. शेलार सर्कसची ही सुरूवात यातूनच जूपीटर सर्कस शेलार सर्कस ही एक वेगळी सर्कस उभारली गेली. अाणि झंझावात सारखी देशभर फिरू लागली. माझा कालाकार सुखी असला पाहिजे हा आचार ठेवला.
    सर्कस कलकत्ता येथे असताना परदेशी सर्कस आली शेलार सर्कस व परदेशी सर्कस स्पर्धा ठेवली. शेलारांनी निवडक कलाकार घेऊन या परदेशी लोकांना दाखविले. या देशाचा कलाकार मेला नाही तर तुमच्या पुढे आहे. शेलार सर्कस ही या देशाची शान ठरली. कै. तुकाराम शेठ हे धडपडे व धडाडीचे शुन्याचे विश्व केले. पैसा किर्ती मिळविले पण ते विसरले नाहीत सर्वसामान्यांना अनेक संस्थांना त्यांनी देणग्या व खेळ दिले. सर्कस १९१९ मध्ये नागपूर येथे होती. त्यावेळी समाज परिषद होती. या परिषदेला मदत म्हणुन एक दिवसाचे उत्पन्न देवून टाकले. १९२३ मध्ये समाजाने त्यांना अध्यक्ष पद देवून गौरविले व मानपत्र दिले. मुंबई येथे खेळाच्या निमित्ताने बांधवांना बोलवून संघटनेचा मंत्र दिला. तसेच जगाला दिपवणारा या देशाचा सुपुत्र दामू धोत्रे या आपल्या भाच्याला सर्कस मध्ये घेऊन घडविले. ते वयोमानाने दमले. पुणे येथे मंगळवार पेठेत भाड्याच्या घरात रहात होते. याच घरी १९४० मध्ये निधन झाले. मागे ठेवला एक इतिहास दि ग्रेट शेलार सर्कस.

दिनांक 01-05-2015 12:41:53
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in