बारा बंगला, कोपरी, ठाणे (पुर्व) येथील चौकास तेली समाजाचे दैवत संत श्री. संताजी महाराज जगनाडे याचे नांव
बारा बंगला, कोपरी, ठाणे (पुर्व) येथील मध्यवर्ती टेलीफोन टॉवरखालील चौकाचे "संत श्री. संताजी महाराज जगनाडे चौक" असे नामकरण करण्यात आले आहे. ठाणे महानगर पालिकेच्या महासभेत सदर नामकरणाचा ठराव स्थानिक कार्यसम्राट नगरसेविका सौ. मालतीताई रमाकांत पाटील यांनी मांडला व मंजुर करुन घेतला. ठाणे महानगर पालिका क्षेत्रात गेली ३५ वर्षे अविरत समाजकार्य करणाऱ्या श्री. संताजी सहाय्यक संघ या संस्थेने केलेल्या पाठपुरव्याच्या जोरावर ठाणे शहरात प्रथमच तेली समाजाचे नाव सार्वजनिक जागेस देण्यात आले आहे. सदर प्रस्ताव तातडीने संमत करुन घेण्यासाठी श्री. संताजी सहाय्यक संघाचे उप-सचिव श्री. राजेश केशव थोरात व त्यांच्या पत्नी सौ. पुनम राजेश थोरात यांनी नगरसेविका सौ. मालतीताई रमाकांत पाटील व रमाकांतदादा पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन नामकरण संमत करण्यात अतिशय महत्वाची भुमिका निभावली. नामकरणाचा ठराव संमत केल्याबद्दल संस्थेच्यावतीने शुक्रवार, दि. २१ सप्टेंबर, २०१८ रोजी नगरसेविका सौ. मालतीताई रमाकांत पाटील व रमाकांतदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते.