रत्नागिरी आबलोली :महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा राज्य कार्यकारिणीची राज्यस्तरीय बैठक नागपूर येथे राज्याध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे महासचिव डॉ. भूषण कर्डीले, कोषाध्यक्ष गजानन शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. बैठकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ३०० पदाधिकारी उपस्थित होते.
तेली समाजाच्या भविष्यातील वाटचाली संबंधी अनेक धोरणात्मक निर्णय राज्य कार्यकारिणीने एकमताने मंजूर केले. या सभेत कोकण विभाग सचिव पदी चंद्रकांत महादेव झगडे (गुहागर), कोकण विभाग सेवा आघाडी अध्यक्ष विनायक तुकाराम राऊत (मालगुंड), रत्नागिरी जिल्हा युवक अध्यक्ष संदिप कृष्णा नाचणकर, रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील प्रभाकर हळदे, रत्नागिरी जिल्हा महिला अध्यक्ष कल्पना लांजेकर, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा प्रिया डिंगोरकर, सचिव शुभांगी खळदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सभेसाठी कोकण विभागाचे अध्यक्ष सतीश वैरागी, कार्याध्यक्ष गणेश धोत्रे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, कार्याध्यक्ष दीपक राऊत, रायगड जिल्हाध्यक्ष गणेश महाडिक आदी पदाधिकारी कोकण विभागातून उपस्थित होते. अभिप्रेत असणारे संघटित कार्य आगामी काळात कोकण विभागाच्या माध्यमातूनकरु असा आशावादकोकण अध्यक्ष वैरागी यांनी व्यक्त केला.