नसरापूर : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद बाळासाहेब देशमाने यांची श्री संताजी महाराज जगनाडे तेली समाज संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष जनार्दन जगनाडे यांनी देशमाने यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले. देशमाने यांनी जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून तेली समाजाच्या उन्नतीसाठी काम केले आहे. समाजाच्या प्रश्नासाठी शासनदरबारी वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन संस्थेच्या पदाधिका-यांनी एकमताने त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. “जिल्ह्यातील तेली समाज संघटित करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे,' असे देशमाने यांनी निवडीनंतर सांगितले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade