औरंगाबाद - तिळवण तेली समाज जनगणना अभियानास शहर तसेच जिल्ह्यात समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभियान राबवणारे कार्यकर्ते माहिती संकलन करण्यासाठी घरोघरी भेटी देत आहेत. जनगणनेचे अभियान अंतिम टण्यात सुरू आहे. तसेच समाजाच्या माहितीपुस्तिका तयार करण्याचे कामदेखील सुरू आहे. याबाबत माहिती संकलन करण्याची अंतिम मुदत १० डिसेंबरपर्यंत आहे. समाजाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे. माहितीपुस्तिकेसाठी समाजबांधवांनी व्यवसाय, शिक्षण तसेच इतर बाबींची सविस्तर माहिती स्वत:च्या पत्त्यासह महत्त्वाचे संदर्भ तसेच मोबाइल क्रमांक, कुटुंबाच्या सदस्य संख्येची माहिती घेण्यात येत आहे. जास्तीत जास्त समाजबांधवांनी आपली व कुटुंबाची सविस्तर माहिती भरून जनगणना प्रतिनिधींना सहकार्य करण्याचे आवाहन गणेश पवार, अशोक लोखंडे, बाळू शेजवळकर, नितीन तावडे, विनोद मिसाळ, ईश्वर पैठारे, सुनील वाडेकर, संतोष काकडे आदींनी केले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade