तसे पुणे खडबडुन जागे झाले महात्मा फुले यांच्या पासुन. समाज कारण व राजकारण या मध्ये आमचा ही सहभाग हा उच्चवर्णीय एवढाच. आमची ही एक संस्कृती आहे. आमचा ही एक इतिहास आहे. त्या इतिहासाचे आम्ही वारसदार आहोत. इतिहास घडविण्याची आमची ही परंपरा आहे. महाराष्ट्र ज्याला आपले दैवत मानते. महाराष्ट्र ज्या श्रद्धेवर तरला, उभारला व चालत रहातो त्या तुळजापूरच्या भवानी मातेचा आमचा सबंध. बोपदेव व हेमांड यांच्या धार्मीक अतिरेका पणातून गाफील राहिलेल्या यादव घराण्याने आपला शेवट करू घेतला. त्यांच्या जवळची भवानी माता ही शुर वीर असलेल्या तेली बांधवाकडे आली. आगदी धामधुमीच्या काळात ही तिचे संरक्षण केले. तिला हात लावु पहाणार्या मंडळींना याच तेली बांधवांनी दोन हात कले. हा या समाजाचा खरा इतिहास आहे. तो कथा किंवा दंतकंथातुन दडपून ठेवला आणि या समाजाच्या शौर्याग्च्या पराक्रमाचा ज्वलंत इतिहास जावून फक्त एक पंरपरा आली. इतिहासाचे वारसदार असलेले रक्त, इतिहासाची परंपरा असलेली वंशज दडपून टाकले, तरी सर्व भेदून लाव्हारसा सारखे प्रकट होतात. याचा जिवंत अनुभव म्हणजे कै. आप्पासाहेब भुजंगराव भगत हे आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासाचा केंद्र बिंदु असलेल्या भवानी मातेच्या इतिहासातील भगत घराणे. राज्य कारभार करणे, समाजकारण करणे इतिहासाचे नुसते पोवाडे न गाता तो निर्माण करणे ही परंपरा असलेल्या भगत घराचे ते वारसदार. आज पासून अंदाजे दिडशे वर्षा पुर्वी पुणे येथून याच भगतांच्या वाड्या पासून तुळजापुरच्या भवानी मातेची पालखी जात आसे. घरात पुर्वी तेल घानी आसत. परंतु इंग्रज राज्य रूळू लागताच यंत्रे बोटीतून येऊ लागले. आप्पासाहेब तरूण होते. धडपडे होते व परीवर्तनाच्या रस्त्यावरील वाटसरू ही होते. यामुळे त्यांनी आपला कल नव व्यवसायात निर्माण केला. आज जी पुण्याची बाजार पेठ म्हणतो या बाजार पेठेत तेल निर्मीती व विक्रीते तेली होते. याच पेठेतुन आप्पासाहेबबांनी लोखंडी मालाची विक्री व निर्मीती सुरू केली. पर राज्यात ही ते व्यापार साठी संपर्कात होते. पुणे शहरातील व्यापार क्षेत्राचे ते एक म्होरके बनले. या काळात स्वातंत्र्याचे वारे वाहु लागले. होते. ते कधी अप्रत्यक्ष कधी प्रत्यक्ष त्यात सहभाग घेत. व्यापार हा केंद्र मानून ते घडपड करीत. ते कुस्ती शौकीन होते. चांगले मल्ल घडले पाहिजेत या साठी त्यांनी अनेक पैलवानांना आर्थिक मदत केली. अनेक कुस्त्यांच्या फडावर ते जात व त्याचें कौतुक पहात आसत. या पैलवानांस सामाजीक प्रक्रियेत गुंतवत आसत. लोखंडाचा व्यपार हा त्यांचा मोठा व्यवसाय हे एक पुण्याचे भुषण होते. याच व्यवसायातून त्यांनी पैसा कमविला यातून पिड्यान पिड्या असलेली घराची मालमत्ता त्यांनी वाढवली. ती इतकी की पुण्या साररख्या मोठ्या शहरात स्वत:चा मालकीचे ५२ चौसपी वाडे होतेे. अशी एक ही पेठ किंवा आळी पुण्यात शिल्लक नव्हते की त्या परिसरात अप्पासाहेब भगतांचा वाडा नव्हता. पुर्वी पुण्याच्या पेशव्यांना सुद्धा कर्ज पुरवठा करणारे होते आसा इतिहास सांगतो त्याच पुण्याच्या विकसासाठी, व्यवसायासाठी समृद्धी साठी त्यांनी कर्जपुरवठा ही केला. सामाजीक, राजकीय व धार्मीक कामात पुणे येथे आप्पा साहेब भगतांना मानाचे, आदराचे व तेजोमय स्थान होते. अनेक ठिकाणी ते स्वत: हजर असत सहभाग घेत. आप्पासाहेब नसतील तर त्यांची उणीव स्पष्ट जाणवत असे. पुण्याच्या संस्कृतीत जंगली महाराज हे एक वेगळी ठेवण तर या जंगली महाराजांचे आप्पासाहेबांचे जवळचे संबंध. आप्पासाहेब आपल्या राहत्या वाड्यात त्यांच्या साठी वेगळी व्यवस्था केली होती. जंगली महाराज जेंव्हा जेंव्हा पुणे गावात येत तेंव्हा तेंव्हा ते आप्पासाहेबांकडे न चुकता येत धार्मीक समाजीक बाबत चर्चा विनिमय करीत. एवढी प्रतिष्ठा आप्पा साहेबांनी पुण्यात निर्माण केलेली होती.
आप्पा साहेब भगतांना जगन्नाथ व केशवरारव दोन मुले जगन्नाथ हे व्यवसायात गुंतलेले. ते व्यवसाय संभाळुन समाजकारणात असत आज बालगंधर्व रंगमंदीर जवळ जंगली महाराज मठ आहे त्या मठाच्या बांधकामाला त्यांनी सहकार्य केले. जी प्रवेश द्वाराची कमान आहे ती यांनीच स्वखचर्चाने बांधून दिली.
आप्पासाहेबांचे दुसरे चिरंजीव केशवराव यांचा पिंड समाज कारण राजकारणाचा. त्या काळात मराठा व ब्राह्मण हा वाद शिंगेला पोहचलेला डोके व मनगट यांची लढाई राजकारणात मोठी हे दोन्ही समाज तेली समाज जमेस धरत नव्हते. पण मुत्सधी असलेल्या केशवरावांनी पुणे नगर पालीकेची निवडणूक लढवली ते सहज विजयी झाले. चाणाक्ष, व गरिबा विषयी तळमळ या मुळे ते थोड्या काळात एक जबाबदारी नगरसेवक म्हणुन सर्वां समोर आले. याच बळावर पुणे नगरपालीकेचे नगराध्यक्ष झाले. मी सुरूवातीला सांगीतले इतिहासाची पृनरावृत्ती होत आसते ती अशी शेकडो वर्षी पुर्वी बुर्हानगर येथे राज्य करीत असताना महाराष्ट्राची धन दौलत भवानी माता संभाळणारे भगत घराणे होते. त्याच घराण्याचे केशवराव वंशज,. ते पुण्याच्या इतिहासातील पहिले तेली नगराध्यक्ष होते ते ही सन १९३५ -३६ साली. केशवराव सामाजीक जाणीव असलेले बांधव होते. रावसाहेब केदारी यांच्या नेतृत्वाखाली सन १९१९ पासून सुदुंबरे येथे श्री संत संताजी महाराजांची पुण्यतीथी सार्वजनिक रीत्या सुरू होताच त्यात ही ते सामील झाले. कै. आप्पासाहेब भगतांची इच्छा होती. त्यांचे मत होते की आपल्या समाजाला एक विचारांची बैठक आसावी या साठी आपण प्रयत्न करू या त्यांच्या इच्छे खातर कै. अप्पासाहेबांनी भवानी पेठेतील आपली वास्तु समाजाला दिली. ती काही दिवसात समाजाच्या नावे रितसर ही केली. भविष्याचे वेध घेणारे केशवराव होते त्यांनी विचार केला काही पेठेत पसरलेला समाज भविष्यात पुणे परिसरात विस्तारीत होईल. शिक्षण ही विकासाची पाऊल वाट नव्हे तर महामार्ग या मार्गावर समाज जावा या साठी त्यांनी विचार केला. ग्रामिण भागातील महाराष्ट्रातील अनेक बांधव शिकले पाहिजेत पुण्यात त्यांची विना मोबदला सोय झाली पाहिजे यासाठी त्यांनी मंगळवार पेठेतील आपला वाडा समाजाला अर्पण केला. याचा फायदा असा झाला की भविष्यात पुणे परिसरातील नव्हे तर महाराष्ट्रात नामवंत डॉक्टर, शेती, शास्त्रज्ञ, इंजिनीयर, वकील व्यवसायीक म्हणून यातील बरेच जन नावा रूपाला आले आहेत. ते सर्व या समाज वास्तुत घडले. आप्पासाहेब व केशवराव हे पिता व पुत्र एवढ्या व्यक्तींना किंवा गरिबांना त्यांनी आपली मिळकत दान केले. समाजासाठी धडपडणार्या अनेक व्यक्ती व संस्था यांना त्यांनी आपल्या वास्तू अर्पण केल्या की त्याबद्दल कसलाच मोठे पणा न ठेवता त्यानी ते अर्पण केले.
दादा भगत हे एक समता, स्वातंत्र्य, सेवाभावी, त्याग व निष्ठा ही शिदोरी घेऊन वावरणार्या सानेगुरूजींच्या राष्ट्रसेवा दलात घडण झालेले. तरूण पणा पासूनल समाज कार्यात ओढले गलेले. सुदुंबरे संस्था व पुणे तेली समाज ही यांची संकेत स्थळे. व्यवसाय इलेक्ट्रीशनचा यात ते एक विश्वासू म्हणून नाव कमविलेले. संताजी उत्सवात कळू लागले तेंव्हा पासून ते स्वयंसेवक म्हणुन काम करित होते. संस्थेच्या सहविचार सभेत ते विचार व्यक्त करिताना सांगत. समता, बंधूभाव याचे ठिकाण पंढरपूर संत नामदेवांनी त्या ठिकाणाला उजाळा दिला याच वाटेवर संत संताजी चालत त्यांनी आपल्या आयुष्यभर समतेची पताका फडकवली. मानवतेचा भक्तीचा, त्यागाचा व शौर्याचा हा एक महाराष्ट्राचा केंद्र बिंदू परंतू सर्व संत पंढरपूर येथे पालखीत बसून जातात फक्त संत संताजी नाहीत. ही संताजींची पालखी पंढरपूरला जावी. त्यांचे हे विचार सभेला पटत परंतू हे अवघड काम करण्यास सोबत मागताच तसा म्हणावा असा प्रतिसाद मिळत नव्हता. एक वेळ ते अतिशय पोटतीडकीने बोलले. दादा भगत निराश ही झाले. परतीचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात कै. धोंडीराम चोथे होते. त्यांनी सांगीतले तुमची मते रास्त आहेत. तुम्ही जो एकटे प्रयत्न करीतअहात तसा प्रयत्न माझे मेहुणे इंदोरी येथील धोंडीराम राऊत करीत आहेत. तुम्ही दोघेही एकत्र या आणि हा इतिहास निर्माण करा. दादा, धोंडीराम राऊत, व शरद देशमाने एकत्र आले. शुन्याची सुरूवात पालखी, टाळ पखवाज विना हे काहीच नव्हते मावळात पालखी मिळाली बाकी साहित्य बरडकरांनी दिले. संताजींना पालखीत बसवले आणी प्रस्थान झाले. वारकरी किती तर दादा, धोंउीराम राऊत, शरद देशमाने सह फक्त पाच जन. त्यांच्या या धाडसाला जागो जागी हे वेडे पाच काय करणाार ? यांना अनेकांनी वेड ठरवले. वेडेच इतिहास निर्माण करीतात वेडेच ध्येय वेडेच निष्ठा पूर्वकि वाटाचल करतात. दादा भगतांनी वेडे बनुन शहाण्या माणसाचे काम केले.
महाराष्ट्रात अनेक समाज संस्था आहेत. या ठिकाणी नियुक्त होता येते. या साठी कधी अशीर्वाद कधी हम करेसो ही वाटचाल आसते. परंतु पुणे समाजात लोकशाही पद्धतीने निवड होते. दादांचे पॅनेल लोकशाही पद्धतीने निवडले गेले. ते स्वत: अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात पहिली गोष्ट झाली असेल तर ती म्हणजे पुणे महानगर पालीके मार्फत घसोटी पुलाला श्री. संत संताजी जगनाडे नामकरण समारंभ. श्री. शाम भगत, श्री. मनोहर डाके या त्यावेळच्या तरूण बांधवांस त्यांनी संपर्कात ठेवले आणि पुणे येथे प्रथम वधुवर सुचक मंडळ सुरू करावयास लावले यासाठी कार्यालयात वेगळी व्यवस्था निर्माण केली. वधुवर मेळावे आज जे जोमात पार पडतात त्याची ही पाऊल वाट दादंानी निर्माण उकेली. याच वास्तुत श्रीमती राजश्री भगत, सौ. मंगल जाधव, श्री. मोहन देशमाने यांची २/३ कवी संम्मेलने आयोजीत केली होती.
विदर्भातील वर्धा जवळील स्वातंत्र सेनानी कोलते यांच्या राजश्री या भगत घराण्याच्या झाल्या. रावसाहेब केदारी यांच्या नात सुन म्हणुन त्या इथे घडल्या एक विचारवत लेखीका म्हणुन त्यांना अनेक सामाजिक संस्थेत कार्यरथ राहिल्या. महिला या बचत करू शयकतात ही कल्पना प्रत्यक्ष रूजू लागली तेंव्हा खेडो पाड्यातील महिला पोष्टकडे जात. या साठी गावे गावी महिला प्रतिनीधी नेमले होते. आशा सर्व महिलांची संघटना बांधावी अडीअडचनी सोडवाव्यात ही जिद्द राजश्री ताईंनी ठेवली व देशात प्रथम देश पातळीवर अल्पबचत महिला प्रतिनीधींची संघटना उभी केली ही एक शासन मान्य अधीकृत संस्था बनवली या संस्थे मार्फत अनेक प्रश्न त्या देशपातळीचे अध्यक्ष या नात्याने सोडवितात.
भगत घराण्यातील श्री. संजय दत्तात्रय भगत हे समाज संस्थेचे विश्वस्त आहेत| शंभर वर्षाची परंपरा असलेली ही महाराष्ट्राची अग्रगण्य संस्था परंतु संस्थेच्या इमारतीचा काही भाग हा अल्प भाड्यात भाडेकरू कडे होता. आशा वेळी पुर्वीच्या विश्वस्तांनी सुरू ठेवलेला कोर्टाचा वाद ह्या ही विश्वस्तांनी सुरू ठेवला नियोजन बद्ध रित्या प्रयत्न करून जागा ताब्यात घेण्यास विश्वस्ता बरोबर काम केले. सन २००२ ते २०१५ या प्रदिर्घ काळात ते विश्वस्त आहेत. इस. २०0१व ते ते २०११ या काळात ते समाज संस्थेचे अध्यख होते. याच सर्व विश्वस्त व समाज बांधव यांच्या सहकार्यातुन वास्तुचा दर्शनी भाग भव्य बनविला यासाठी श्री. दिलीप व्हावळ यांची साथ व सोबत ते मोलाची मानतात. यामुळेच दर्शनी भागातील ३५०० स्को फुट जागा समाजाला वापरता येऊ लागली संस्थेला जे कायम उत्पन्न मिळते त्यामध्ये वाढ झाली. मंगळवार पेठ, लष्कर परिसरातील वास्तुकडे लक्ष देऊन मंगळवार पेठ येथे पुन्हा विद्यार्थी वसतीगह सुरू केले. वधुवर मेळावा व इतर उपक्रम संस्था राबवत असताना ते आघाडीवर रहतात.
कै. आप्पासाहेब भगत, कै. केशवराव भगत, कै. दादा भगत यांच्या एैतिहासीक कार्यास अभिवादन
- श्री. अंबादास शिंदे, रघुनंदन भगत, श्रीमती नंदा भगत, श्री. संजय भगत, श्री. व्यंकटेश भगत, श्री. घनश्याम भगत,