श्री. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड मोफत वधू वर पालक परिचय मेळावा पुणे

     श्री. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड आयोजित मोफत वधू वर पालक परिचय मेळावा नुकताच सृष्टी गार्डन म्हात्रे पुलाजवळ एरंडवणे, पुणे - 411 004 येथे पार पडला या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील, कानाकोपर्‍यातून आणि ग्रामीण भागातून अनेक वधु-वर या ठिकाणी आले होते. एकुण 1700 वधु वर आणि साडेतीन हजार समाज बांधव असे एकुण पाच हजार समाजबांधवांनी या मेळाण्याचा लाभ घेतला. श्री. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड ही संस्था रजिस्टर असून संस्थेचे हे पंचविसावे (25) वर्ष असून संस्थेने आजपर्यंत अनेक मेळावे, विभागीय सहली, आरोग्य शिबिरे, महिलादिन मुलांचा गुणगौरव, आदर्श माता पुरस्कार, फंडाच्या माध्यमातुन अनेक समाजबांधवांना आर्थिक मदत, महिलांसाठी होम मिनिस्टर असे असंख्य कार्यक्रम घेत असते त्यामध्ये सुंदुबरे संस्था पालखी सोहळ्यात मदत इत्यादी कार्यक्रम वर्षभर चालू असतात अर्थात हे सर्व संस्थेच्या घटनेप्रमाणेच चालते, असून कोणत्याही संस्थेच्या विरोधात संताजी प्रतिष्ठाण कार्य करीत नाही. मोफ़त मेळाण्याची निधी संकलनाची सुरूवात चि. दिप विजय हाडके या मुलाने आपल्या वाढदिवसाच्या मिळालेल्या पैशातून केली त्यामुळे त्याचे कौतुक करावे तितके थोडेचे आहे. सदर मेळावा मोफत घेतला असून वधु-वरांचे फार्म भरण्यापासून ते जेवण व प्रवेश फी चहा बिसलेरी थंड पाणी पूर्यत सर्वच व्यवस्था अगदी मोफत ठेवण्यात आली होती. या मेळाव्यासाठी पुणे शहरातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी श्री. संताजी फौन्डेशन पुणे उपनगरातील अनेक कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले. या मेळव्यासाठी संपूर्ण भोजन मा. शिवदासजी उबाळे अध्यक्षा सुदुंबरे संस्था व सदस्य वाघोली ग्रामपंचायत व सौ. वसुंधराताई उबाळे विद्यमान सरपंच वाघोली यांनी दिले तर चहाची संपूर्ण व्यवस्था ज्ञानेश्वर (माऊली) व्हावळ विश्वस्त तेली समाज मा, अध्यक्ष तेली समाज पुणे संपूर्ण व्हावळ परिवारातर्फे करण्यात आली होती व पिण्याच्या थंड पाण्याची सोय श्री. प्रविण शेठ येवले (पाणीवाले, बाबा) यांच्या वतीने करण्यात आली होती. मेळाव्याचे उद्घाटन प्रमुख पाहूणे श्री. शिवदासजी उबाळे व वसुंधराताई उबाळे यांचे हस्ते पार पडले, याप्रसंगी वधु-वर पुस्तकेचे प्रकाशन करण्यात आले, याप्रसंगी मेळाव्याचे अध्यक्ष श्री. विजयराव भोज, संस्थेचे अध्यक्ष रमेश भोज कार्याध्यक्ष उमेश किर्वे स्वागताध्यक्ष श्री. प्रकाशशेठ पुवार, सुंदुंबरे संस्थेचे उपाध्यक्ष व मा. अध्यक्ष तेली समाज पुणे श्री. विजयकुमार शिंदे, तेली समाजाचे मा. अध्यक्ष रामदासजी धोत्रे, संजय भुगत सौरभ भागवत (विद्यमान सदस्य इंदारी ग्रामपंचायत) उदयोगपती प्रदिपजी उबाळे डॉ. राजेंद्र मिटकर, उद्योगपती नितिनुजी शिंदे, नगररोड तेली संस्थेचे अध्यख पंडीतजी पिंगळे, हडपसर तेली समाज अध्यक्ष श्री. मोहन चिंचकर धुनकवडीचे रोहिदासजी उबाळे, सिंहगड शाखेचे अध्यक्ष सुभाषजी शेजवळ, राजेश शेजवळ ताराचंदजी देवराय, बाळासाहेब आंबिके, जयसिंग दळवी, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष मनोज आनेकर, प्रदिपजी सायकर, सुमताई नेरकर, मिराताई फुल्ले, अनिल भोज, उल्हास शेठ वालझाडे, विठ्ठलराव किर्वे मा. अध्यक्ष तेली समाज पुणे रोहिदासजी उबाळे विजयराव काळे, अरविंद दारूणकर, इ. मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. शिवदासजी उबाळे यांना समाजभुषण हा पुरस्कार महाराष्ट्रातील, असंख्य समाजबांधवांसमोर प्रदान करण्यात आला त्याचबरोबर सौ. वसुंधरा ताई उबाळे यांनाही वाघोली सरपंच पदी निवड झाल्याबद्दल, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले, श्रीधर भोज यांनाही उत्कृष्ट योगदानाबद्दल, समानीत करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयराव हाडके, महेंद्र शेलार, वासुदेव गुलवाडे, पंडीतजी चौधरी, लक्ष्मण कवडे, अशोक साळवणे, अशोक क्षीरसागर, अशोकराव चौधरी, श्रीधर भोज रविंद्र उबाळे, सुर्यकांत मेढेकर, राजेंद्र किर्वे, गोरखशेठ किर्वे, तुषार वाचकवडे, मधुकर गुलवाडे, सुरेश शिंदे, रामचंद्र कटके, जिवण देशमाने, प्रकाश कोकणे, संतोष किर्वे, नारायणराव शिंदे, विठ्ठलराव किर्वे, पांडुरंग क्षीरसागर, सचिन देशमाने, दिपक सोनावणे, प्रविण शेठ येवले, तानाजी विभुते, अरूण शेठ चिंचकर चंद्रकांत पिंगळे, संतोषशेठ व्हावळ, राहुल अंबिके, किरण किरवे, सुभाष करपे, शुजन करपे, हरिष देशमाने, विष्णू चव्हाण, सुर्यकांत चव्हाण, कृष्ण भादेकर, अजय शिंदे, गणेश भोज,  संजय व्हावळ हे सर्व कार्यकर्ते गेली दोन महिन्यापासून कष्ट घेत होते तर महिला आघाडी तर्फे सौ. प्रमिलाताई किर्ते, सौ. जयश्री भोज, सौ. विना किवे, सौ. सुनिता भोज, सौ. सुजिता हाडके, सौ. वैशाली किर्वे, सौ. सुनंदा किरवे, सौ. वैशाली शेलार, सौ. मिनाक्षी करपे, सौ. सुरेखा देशमाने, सौ. शालीनी भोज, सौ. लक्ष्मी क्षीरसागर, सौ. मंगला गुलवाडे, सौ. कोमल भोज, सौ. प्रियांका किरवे, सौ. मंजुषा दळवी, सौ. ज्योती किरवे, सौ. दिया करपे, सौ. दिया शीरसागर, सौ. अभिशेकी उबाळे, सौ. रंजना उबाळे, इ. अनेक महिलांनी फार्म चेकींग पासून ते पुस्तक छापण्यापर्यंत काम पाहिले, तर पुस्तक छापण्याचे सर्वच काम अगदी बाईडींग पुर्यत श्री. कुमार भादेकर (औ) यांनी पुर्ण केले. या सर्व वधु - वर मेळाव्याची व्यवस्था मेळाव्याचे अध्यक्ष व संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. विजयराव भोज मेळावा कार्याध्यक्ष  उमेश किर्वे व संस्थेचे अध्यक्ष रमेश भोज यांच्या नेतृत्वाखाली पुर्णपणे पार पडली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. हरिष देशमाने, यांनी केले तर विजयराव भोज यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर संस्थेचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश भोज यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीधर भोज यांनी केले. अशाप्रकारे मोफत मेळाण्याचे नियोजन आणि आयोजना निमंत्रण आणि आमंत्रण श्री. संताजी प्रतिष्ठाण कोथरूडच्या वतीने केले.

    आता अपेक्षा एकच ज्या वधु-वरांचे लग्न ठरेल त्यांनी कृपया पुढील माहिती कळवावी म्हणजे कार्यकर्त्यांना एक प्रकारची उर्जा मिळेल आणि उत्साह निर्माण होईल.

    मो. नं. श्रीधर भोज - 9860609653 मो. नं. विजय भोज - 9177736747 ॥ जय संताजी, जय तेली समाज 

दिनांक 04-06-2018 21:04:04
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in