केंद्रीय लोकसेवा आयोगात तेली समाजाचे वैभव रघुनाथ गायकवाड यशस्वी

    नगर मनमाड रत्यावर एक गाव गावाचे नाव पिंपळगांव माळवी, जि. नगर, गाव आठरा पगड जातीचे. आलुती व बलुती पिड्यान पिड्या जगणारी. गाव वेशीच्या आत जगावयास शेती आहेच असे ही नाही. जी काहीना आहे तीच मुळात एक दोन महिने जगवू शकेल याची खात्री नाही. मग जगावे जातीच्या उद्योगावर ते उद्धस्त होऊन एक दोन पिढ्या होऊन गेल्या. कपाळाला चिकटलेली जात जन्मापासुन मरे पर्यंत आपली म्हणून संभाळण्याची. त्या जातीने साधी कुर कुर ही करू नये इतकी परंपरा चकटवलेली. या गावात तेली समाजाचे एकुलते एक घर गावात ना भावकी ना नाती. परंतू श्री रघुनाथ उर्फ बाळू गायकवाड यांनी समज आली त्या दिवसा पासून जमेल तेवढी शाळा शिकत कधी शेतात काम कर कधी वडिलांना व्यवसायात मदत यावर जीवनाची सुरूवात केली. मी व माझे घर गावात एकटे आहे ही कमी पणाची जाणीव संस्कार क्षम वयात पुसून टाकली. हे गावच माझे आहे. हे माझे आहे म्हणून सर्वांना आपला वाटतो. ही जगण्याची वाटचाल ते चालू लागले. किराणा दुकान, थोडीशी शेती व परिसरातल वृत्तमान पत्राची एजन्सी घेऊन ते उभे राहिले. आपण उपाशी राहू. उषाला असलेला तुकडा विकू. सातबारा कमी करू पण मुले शिक्षकली पाहिजेत हा जिद्द श्री. रघुनाथ गायकवाड यांनी ठेवली. त्यामुळे मोठा मुलगा इंजीनियर झाला तो पुण्याला नोकरी करू लागला लहान वैभव यांने मात्र आपले नाव वैभव नाव वैभव हे सार्थक केले.

    चि. वैभव रघुनाथ गायकवाड आशा गावात लहान पणी बागडत होते. कौलास घरातला हा मुलगा 2017 - 2018 च्या यु.पी.सी. परिक्षेत देशभरातून नसलेल्या किमान आठ लक्ष परिक्षार्थी मध्ये 551 वा आला आणी केंद्र शासनाच्या उच्चश्रेणी पदाच्या मानकरी ठरला. परवा त्याशी फोनवर बोललो. पिंपळगाव माळवी हे छोटे गाव या गावातल्या एकुलत्या एक तेली घरातला मुलगा. याने लहान पणी घरचे शेत ही राबत राबत चिकटले. किराणा दुकानात पुड्या ही बांधल्या परिसराची पेपर एजन्सी असल्याने घरो धरी पेपर ही वाटले. विउलांची जिद्द मोठी होती मुले शिकली पाहिजेत ही धडपड होती. यातूनच वैभव चिकाटी, मेहनत या बळावर 12 वी मध्ये उत्तम मार्क मिळवू शकले. पुणे नगर रोड वरिल ढोले पाटील कॉलेज मध्ये उर्तीण झाले. एक वर्ष भर नोकरी ही केली. या वेळी वडिलांच्या मित्राने वडीलांना सांगीतले मुलगा कष्टाळू, हुशशार व जिद्दी आहे त्याला तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेला बसवा. आणी वैभव यांची विचार चक्र फिरू लागली. चौकशी करून मित्र हुडकले व दिल्लीच्या वाटेवर निघाले. या दिल्लीत प्रचंड पैसा लागतो याची जाणीव झाली, दर्जेदार क्लास, रहाणे, संदर्भ पुस्तके, जेवण हे कसे भागेल याची चिंता होती. या वेळी उक वसतीगृह हुडकले रहाण्याचा प्रचंड खर्च वाचला. इथे नियोजन, अवलोकन व जिद्द न हरवता, अध्यायनशास्त्र समजुन ते लढू लागले 2017 - 2018 मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत लाखो विद्यार्थीत त्यांनी 551 वा नंबर मिळवला.

    एक सामान्य कुटूंबातील युवक जिद्द, धडपड, सिचोटी या बळावर प्रशासनातील मुख्य घटक बनू शकतात. परवा वैभव यांना विचारले आपण यशा बद्दल काय सांगणार. मी तेली आहे मी ओबीसी आहे. आपल्याला असलेल्या आरक्षणाचा लाभ मला झाला. प्रशासनात नियमा नुसार आपली कामे करण्यास प्राधान्य देणार आहे. आपण गरिब, मागास हि माणसीकता बदलून जर उभे राहिलो त्या साठी नियोजन बद्द लढलो तर यश आपलेच आहे. चि. वैभव रघुनाथ (बाळू) गायकवाड यांना सर्व बांधवा तर्फे हार्दिक शुभेच्छा. 

दिनांक 04-06-2018 20:30:32
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in