गणेश पवार, औरंगाबाद मो.9096983232
देशाच्या राजधानीत, ऐतिहासिक दिल्ली शहरात येत्या 2 जून रोजी तेली समाज बांधवांचा आवाज बुलंद होतोय. तेली समाज बांधवाच्या भव्य दिव्य रॅली आयोजन 2 जून रोजी करण्यात आले आहे. तेली समाज देशाच्या कानाकोप-यात विखुरलेला आहे आणि या समाजाच्या अनेक प्रश्नावर चर्चा घडवून आणण्यासाठी या रॅलीचे महत्व काही वेगळे राहील. तेली समाजाचे वैशिष्टे असे की, देशाच्या अर्थ व्यवस्थेत या समाजाचे व सामाजिक स्तरावर आपले वेगळेपण निर्माण केलेले आहे. या समाजाने आपल्या कर्तव्याचा ठसा उमटविलेला आहे. या सर्व पार्श्वभुमीवर ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. सताधा-यांना या समाजाचे वेगळेपण लक्षात आले पाहिजे तसेच या समाजाची ताकद नेहमी कशा प्रकारची आहे. याचेही आकलण सत्ताधायांना झाले पाहजे. गेल्या अनेक वर्षापासुन हा समाज ग्रामीण भागाऐवजी शहराकडे धाव घेत आहे. अर्थात शहरी व ग्रामीण भागात हा समजा विखुरलेला असला तरी समाजाचे प्रश्न मात्र बिकट बनलेले आहेत. या प्रश्नांची तीव्रता सत्ताधायांच्या लक्षात आली पाहिजे. गेल्या चार वर्षात भाजपा सत्तेवर आहे आणि या चार वर्षाच्या काळात या समाजाचे प्रश्न जैसे थे स्वरुपात आहेत आणि आमचे प्रश्न सुटले पाहिजेत अशी विनंती सत्ताधायांकडे करता यावी या दृष्टीने या तेली एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. माझ्या अशा आकांक्षा मनात ठेवून तेली समाज बांधव या रॅलीसाठी राजधानीत दाखल होणार आहे. या बदललेल्या वातावरणात आपण आपल्या भविष्यासाठी नवी दिशा शोधली पाहिजे, प्रगतीचा नवा मार्ग शोधला पाहिजे हा हेतु समोर ठेवुनच या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या राजधानीत तेली समाज बांधव एवढ्या प्रचंड संख्येने एकत्र येत आहेत. त्यामुळे या एकता रॅलीला ऐतिहासिक रॅली असे संबोधले तर अतिशोकती ठरणार नाही. एक काळ असा होता की, या समाजात एकत्र येण्याची मानसिकता दिसून येत नव्हती. एकत्र या म्हटले तरी प्रतिसाद देण्याची तयारी नव्हती. मात्र आता समाज बदलला आहे, कारण या समाजाने आतापर्यंत खुप काही सहन केले आहे आता मात्र आपण एकत्र आले पाहिजे. संघटीत झाले पाहिजे, विचारांची देवाण घेवाण केली पाहिजे अशा प्रकारची मानसिकता यांच्यात निर्माण झालेली आहे आणि असे वातावरण व अशी मानसिकता तयार होण्याचे कारण हेच की, समाज बांधवांना आता आपल्या सुख दुखांची समाजात निर्माण झालेली आहे. हे समाज हिताच्या दृष्टीने चांगले लक्षण आहे. दिल्लीतील या एकता रॅलीने समाजातील तरुणांना नवी दिशा मिळेल. खरे म्हणजे तेली समाजाची एकता रैली सत्ताधा-यांना झुकविण्यासाठी नसून ती केवळ ताकदतीचे प्रदर्शन घडविण्यासाठी आहे. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आहेत, हे सत्य तेली समाज बांधवाना उभारी देणारे आहे. महाराष्ट्राच्या मंत्री मंडळात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सारखे जेष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांचेही मार्गदर्शन या एकता रॅलीत मार्गदशन होणार आहे. मराठवाड्याच्या व महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला प्रभाव टाकणारे जयदत्तअण्णा क्षिरसागर यांच्यासारखे जेष्ठ राजकीय नेतेही या रॅलीत मार्गदर्शन करणार आहेत. जयदत्तअण्णा हे तेली समाजाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्याही मार्गदर्शनाला महत्व प्राप्त होणार आहे. या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत तेली समाज बांधवांचा आवाज बुलंद होणार आहे. या रॅलीचे वैशिष्टये असे की, या देशातील असंख्य तरुण या रॅलीत आपला सहभाग नोंदविणार आहेत. केवळ तरुणांच्या सहभागामुळेच या रॅलीची दखल दिल्लीच्या राज्यकर्त्यांना घ्यावी लागणार आहे. आपण आपला आवात बुलंद केला तरच राज्यकर्त्यांना जाग येऊ शकते आणि समाजांचे अनेक प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा होवू शकतो. अनेक वर्षानंतर तेली समाज बांधव एकत्र येण्याचा हा योग आलेला आहे. यातून एक सकरात्मक संदेश देशाच्या कानाकोप-यात पोहचणार आहे. संघटन किती आदर्श असते व रॅलीचे आयोजन किती प्रेरणादायी असते याचे दर्श देशातील 125 कोटी जनतेला दिल्लीतील या एकता रॅलीमुळे होणार आहे. त्यामुळे केवळ सत्ताधा-यांचा नव्हे तर देशातील संपुर्ण जनतेचा तेली समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जाण्याची शक्यता आहे. तेली समाजाची ताकद फार मोठी आहे. हे चित्र या रॅलीतून स्पष्ट होणार आहे. तेली समाजाची ही ताकद केवळ समाजालाच नव्हे तर देशालाही बळ देणारी ठरु शकेल. देशाच्या कानाकोप-यातून या रॅलीसाठी मोठ्या संख्येने येणाया तमात समाज बांधवांना आतापासूनच मनपुर्वक शुभेच्छा
गणेश पवार, औरंगाबाद मो.9096983232