पंढरपुरच्या विठ्ठुराायाला वारकरी सांप्रदाय आणि त्यांचा महिमा वर्णन करणारे अद्वितीय असे हे संत वांग्डमय हा मराठी संस्कृतीचा अनमोल असा गाभाच आहे असे म्हणायला हरकत नाही.
महाराष्ट्रात अनेक राजकीय स्थालांतरे झाली एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात परकीय सरकारे पण आली तरीही विठु माऊली च्या पंढरपूर वारीची परंपरा आज हजारो वर्ष वारकरी सांप्रदयात चालतच आलेली आहे.
या वारकरी सांप्रदयात अनेक जाती धर्मातील साधु संत जन्मास आले तसेच आमच्या तेली समाजात (जातीत ) जगतगुरू तुकाराम महाराज यांचे अभंग गाथेचे लेखनिस संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांचे नाव संत वाग्डमयात सुर्वण अक्षरांनी लिहायला पाहिजे होते परंतु तेली समाजाच्या दैव योगाने तसे झाले नाही ही शोकांतिका आहे.
जगतगुरू तुकाराम महाराज देहूगावचे तसेच संताजी सुदुंबरे गावचे यादोघाचे गावाच्या मध्यावर असणारा भंडारा डोंगर त्यातील ईश्वर निर्मित फळा फुलासनी भरलेला हिरवेगार परीसर पाहुन त्यातील तुकाराम महाराजाचे मुखातुन वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी अशा मनाला उल्हासित करणार्या काव्यपंक्ती अंतरमानतून बाहेर पडल्या शिवाय राहाणार कश्या परंतु त्यांना त्याची जाणीवही नसली पाहिजे हे संताजींच्या लक्षांत आले असावे व त्यांनी जनसामान्याना समजेल अशाा अनमोल सुंदर अक्षर रचनेने लिखान केले तिच ही अभंग गाथा.
हीच खंत मनाला गप्प बसू देत नसणारे बृहन्मुंबई तेली समाजाचे माजी अध्यक्ष दयारामशेठ हाडके व माजी सचिव श्री दिलप खोंड यांनी संताजी यांच्या कार्याला उजाळा देण्याचा चंग बांधला लालबाग परेल परीसरात निघणार्या हिंदू नव वर्षाच्या रथ चरित्र यात्रेला सहभाग घेऊन प्रत्येक वर्षी रथयात्रेत संताजींच्या जिवनावर रथ सादर करून तेली समाज संस्थेस मानाचे स्थान मिळवुन दिले, त्यात अभं गाथा लिहणारे संताजी, पांडुरंग वारी, दिंडी खंडेराय जागरन गोंधळ, या पेक्षा घाणा घेत असणारे संताजी महाराज व त्यांचे भेटीस आलेले तुकाराम महाराज व चारीता गोधन गुंतले वचन - येणे झाले एका तेलीया कारणे आम्ही वैकुंठवायी आलो याच कारणाशी अश्या अभंग पंक्ती सह संताजींचा समाधी सोहळा या रथ यात्रेत प्रथम क्रमांक मिळवून तेली समाजाच्या शिरपेचात मानांचा तुरा रोवला गेला होता. त्यामुळे लालबाग परीसरात तेली समाजास मानाचे स्थान मिळलेय हे सत्य नाकारता येत नाही.
मुंबईतील वारकरी मंडळास व त्यात सहभागी वारकरी सांप्रदायास घरातील समस्या व कामावरील रजे मुळे आषाढ कार्तिकेच्या पांडुरंग वारीस सहभाग घेता येत नाही ही खंत मानत बाळगून मुंबईतील वारकरी प्रबोधन समीतीचे अध्यक्ष आदरनिय श्री. रामेश्वर शास्त्री व सचिव श्री. राजारानिकम (नाना) साहेब व इतर सहकारी बंधुनी नविन वर्षाच्या स्वागता प्रित्यर्थ पहिल्या रविवारी गेली अनेक वर्षे मुंबईत पाडुरंग पालखी सोहळ्याचे (दींडी) आयोजन करत असतात या वर्षी 7 जानेवरी रोजी मुंबईतील कॉटन ग्रिन येथिल राममंदिर येथुन पांडुरंग पालखी प्रस्थान होऊन शिस्त बंद्ध टाळमृदृंगाचे निनादात आनंदाने विठ्ठलाचे गुणगाण गात मुंबईतील पुरातन प्रति पंढरपूर असणार्या वडाळा येथिल विठ्ठल मंदिरात सांगता होताना वारकरी सांप्रदयास विठ्ठुरायाच्या दर्शनाने जे समाधान दिसत होते अर्थाातच त्यांच्या मुखातून रूप पहातालोचनी सुख झाले हो साजणी अश्या अभंग गाथेतील शब्द तोडात घोळत असणारच हे सत्य आहे.
अश्या या पांडुरंग पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सांप्रदायास जगतगुरू तुकाराम महाराज यांचे अभंग गाचिे मुळ लेखक तेली समाजाचे श्रद्धास्थान संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराजाच्या लेखन कार्याची ओळख व्हावी यास्तव शाहीर परीषदेचे अध्यक्ष श्री. मधुकर नेराळे दादा, श्री. दयाराम शेठ हाडके व समाज कार्य ज्याच्या नसार नसात भरलेय असाा तरूण कार्यकर्ता श्री दिलीप खोंड यांनी पुढाकार घेऊन सर्वाना सहभागी करून वारकरी सांप्रदयाचे स्वागत करण्याचे आयोजन केले. रविवार 7 जानेवरी सकाळी लालबाग संताजी चौकात संताजी कार्याचे भव्य बॅनर सर्वाचे लक्ष वेधून घेत होते त्यात विठ्ठल माऊली सुदुंबरे संताजी मंदीर, समाधी तुकाराम महाराज आगमन अश्या भव्य बॅनर पुढे उंच स्थानी सजिव अशी संताजींचह मुर्ती स्थानानपन्न केली होती अश्या आनंदी वातावरणात समाज बांधवात उत्साह दिसून येत होता. विठ्ठल भजानाच्या धुंदीत सर्व हरवून गेले होते.
सकाळी दहा वाजता पहिल्या पालखी संताजी चौकात येताच श्री. मधुकर शेठ नेराळे दादा, अॅड. राजेंद्र कोरडे, श्री. रघुनाथ महाले साहेब, डॉ. विनोद व्यवहारे, जेष्ठ समाज सेवक, दयाराम शेठ हाडके यांनी प्रत्येक पालख्याचे स्वागत करत होते तर, समाज बांधव वारकर्यांना बिसलेरी पाणी बॉटल चहा नाष्टा वाटत होते तर सामाज ीगिनीना हळद कुंकु लावत होत्या अश्या सामाजिक कार्यात श्री दिलीप खोंड यांनी संताजीचे लेखनिस प्रतिक म्हणून उत्तम प्रतिचे बॉलपेन वाटप केले. प्रदीप कसाबेनी उत्तम प्रतिचे संताजीचे फोटो वाटले तर दिगंबर साखरे यांनी संताजीचे पॉकेट फोटो वाटले तर श्री दयारामशेठ हाडके यांनी विठ्ठल तुकाराम संताजी, ज्ञानेश्वर माऊली पंढरपूर अश्या सुंदर फोटोत महत्वाचे संतू तुक्याची जोडी लावी अभंगास गोडी असा संदेश युक्त लहान स्टिकर वाटले, अश्या कार्यक्रमात संताजी सेवा मंडळ भायखळा, तेली सेवा समाज लोअरपरेल चेंबूर तेली समाज, बृहन्मुबई तेली समाज पनवेल तेली समाज बांधवाची उपस्थिती सहकार्य लाभले, सर्वांचे श्री दिलीप खोंड यांनी अभार मानले.