कडा - येथे तेली गल्ली मध्ये भवानी मातेची मंदिर होते. या मंदिराची समाज बांधवांनी उभारणी गाव पातळीवर निधी गोळा करून केली आहे. याच मंदिरात श्री संत संताजी यांची मुर्ती आसावी अशी इच्छा श्री. चंद्रकांत सासाणे यांनी समाज बांधवा समोर व्यक्त केली. सर्वानी एका मुखाने त्यास मान्यता दिली. श्री. सासाणे यांनी पंढरपूर येथे जावून श्री. संत संताजी यांची अभंग लेखन करितानाची सुबक मुर्ती स्वखर्चाने बनवुन आणली. कडा येथे वाजत गाजत मिरवणूक काढून मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना मंदिरात केली. कडा केरूळ व इतर ठिकाणचे समाज बांधव या वेळी उपस्थित होते. श्री. चंद्रकांत सासाणे हे कडा येथिल प्रतिष्ठीत समाज बांधव आहेत. उमेदीच्या काळात पडेल मिळेल तो उद्योग धंदा केला. काही काळ आठवडे बाजारात ही ते पाल ठोकून बाजारहाट करीत होते. एका शुन्यातुन आज ते यशस्वी व्यापारी झालेत बीड व नगर जिल्हा स्तारावर ते तेली कार्यात स्वत:ला झोकून देऊन काम करत असतात. कै. प्रकाश लोखंडे यांच्या बरोबर काम करिताना महाराष्ट्र तैलिक महासभेचे रोपटे लावताना कामाची संधी मिळाली होती. विविध समाज उपक्रमात ते सहभागी असतात. या सामाजीक उपक्रमात सौ. उषा चंद्रकांत सासणे यांचे व दोन ही चिरंजीवांचे सहकिार्य मोलाचे मानतात.