उभा पाऊस अंगावर घेऊन वावरणारे वाडा हे गाव. या गावातून केदारी कुटूंब पुण्यात आले. जरी पुणेकर झाले तरी आपल्या मातीकडे लक्ष ठेऊन होते तेंव्हा पुणे कॉम्प म्हणजे लष्कर विभाग होता. इंग्रजांचा वावर होता. विठ्ठल केदारी यांना धडपडीचा मार्ग सापडेना त्यांनी एक पाटी घेतली या पाटीत ताडीच्या बाटल्या ठेवल्या व लष्कर भागात ते घरो घरी जावून ताडी विकू लागले. धंदा कोणता या पेक्षा प्रामाणीक पणा सचोटी व व्यवसायाची गणिते महत्वाची यातुनच ते ताडी दुकानाचे मालक झाले. यातुनच ते एक यशस्वी उद्योजक झाले. ताडी व दारू विक्रीचे ठेकेदार झाले. पुर्वी इंग्रज काळात प्रवासा साठी टोल द्यावा लागे टोल नाका जागो जागी असत. या टोल नाक्याचे ते फक्त पुणे परिसराचे नव्हे तर पुर्ण महाराष्ट्राचे ठेकेदार झाले अफाट बुद्धिमत्ता व्यवहारातील चाणाक्ष पणा, माणसे ओळखणे, जोपासणे व त्यांना कामाला लावणे हि अजब किमया त्यांनी वापरली यामुळे त्यांना एक प्रतिष्ठा मिळाली.
इंग्रज राजवटीत देशाचे समाजाचे जे काय नुकसान झाले हे ही सत्य आहे. परंतु यांच काळात शिक्षणाची सुरूवात झाली हे ही सत्य. इंग्रज अधीकारी मिशनरी वृत्तीचा होता. त्यांनी विचार केला महाराष्ट्रात मिशनरी का फोफावत नाही तर लोकांची तुकाराम भक्ती त्यांने शास्त्री व पंडीत यांना तुकोबांचे मोडीतील अभंग देवनागरी करण्यास लावले पण पंडीत व शास्त्री यांनी जाणीव पुवर्कग् तळेगाव येथील वह्या बाजुला सारल्या. दत्तो वामन पोतदार , वि. ल. भावे यांनी सत्य जगा समोर आणले. जाग्य झालेल्या तेली समाजाने मुंबई येथे संत संताजी पुण्यतिथी पहिली केली. वि. ल. भाव्यांनी आगदी ब्राह्मण समाजाचा कडाडून विरोध सहन करून संत संताजींच्या वह्या वरून पहिली संत तुकाराम गाथा मुद्रित केली याची जाणीव समाजाला झाली. आपल्या कडे सर्य आहे. आपल्या या सुर्याला काजवा बनविले आहे. याची जाणीव प्रथम कुणाला झाली असेल तर ती रावसाहेब विठ्ठलशेठ नारायण केदारी यांना मुंबईकर मंडळी ते एकत्र आले आणी सुदूंबरे येथे गेले येथील स्थानीक मंडळींनी पिड्यान पिड्या संभाळलेली दौलत म्हणजे संताजी समाधी या समाधी जवळ जाण्यास वाट नव्हती या परिसरात झाडे वाढलेली होती. रावसाहेब केदारी पहिले पुढे गेले. आणि त्यांच्या हाताने झाडे दुर केली. आणि मोजून २०/२५ बांधवांना साक्षीने पहिली पुण्यतिथी साजरी करणारे रावसाहेब होते. पुण्यतिथी संपन्न होताच त्याच ठिकाणी पुण्यातील मंडळी, मुंबईतील मंडळी सुदूंबरे पंचक्रोशीतील समाजातील मंडळी सहविचार करू लागली आपण समाजाला काजवा शोधत होतो पण हा तर महारष्ट्राचा सुर्य सापडला. रावसाहेबांनी या सुर्याला कसे जोपासता येईल विषयी मार्गदर्शन केले. पुण्याला परतले ते एक ध्येय घेऊन या विचार प्रणालीतून उभे राहिलेमाझा उद्याचा समाज हा या सुर्याची किरणे झाला पाहिजे. यासाठी त्यांनी आपली महाराष्ट्रभर पसरलेली आपली प्रतिष्ठा पैसा व बुद्धी मता खर्च केली. कधी कधी विचार करतो. जर रावसाहेब नसते तर जरी दत्तो वामन पोतदार किंवा वि. ल. भावे यांनी त्यांच्याच ब्राह्मण जातीचा कडाडून विरोध अंगावर घेऊन सुर्य दिला असला तरी. या साठी एक उदाहरण देतो. पुणे परिसरातील ग्रामीण भागातील एका प्रतिष्ठीत बांधवांचा दशक्रिया विधी सुरू होता हे प्रवचनकार आपल्या प्रवचनात प्रत्यक्ष वि.ल. भावे, व दत्तो वामन पोतदार यांच्यावर टिका करीत होते. जवळ जवळ शंभर वर्षीनंतर ही अवस्था असेल तर त्यावेळी या दोघांनी ब्राह्मणीपणाचा विरोध किती सहन केला आसेल हे स्पष्ट होते. सुर्य रावसाहेबांनी घेतला नसाता तर ब्रह्मण मंडळींनी याचा काजवाच केला असता. ही वास्तवता ज्या दिवशी आपण विसरू त्या दिवशी आपल्या जवळ आपला सुर्य नसेल हे अबाधित सत्य आहे.
रावसाहेबांनी सुदूंबरे येथे समाधी स्थळी प्रथम एक पत्र्याचे शेड उभे केले. पुण्याच्या शहर व ग्रामिण भागात ते गेले. व्यवसाया मुळे महाराष्ट्रात फिरताना त्यांनी संताजी सुर्याची किरणे पोहच केली. सत्य सांगणारे समाजाचे प्रतिष्ठीत व वजनदार बांधव पुढे असल्याने हे पटत होते. हे सर्व रूजत होते. परंतु रावसाहेबांचे नाव दिसताच असत्य सांगणारे घरात जावुन बसत ही त्या वेळची वास्तवता होती. समाज बांधव त्या ठिकाणी पुण्यतिथीला एकत्र येत. रावसाहेबानी आगदी दोन दिवसात स्वत:च्या पैशाने मंदिर उभे करू शकले आसते परंतु त्यांनी तसे केले नाही माझ्या पेक्षा संताजी हा सुर्य मोठा आहे. समाजाच्या कष्टाचा, त्यागाचा एक पैसा हा महत्वाचा आहे. या सुर्याचा किरण प्रत्येक बांधव व्हावा ही त्यांची स्पष्ट भुमीका हीच भविष्याला पोषक ठरली त्यांनी एक एक पैसा गोळा केला तो नसेल तर घरचे धान्य ही घेतले. आता मंदिर उभारावयास सुरूवात झाली निधी अल्प होता. काम एवढ्यात पुर्ण होणार नव्हते. रावसाहेबांनी यावर तोडगा काढला. आपण श्रमदान करू दगड, विटा चुना (त्यावेळचे बांधवकामाचे साहित्य) आपण गवंड्याच्या हाता खाली देऊ बांधकामाच्या पहिल्या दिवशी रावसाहेब पुण्यातील आपल्या सोबत्यांना घेऊन गेले. स्वत: डोक्यावर दगड घेतले. गवंड्याच्या हाता खाली उन्हात राबू लागले याचा परिणाम एक झाला एक रावसाहेब, एक प्रतिष्ठटीत बांधव श्रमदान करतो हे दिसताच परिसरातील बांधव त्यात उतरले आणि अल्प पैशात मंदिर उभारले.
रावसाहेबांनी यात लक्ष दिले नसते तर ? रावसाहेबांनी हा सुर्य जोपासला नसता तर ? हा उलटा प्रश्न मला जेंव्हा पडतो तेंव्हा मला उत्तर सापडते. कारण श्रमदान करणारे रावसाहेब एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी या ठिकाणी नियोजन बद्ध विचाराची बैठक निर्माण केली. त्यामुळे समाज बांधव एकत्र येऊ लागले. क्रांती सुर्याच्या किरणाचेे विचार वंश होऊ लागले हा विश्वास हीच खरी वाटचाल होती. जसे बांधवांची संख्या वाढली तसे रावसाहेब शोध घेऊ लागले समाधी परिसरातील शेती ही जर मिळाली तर इथे कायम उत्पन्न होईल. इथे भविष्यात काही तरी करता येईल. यासाठी रावसाहेबांनी धडपड सुरू केली या जागेची मालकी ज्या शेटे घरात होती त्यांचा शोेध घेतला. पुणे येथे डेक्कन परिसरात तेंव्हा श्रिमती शेटे वास्तव्याला होत्या. त्यांचे कडे ते गेले रावसाहेब म्हणताच त्या सर्व ७/८ एकर शेती देणगी देत होत्या परंतु रावसाहेबांनी असे न करता नाम मात्र पैसे देऊन ती शेती समाजासाठी खरेदी केली. आज आपण मागे पहाण्याचे कष्ट कमी घेतो. आज आपण भुतकाळ विसरतो. आज आपण आपले पणा नजरे आड करतो. आज जे वैभव आहे त्या कडे फक्त पहातो परंतू याची बैठक निर्माण का व कशी केली याचा क्षणभर जर विचार करणार नसु तर भविष्य अवघड आहे. कारण रावसाहेबांनी समाजजागा करून हे उभे केले. त्यांच्याकडे पैसा प्रतिष्ठा होती या बळावर ते स्वत: साठी हे सर्व क्षणात करू शकले आसते परंतु त्यांनी जे केले ते समाजा साठी केले. संताजी हा सुर्य त्यांनी आपल्याला देताना त्यांचे हात भाजले ही आहेत.
डोक्यावर पाटी घेऊन आयुष्यात उमेदवारी करणारे रावसाहेब कितीही मोठे झाले तरी त्यांनी सामान्य माणुस आपला मानला. यासाठी कॉम्प एज्युकेशन सोसायटीत त्यांनी शैक्षणिक शिष्यवृतती सुरू केली. समाजातील गरिब विद्यार्थ्यांना त्यांनी शिष्यवृत्ती सुरू केली. आसे दहा विद्यार्थी ते दरवर्षी दत्तक घेत. पुणे शहराच्या पुणे कॉम्प परिसरातील जडण घडणीत ते सर्वासमोर असत. ते नगरसेवक होते. आपला वेगळा ठसा ते उमटवत आसत. त्यांचे संबंध इंग्रज प्रशासनाची चांगले होते. परंतु स्वातंत्र्याचा महाकुंडात जे जे सामील होते त्यांना त्यांनी आश्रय दिला होता. स्वातंत्र्य सेनानी मुरलीधर व्हावळ हे त्या पैकी एक होत. समाज शिकला पाहिजे समाज सुज्ञ झाला पाहिजे ही त्यांची विचार प्रणाली होती. आपल्या रहात्या घरा समोर त्यांनी संताजी वाचनालय सुरू केले. अनेक दुर्मीळ पुस्तके त्यांनी तेथे उपलब्ध करून दिली होती. स्वत: ते त्या ठिकाणी नियमीत जात त्यामुळे समाज बांधव ही जात होते. मनाची घडण व चांगल्या विचाराची साठवण होत होती.
एका चहावाल्याचे कौतुक करतो. जरूर करावे या विषयी माझे दुमत नाही. चहा वाला उच्चपदावर ही जाऊ शकतात. ते या देशाच्या धर्मग्रंथा मुळे नव्हे तर या देशाच्या घटने मुळे. परंतु असा कोणताच आधार नसताना डोक्यावर पाटी घेऊन वणवण भटकणारे विठ्ठल केदारी यांनी समाजा विषयी निष्ठा ठेऊन संत संताजी हा क्रांती सुर्य जगाला दिला. त्या वेळची सामाजिक धार्मीक, राजकीय ठेवण ही समाजाला आडगळीत ठेवलेली होती. या समाजाला एक अस्मीता त्यांनी तयार करून दिली. पुण्याच्या घडणीचे शिल्पकार ते झाले. पुर्ण महाराष्ट्रातील टोल नाक्याचा ठेका ते संभाळत होते. ही एक समाजीक क्रांती होती. ही एक व्यवसायीकि प्रगती होती ही एक समाज सेवा होती ती त्यांनी केली या पद्धतीत देशभार जे कोण आसत त्यांना इंग्रज शासन सन्मानित करीत आसे आसा हा बहुमान त्या काळी विठ्ठलशेठ नारायण केदारी यांना इंग्रज शासनाने रावसाहेब ही पदवी देऊन गौरवण्यात आले.
पुण्याच्या इतिहासातील हे एक सोनेरी पान. पुण्याच्या वैभवाची ही एक साठवण समाजाच्या परंपरेचा हा एक महामार्ग. या मार्गावर त्यांचे नातू श्री. प्रकाशशेठ केदारी. हे लहान पणापासून समाजसेवेचे बालकडू पेलेले. विद्यार्थी दशे पासुन सेवाभावी वृत्ती जोपासलेले यामुळे तरूण वयातच युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी झाले. आपल्या धडपडीतून ते पुणे कॉंन्टोन बोर्डाचे सदस्य म्हणून लोक समुहातुन निवडून आले. या बोर्डाचे लोक नियुक्त उपाध्यक्ष ही झाले. या देशाच्या घटनेचे शिल्पकार इतर मागास वर्गीया साठी ३४० व्या कलमाची प्रथम नोंद करणारे आणि इतर मागासांना न्याय मिळत नाही म्हणताच मंत्री पदाचा राजीनामा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक महामानव या महामानवाचा पुतळा पुणे कॅम्प परिसरात झाला पाहिजे ही त्यांची जिद्द. या जिद्दीसाठी त्यांनी आपल्या काळात या परिसरात भव्य अंबेडकरांचा पुतळा उभा केला. श्री. प्रकाशशेठ हे एक नेतृत्व आसल्याने त्यांना महाराष्ट्र शासनाने पिंपरी चिंचवड येथील प्राधीकरणाचे अध्यक्ष पद दिले. या काळात सर्वसामान्य व समाजातील अनेकांना त्यांनी संधी दिली. यामुळे प्राधीकरणात अनेक समाजबांधव वास्तव्य करून आहेत. रावसाहेब केदारी यांचे नातू म्हणून नव्हे तर मी एक समाजाचा घटक आहे ही भुमीका ठेवून ते संत संताजी पुण्यतिथीला उपस्थीत रहातात. या उपस्थीत काही बाबी समोर आल्या पूर्वजांच्या त्यागावर उभी राहिलेली धडपड वादळात सापडली होती. उत्सवाला निधी देणारा हुडकवणे. जो निधी देईल त्याला मानपान यातुन वादळ निर्माण होत होते. श्री. प्रकाशशेठ यांची स्पष्ट भुमीका समाजाचा घटक सर्वसामान्य असेना का परंतु त्याला ही मान मिळावा वादळ शांत व्हावे समाजात एकोपा ठेवून विकास करावा. यासाठी श्री. प्रकाशशेठ यांनी त्या काळात काही देणगीदार समाजाबाहेरचे शोधले त्यांच्याकडून कायम निधी मिळवला हा कायम निधी बँकेत ठेऊन येणार्या व्याजातुन महाप्रसाद करावा ही त्यांची सर्व सामान्य बांधवा विषयी भुमीका समाजा समोर आली व त्याप्रमाणे त्यांनी निधी ही उपलब्ध करून दिला एक समाज घटक म्हणुन ते संताजी पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थीत रहतात. समाज एक संघ रहावा या साठी आपली मत मांडतात कोण पदाधीकारी आहे यात लक्ष न देता आपले सहकार्य एक घटक म्हणुन देतात. समाज बाधवांच्या विश्रांती साठी खोल्या व उत्सव अध्यक्ष असतांना निधी ही त्यांनी दिला.
जवळ शुन्य घेऊन वाटचाल करणारे कै. रावसाहेब विठ्ठल नारायण केदारी यांच्या त्यागाला निष्ठेला व कार्याला सर्वांतर्फे पुन्हा एक वेळ अभिवादन.