मराठा आरक्षणाला सहकार्य करणार्या तेली संघटनांनी मराठा संघटनांत जावे ? भाग 2
कुमठे ता. कोरेगाव जि. सातारा येथिल हुतात्मा गीताबाई गणपत तेली
महाराष्ट्र शासनाचे स्वतंत्र्य सैनिक चरित्र कोश खंड तिसरा 1980 व त्यानंतर 2016 साली प्रसिद्ध केला आहे. 2016 ची आवृत्ती माझ्या संग्रही आहे या मध्ये तेली समाजाचे सातारा येथील 64 स्वातंत्र्य सैनिकांची नावे व कार्य नमूद केलेले आहे. या मध्ये हुतात्मा गीताबाई गणपती तेली या तेली समाजाच्या भगीनींने भूमीगत राहून स्वातंत्र्याचे काम केले. 1942 च्या आंदोलनात या सक्रीय होत्या. पोलिसांनी कुमठे गावात शोध घेतला घर उद्धवस्त केले दहशत निर्माण करून या महिलेचे प्राण घेतले. ही हुतात्मा महिला कुमठे, ता. कोरेगाव जि. सातारा येथील होती. स्वातंत्र्य संग्रामात मोजक्या स्त्रीया हुतात्मा झाल्यात त्यामधील ही महान महिला आहे. राहिलेल्या 64 तेली बांधवांनी तुरूंगवास भोगला. संसार उध्वस्त केला. काही कायमचे अपंग झाले. हा 64 चा अकडा शंभरी पार करू शकणार आहे. कारण कै. सिताराम बापू शेडगे सारखे अनेक बांधव आहेत की त्यांचीच नोंद झाली नाही. याच सातारा जिल्ह्यात विरांगणा ताई तेलीण होऊन गेली. स्वातंत्र्यात या समाजाला मिळाले काय ??? मंडल आयोग लागु होण्या पुर्वी ग्र प. सदस्य दुरर्मीळ होते. गावात जगण्याची साधने तुटपुंजी होती. जगण्याची लढाई तेल घााणा उध्वस्त झाल्या नंतर 1965 पासून आज पर्यंत लढत आहे. जिद्द मोठी मंडल आयोग मंजुर झाल्या नंतर समाज खडबडून जागा झाला. यानंतर जि. प. सदस्य पं. स. सदस्य ग्रा. पं. सदस्य व एक मुलगी तर विवाहापुर्वीच कोरेगाव तालुका सभापती होती. मला या ठिकाणी हुतात्मा गीताबई गणपत तेली व सभापती हे वर्तुळ या जिल्हास्तरावर पुर्ण झाले याची नोंद ठेवावी वाटते.