मराठा आरक्षणाला सहकार्य करणार्या तेली संघटनांनी मराठा संघटनांत जावे ? भाग 3
हा आपला दैदिप्यमान इतिहास विसरू नका.
पश्चिम महाराष्ट्राचे एक समाज नेते मराठा मुकमोर्चा मध्ये सक्रिय होते. मराठा समाजा समोर लोटांगण इतके की या आंदोलनाला दाम व सर्वशक्ती पुरवली. असे समाज बांधव व इतरही सापडले परंतू संपर्कात ठेऊन सांगीतले चुक लक्षात आली. अनेक बांधव शांत घरात बसले. गावची दुध डेरी ते केंद्रीय सत्तेची पदे याच समाजाकडे आर्थिक, सहकार, राजकीय नाड्या यांच्याकडे राजकीय पक्ष कोणता याला कधीच महत्तव नाही. फक्त नाड्याजवळ यातील प्रस्थापीत मराठ्यांनी आपला विकास केला. पण गावातील भावकीतील इतर समाजाचा विकास ते करू शकले नाहीत त्यात देश स्वातंत्र्यासाठी तेली पाहिजे. त्यात शकडो बांधव होते. स्वातंत्र्या साठी मोजक्या महिला लढत होत्या. त्यात तेली महिला होत्या. हुतात्मा झालेल्या राज्यात शंभर एक महिला असाव्यात त्यात तेली महिला अग्रेसर आहे. स्वातंत्र्यात आपला विकास झला ??? का झाला नाही तर आपण स्वातंत्र्यासाठी लढणार्या उध्वस्त झालेल्या हुतात्मा झालेल्या भगीनींचे व बांधवांचे कुठेच स्मरण ठेवले नाही. ही आपली मंडळी गावचे तेली, कारू नारू असूनही घरावर तुळसीपत्र ठेवून लढत होती. त्यांनी गावचा पाटील इंग्रजाच्या नजरेत आहे तो. इंग्रजाचे हुकूम मनतोय इंग्रजांची बंदूक, त्यांचे काठी याला परवा नकरता या भूमीतील तेली बांधवानी स्वातंत्र्याचा लढा लढला. मग आज ही मरगळ का आली. कुठेत आमचे स्वातंत्र्य सैनिक कुठे आहे आमची हुतात्मा भगिनी ती आमची परंपरा का मोडत आहे ? हा प्रश्न उभा करणे हा काहींना गुन्हा वाटेल ही पण तो उभा करणे ही काळाची गरज आहे.