मराठा आरक्षणाला सहकार्य करणार्या तेली संघटनांनी मराठा संघटनांत जावे ? भाग 4
हे समजले खरे खोटे पण ..... ?
मराठा आमचे भाऊ आहेत. सामाईक प्रश्न बाबत प्रसंगी एकत्र ही लढतो पण हा समाज मोठ्या भावाची भुमीका न बजवता हाक्क हिरावून घेतो. या बद्दल मी स्वत: विपूल लेखन केले आहे. इतर मागास वर्गीय मंडळाचे दोन सदस्य फक्त ओबीसी हे दोघे ही प्राचार्य त्या संस्थेचे पालक मालक उच्चवर्णीय नोकरीची दोरी त्यांच्या ताब्यात. म्हणजे इथे मर्यादा. पुन्हा हे दोन अभ्यासू आहे ते काही बाबत मान्य केले त्यांची निवड झाली म्हणजे मुख्यमंत्र्यानी आपली सोय पाहून नेमणूक केलेली मराठा समाजाला आमचे आरक्षण देऊ नका. मराठा कुणबी ओबीसी होऊ शकत नाहीत. म्हणून काही ओबीसी बांधवांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मराठा खरेच दुर्बल आहेत का ??? या साठी इतर मागास वर्गीय आयोगाला शोध घेण्यास सांगितले रितसर काम काज महाराष्ट्रात सुरू झाले. या आयोगात दोन फक्त ओबीसी एक भटका समाज सदस्य अध्यक्षा सह 4 मराठा समाजाचे असा हा आयोग प्रत्येक जिल्हा स्तरावर जन सुनवणी घेणार ? हा आयोग सातारा येथे आला होता मला उपलब्ध झोलेली माहिती खरी का खोटी हा ही शोध मी घेतला परंतू. परस्पर वेगवेगळी मते समोर मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून निवेदन देऊन पेपर मध्ये बातमी ही काही नी प्रसिद्ध केली. हे योग्य का याचा विचार व्हावा.
कारण या जिल्ह्यात जी हुतात्मा झाली ती हुतात्मा गीताबाई गणपत तेली व शकडो तेली स्वातंत्र सैनिक यांनी समता बंधूभाव व स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले ते मुळात आपन विसरून दबावा खाली वागणे या सातरच्या भुमीला भुषण नाही.