प्रबोधन रचना शुन्य तर वधु वर मेळाव्यांचे सुगीचे दिवस (भाग 2)
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
पुणे व तेली गल्ली मासिक मोफतचे शिल्पकार
आजच्या समाज विचाराचे सत्य पण कडू वास्तव आपना समोर ठेऊन चालुया श्री. शाम भगत व इतर मंडळींनी प्रथम पुणे येथे वधू वर मेळावा घेण्याचे ठरविले. आणी तो छोटा का होईना त्याला एक सुरूवात झाली. पुण्यात सुरू झालेला वधु वर मेळावा नाशीक मध्ये सिमेंट क्रांक्र्रीट मध्ये उभा राहिला. येथील यशस्वी पणाचे पुर्ण निरिक्षण न करताच भव्य दिव्य पणा व झगमगाटात वावरणारे नेते. त्यांचे मोठे पण आपल्या ही गावी यावे यासाठी जागो जागी बांधव जागे झाले. समाजाच्या पैशावर समाजाच्या वधु वर प्रश्नावर काम करता येते. महिना दोन महिने राबावे प्रचंड पैसा गोळा करावा. त्यातून भव्यदिव्य मेळावे नाशीकला हजारो आपल्याकडे शेकडो. पण जिद्द व धडपड शांत बसू देत नव्हती . त्यामुळे मेळावे भरू लागले. आशा या भव्य दिव्य मेळाव्यात समाज सेवा आहे ही वस्तुस्थीती मान्य करून सांगावे वाटते कॅमेराचा प्रकाश झोत व माईक यावरची कमांड त्यालाच का मला का नाही ही इर्षा शहरो शहरी गावा गावात शिरली आणी समाज सेवे साठी नवा संघर्षाचा महामार्ग तयार झाला आहे. हा संघर्ष इतका शिंगेला पोहचला आहे की समाजाची, आर्थीक, सामाजीक, राजकीय व सांस्कृतीक कोंडी करणार्या मराठा व ब्राह्मण समाजा समोर हे ब्र ही काढू शकत नाहीत. या मंडळींची इतकी माणसिक जडण घडण आज तयार झाली आहे. ज्यांनी कोंडी केली त्या मराठा समाजा कडून देणग्या घेऊन त्यांना निंमत्रीत करून ही मंडळी आम्ही तुमचे लाचार, गुलाम व अश्रीत आहोत हे ही सिद्ध करतात या सगळ्या भोंगळ्या पणावर मी लिहीले नुसते उपदेश करणे ही साधी सोपी गोष्ट आहे. उपदेश करणार्याला काहीच पदरमोड करावी लागत नाही . परंतू पूर्वीचे गावकूस व आजच्या तेली गल्ली मासिकाने 1982 पासून एक स्वत:चा रस्ता निवडला. आज तो पक्का झाला. 1983 पासून आज पर्यंत काही लाख वधु वरांची माहिती प्रसिद्ध केली आहे. परंतू या साठी कोणाची कोणतीच फी घेतली नाही. यातून हजारो लग्न जमलीत या लग्न झालेल्या सुरूवातीच्या वधु वरांच्या मुला मुलींची लग्न जमवीण्याची प्रक्रिया ही सुरू झाली या ही पुढचा पल्ला आम्ही गाठला आहे. 2016 ला पुण्यात मोफत मेळावा यशस्वी केला. या वेळी मासिकांच्या वर्गणीदारांना एक हजार वधू वरांचे पुस्तक मोफत दिले. 2017 मध्ये अ. नगर शहर तेली समाजाच्या सहकार्यातने 2300 वधु वरांचे पुस्तक भव्य मेळाव्यात परिचय करून देणार्या वधुवरांना मोफत दिले. एवढे करून 72 हजार रूपये शिल्लक राहिले ते पैसे सुद्धा स्थाानीक मंडळींच्या समाज कार्यासाठी तसेच ठेवले.