प्रबोधन रचना शुन्य तर वधु वर मेळाव्यांचे सुगीचे दिवस (भाग 3)
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
देशमाने तुम्ही लिहा आम्ही कपडे संभाळतो.
वधु वर मेळाव्यातील चांगल्या बाबींचा गौरव होतो. तो गौरव जरूर करावा पण ज्या नको त्या गोष्टी यात आहेत त्यावर लेखन करणे बोलणे म्हणजे समाजद्रोह करतोय. ही समतजुन आम्ही कृतीतून उतरवली यातून कोथरूड येथील संताजी प्रतिष्ठणचा मोफत मेळावा. पुणे तिळवण तेली समाजाच्या मेळाव्यासाठी मोफत प्रवेश व मोफत जेवण ही परिवर्तननाची वाट चाल उशिरा को होईना बदल घडला या बाबत ही मंडळी अभिनंदनास पात्र आहेत. गत दिपावली पासून पुणे शहर व ग्रामिण भागात आठ वधुवर मेळावे झालेत. यात ग्रामिण भागत एक पिंपरी चिंचवड दोन व पुणे शहर पाच झालेत. दरम्यान आनेकांनी सांगीतले तुम्ही लेखन करा. ही कर्ती, शहाणी सवरती मंडळी किती वहावत चालेली आहेत. त्यांना थांबवा समाज कार्य की इर्षा कि स्वत:च्या मोठे पणा साठी समाजाच्या पैशावर उतमात काहींनी हे ही सुचवले. मराठा समाजाचे समाजावर झालेले अतीक्रमण, मा. मोदी तेली म्हणून ढोल बडवणारे. समाजाचे प्रश्न त्यांच्या समोर मांडत नाहीत. काही जन तर समाज संघटीत करून मोदी प्रेम बेंबीच्या देठा पासून व्यक्त करतात. आणी अंधारात आपली कामे करून घेतात. या बद्दल लेखन करा. चिंचवड मध्ये दोन पुण्यात पाच असे न होता पुण्याचा एकच मेळावा घ्यावा या बाबत काही जेष्ठ मंडळी डिसेंबर मध्ये चार्चा करित होती. तेंव्हा पुणे परिसरात एकाच वेळी चार मेळावे होणार होते. तेंव्हा मी माझे मत मांडले वधुवर मेळावे ही संकल्पना पुणे यथे रूजली तीने मुळे पकडतानाच काही घटना घडत गेल्या. आणी त्या घटनांचा आजच्या काम करणार्या बांधवांचा थेट संबंध नसेल ही पण तीस वर्षा पासून ही आडवाट सुरू झाली ती इतकी रूंदावत गेली की आज ती आवाक्या बाहेर गेली तरी या आडवाटेला आदर्श देण्याचे काम तेली गल्ली मासिकाने केले. त्यामुळे काम करणारी मंडळी काही बाबत समन्वय साधू लागली. आता पुढचा पल्ला गाठावयाचा आहे. पण ही कर्ती मंडळी एकत्र येऊन राबली आसती तर पुणे हे महाराष्ट्राचे केंद्र ठरले आसते. ही जाणीव हजारो बांधव स्पष्ट मांडतात. आता अत्मचिंतनाची गरज आहे. समन्वयाची अवश्यकता आहे. गट, तट, भेद, शहरी, ग्रामीण व मी पणा व कुणाच्या तरी नजरेत राहून वाटचाल करणे वृत्ती सोडली पाहिजे. तरच भविष्यकाळ ठिक असेल. कारण आसे मेळावे भरू लागताच काही भावंडांनी सांगीतले तुम्ही लिहा त्यांच्या बद्दल आमच्या विरोधात लिहू नका. त्यांचा फॉर्म छापणार असाल तर आमचा फुकट ही छापू नका. आमच्या मेळाव्यात त्यांचे फॉर्म वाटू नका. ही माणसीकता समाजाला कुठे घेऊन जात आहे. याचा विचार सुज्ञ कधी करणार. एकमेकांची जिरवण्यासाठी काही दिवसात लगेच मेळावा तो सुद्धा एक नव्हे तर तीन चार ही इर्षा समाज संघटीत करण्याची की विघटणाची जे प्रश्न एकत्र बसून मिटू शकतात तेच प्रश्न संघर्षात उग्र होतात.