प्रबोधन रचना शुन्य तर वधु वर मेळाव्यांचे सुगीचे दिवस (भाग 4)
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
ही मंडळी यात का नाहीत.
सहा महिण्या पुर्वी उत्तर प्रदेशात तेली समाजाच्या दोन भगीनी यांच्यावर बलात्कार करून वडील आई सह सर्वांचा खुन झाला. या विषयी कोण ही बोलले नाही. दोंडाई येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खुन झाला. याला सामुदाईक उत्तर संघटीत पणे मिळाले का ? काहीनी तहसिलदारांना निवेदन देऊन सोशल मिडायावर फोटो पाठवले. या पुढे काय हा विचार फार कमी मंडळींनी केला. आशा सामाजीक प्रश्ना बाबत अज्ञान शाासन समाजाला, सामाजिक, राजकीय, अर्थीक बाबत डावलत आहे. त्या विषयी सर्वत्र अंधार आहे. सामाजीक, सांस्कृतीक अतिक्रमण होत आहे. त्याबाबत डोळस पणा नाही या पेक्षाही एक बाब नमूद करतो पुण्या सारख्या शहरात 18 ते 19 नगर सेवक बोगस ओबीसी आहेत. या बाबत आपण कोणता कृती कार्यक्रम राबवला. उलट गतवर्षी आशा बोगसांना छुपा पाठिंबा देणारे अंधारात वावरणारे काही होते हे त्यांचे समाज प्रेम विसरता येत नाही. हे सर्व सत्य जवळ ठेऊन त्या ब्राम्हणयशाहीच्या विरोधात श्री. संत संताजी लढले ती धमक पुणे ग्रामीण व शहरात निर्माण होऊन तेली समाज हा उद्याचा शिल्पकार बनला पाहिजे ही तेली गल्ली मासिकाची अंधार पसरलल्या रात्रीमधील काजव्याची भुमीका.
जय संताजी