मा. जयदत्तजी क्षीरसागर

डॉ. सुधाकर चौधरी राहुरी जि. अहमदनगर 

 

    मा. जयदत्तजी क्षीरसागर आपली अखिल भारतीय तैलिक साहू महासभा अध्यक्षपदी निर्विवाद एकमताने निवड, कॅबिनेट मंत्री बांधकाम (उपक्रम) पदी नियुक्ती, बहुमताने आमदार म्हणून निवड तसेच दि.7 डिसेंबर आपल्या वाढदिवसानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा! हार्दिक अभिनंदन !! 

    साहबजी, आप जियो हजारो साल और सालके दिन हो पचास हजार ये हमारी शुभ कामना आपके साथ है । 

jaydatta kshirsagar teli mahasabha president     समाज बंधु भगिनींनो नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणूकीचे निकाल पाहू जाता इतर मागासवर्गीय प्रवर्गात माळी समाजाचे  6 उमेदवार , धनगर समाजाचे 6 उमेदवार तर तेली समाजाचे 5 उमेदवार यांना आमदारकी मिळाली यावरुन असे दिसून येते की, तेली समाज हा तीन नंबरवर आहे. माळी व धनगर समाजाबरोबर सर्व ओबीसी जातीत तेली समाज हा जागृत समाज म्हणून मिडीयाने नोंद घेतली याची आपण नोंद घ्यावी व त्या दृष्टीने पुढील समाजकारण ठरवावे. मागचा महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास पाहु जात अपवाद वगळता कुणबी किंवा मराठा समाजालाच मुख्यमंत्रीपद मिळाले. 52 टक्के असलेल्या ओबीसीला सध्यातरी उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागत आहे. त्यासाठी भुजबळ नीती, कार्यशैली वापरावी व आपल्या समाजाचे विधानसभेवर जास्त प्रतिनिधी क से निवडून येतील. त्या योगे उपमुख्यमंत्रीपदी गृहखते, अर्थ खाते अशी महत्वाचे खाते पदी अण्णांची वर्णी लागावी अशी साहेबांना वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा देऊ या. 

          पुणे येथे 21 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय तैलिक साहू महासभा यांच्या वतिने राष्ट्रीय संमेलन झाले. अध्यक्षपदावरुन आपण उपस्थितीत सर्व समाज बांधवांना अमोल मार्गदर्शन केले. केलेल्या कामाची पावती व भविष्यातील कार्याची रुपरेषा सांगितली. सर्व सामान्य समाज बांधवापर्यंत संमेलनाची ही बातमी पोहचलीच नाही याची खंत वाटते म्हणून आपण हिंदीत केलेल्या भाषणाचा गोषवारा, मराठी अनुवाद सर्व समाज बांधवांसाठी पुढे देण्याचा प्रयत्न करीत आहे.

1. अखिल भारतीय तैलिक साहू महासभा अध्यक्षपदी अण्णांची तीन वर्षाच्या कालावधीसाठी सर्वानुमते निवड झाली. 2. जालना येथे मागचे वेळेस झालेली अध्यक्षांची निवड ही लोकशाही पद्धतीने झाली नव्हते असे काही लोकांचे म्हणणे असल्याचे त्यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. 3. पण ह्या वेळेस त्यांची सर्वानुमते तीन वर्षासाठी अध्यक्षपदावर नेमणूक केल्याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिलेत. 4. प्रत्येक राज्यात तेली समाज वेगवेगळ्या नावाने परिचित आहे तो साहू समाज म्हणून एका छत्राखाली आणणे गरजेचे आहे. 5. माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांचे टपाल तिकीट सर्वाचे सांघीक प्रयत्नाने प्रसिद्ध झाले. 6. आता आपण संत माँ कर्माबाईचे तिकीट प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याला लवकरच यश येईल. 7. महाराष्ट्रात तेली समाज ओबीसी मध्ये येतो. प्रथम स्केड्यूल मध्ये एससी समाविष्ट आहेत. द्वितीय स्केड्यूल भध्ये एस टी यांचा समावेश आहे. आपण इतर समाजातील काही जाती व तेली हे तृतीय स्केड्यूल मध्ये, टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले हे कार्य अवघड आहे. त्यासाठी संसदेत बहुमताने अमेंडमेंट पास करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यातून सांघिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. 8. समाजातील हुंडा पद्धती सारख्या अनिष्ट चालीरिती बंद करणे त्यासाठी सामाजिक संघटन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. 9. छत्तीसगढ, मध्यप्रदेश, दक्षिण भारतीय राज्यातील तसेच बहुतेक राज्यात वधुवर संशोधन मेळावे घेतले जात आहेत. 10. देश पातळीवर शादी डॉट कॉम ही वेबसाईट तेली समाजातील वधु-वर मुला-मुलींसाठी सुरु करण्यात येईल. सर्व इच्छुक वधु वर त्यामध्ये आपली माहिती नोंदवू शकतील. 11. शैक्षणिक सुविधा-सध्या प्रचलीत असलेल्या परंपारिक वाणिज्य, कला शास्त्र विषयाचे महत्व न राहिल्यामुळे तेली समाजातील मुलांना भविष्य काळातील टेटक्नीकल (तांत्रिक), बॉयोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी ह्यास सारख्या विद्या शाखेच्या सुविधा निर्माण करुन देण्याचा प्रयत्न राहिल. ज्या विद्या शाखांची विषयांची मागणी वाढती असेल त्या शैक्षणिक सुविधा आपल्या पाल्यांना आपण देण्यासाठी प्रयत्न करु. 12. यासाठी शिक्षण, तंत्रज्ञान, आरक्षण यांचे ज्ञान असणान्या जाणकार समाज बांधवांनी एकत्र येवून कृतीगट किंवा अभ्यासगट तयार करावा, असा गट ह्या कामी आपल्याला मार्गदर्शन करेल. 13. तामिळनाडू, चेन्नई या ठिकाणी तेली समाज वाणियार या नावाने ओळखला जातो त्याचे प्रमाण 8.3 टक्के आहे. ह्या समाजाला मुख्यमंत्री करुणानिधी सारख्या इतर नेत्यांच्या मदतीने मोस्ट बॅकवर्ड (अती मागासवर्ग) क्लासमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु. 14. अधिकारी वर्ग निवड करणे, त्यांचे संघटन करणे, जुनया बुजूर्ग जाणकार समाज बांधवांनी ह्या कामी सहकार्य व मार्गदर्शन करावे. 15. खेड्या पाड्यात दुरवर पसरलेल्या समाज बांधवांच्या समस्या निवारण करणे. 16. दिल्ली येथे कै.केशरकाकू क्षीरसागर यांनी लोकवर्गणीतून समाज मंदीर उभारले आहे. त्या धर्तीवर मुंबईमध्ये तसेच इतर राज्याच्या राजधानीचे ठिकाणी व शहरामध्ये समाज मंदिर उभारणे त्यासाठी अथक प्रयत्न करणे. 17. आगामी काळात सर्व समाज बांधवांना एकत्रित काम करण्याचे आपण उपस्थित समाज पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींना आश्वासन देत आहे. 18. समाज संघटीत करण्यासाठी आपण दुर्गम भागात लोकापर्यंत जाऊ त्याठिकाणी तेली साहू समाज या एकाच छत्राखाली सर्व तेली उपजाती संघटीत करण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.19. शेवटी मंजील उसी को मिलती है, जिनके सपनों मे जान होती है । पंखोसे कुछ नही होता, हौसलोसे उडान होती है। अशी शेरशोपरी त्यांनी उपस्थितांना ऐकवून सर्वांची इच्छाशक्ती जागृत केली. सर्वांना कार्यास प्रेरणा दिली व पुन:च्छ एकदा त्यांचेवर अध्यक्षपदाची जबाबदारी टाकल्याबद्दल, त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवल्याबद्दल सर्व उपस्थित तेली महासभेचे पदाधिकारी तसेच पुणे प्रांत अध्यक्ष रामदास धोत्रे व त्यांचे इतर सहकारी यांचे आभार मानले.

    आपल्या हिंदी भाषणातून अण्णांनी दिशादर्शक मार्गदर्शन व भविष्यातील संभाव्य कार्यक्रमाचे नियोजन समाज बांधवासमोर सांगितले. परंतु पुढील बाबींवर लक्ष केंद्रीय करण्याची गरज आहे व आपणाकडून समाजाचे मंत्री म्हणून निश्चिक्च समाजाची गती, सर्वांगिण विकास होण्यासाठी प्रयत्नांची अपेक्षा आहे.

    समाजातील गटबाजी-खेड्या पाड्यातून गटबाजीचे निवारण करुन, तंटामुक्त समाज़ निर्माण करुन तालुका शहर पातळीवर समाज संघटत व्हावा. उच्च पदस्थ अधिकारी, सुशिक्षित अशिक्षित, व्यावसायिक, उपरे अशा कोणत्याही प्रकारच्या विचारांना थारा न देता एक संघ समाज निर्माण व्हावा त्याचेच प्रत्येक तालुक्यातून समाज पुढारी निर्माण व्हावा जेणे करुन समाजातील जास्तीत जास्त आमदार, खासदार, नेते, कार्यकर्ते, नगरसेवक, सरपंच हे पुढे येतील. शिस्त, जरब - समाजमाता कै.केशरकाकू यांनी समाजाचे नेतृत्व करुन शिस्तप्रिय समाजनिर्माण होण्यासाठी प्रयत्न के ले त. तशीच अपेक्षा आपणाकडून जागरुक समाज, प्रगतीशील समाज होण्यासाठी अपेक्षित आहे त्यासाठी प्रशासनावर जरब असावी.

* खुल्या विचारांची देवाण घेवाण -दुर्गम भागातील, तळागाळातील गरीब समाज बांधवांचे समस्यांचे निराकरण होणे यासाठी प्रयत्न त्यासाठी प्रयत्न त्यातूनच आपले पणाचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण होईल व भुजबळांसारखे तेली समाजाचे नेतृत्वाबरोबरच अखिल भारतीय ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे. सर्व ओबीसी समाज एकसंघ आपल्या पाठिशी रहाण्यासाठी इतर मागासवर्गीय इतर जातीतील लोकांना सुद्धा त्यांच्या गरजा सोडवून आपलेसे करावे.

    * संघटना दबावतंत्र- संघटनेच्यास कृतीशील दबाव तंत्रातून इतर समाजावर दबाव येवून समाजातील घटनांची नोंदी घेतली जातात. त्या योगे राजकीय, शैक्षणिक, सामाजिक , सुखसोई तळागाळातील सर्वसामान्य समाज बांधवांपर्यंत येतील. * समाज उपयोगी सर्व धर्म कार्य-आरोग्य, शिक्षण बेरोजगार, निवारा ह्या सर्व धर्मीय जात बंधुच्या गरजा सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणे त्यामुळे सर्व जातीचे नेतृत्व करण्याची संधी मिळून सर्व धर्म समाजप्रिय नेतृत्व मिळून तेली समाज पुढारी बरोबरच इतर समाज पुढारी म्हणून नावलौकिक होईल. वर्षान वर्ष तेली समाज शोषित समाज म्हणून ओळखला गेला म्हणून भारत सरकार आणि बिहार सरकारने तेली जातीला स्केड्युल 2 मध्ये टाकले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत समाजाला म्हटले आहे की सुशिक्षित व्हा, संघटीत व्हा आणि आपल्या न्याय्य हक्कासाठी संघर्ष करा साहेब आपण आमचे पेक्षा ज्ञानी आहात, जाणते आहात, इंजिनिअर, संस्थाचालक, आमदार, अ.भा.तैलीक साहू समाज अध्यक्ष, संस्थापक, ज्ञानोपासक कृतीशील विचारवंत आहात आपल्या नावात जय आहे. जय बरोबर दत्त आहेत. भविष्यकाळ आपणालाच आहे. आपल्या पंखाखाली समाज ऐक्याचे बळ वाढो, बलशाली जागृत सुशिक्षित समाज घडो हीच परमेश्वर चरणी आपले वाढदिवसाचे निमित्त साधून आपणास भावी यशस्वी वाटचालीस सर्व तेली समाज बांधवांमार्फत शुभेच्छा व सदिच्छा !

दिनांक 01-06-2018 22:36:50
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in