तहसीलदार नामदेव टिळेकर यांना दिले निवेदन
जामनेर : गोंदेगाव (ता-सोयगाव, जि- औरंगाबाद) येथील अल्पवयिन मुलीवर (वय १३ वर्ष ८ महीने) मानवतेला काळिमा फासून २३ वर्षीय तरुणाने मानसिक व शारीरिक अत्याचार करीत तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नराधमाला फाशीची शिक्षा देऊन पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अश्या मागणीसाठी जामनेरात मूक मोर्चा काढून तहसीलदार नामदेव टिळेकर यांना तेली समाज बांधवांनकडून निवेदन देण्यात आले.
या मोर्चाला तेली समाजाचे युवा नेतृत्व धिरज अनिल भाऊ चौधरी भुसावळचे जनाधार पार्टीचे नगरसेवक र्दुगेश भाऊ ठाकूर नगरपरिषद जामनेर चे सर्व नगरसेवक यांच्या सह सर्व समाज बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती नगरपालिका चौक जामनेर येथे श्रद्धांजली कार्यक्रम पार पडून नंतर यावेळी तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मूक मोर्चामध्ये जामनेर तालुक्यातील सर्व समाज बांधव, शाळकरी मुली व महिलांचा समावेश होता. यावेळी भुसावळचे नगरसेवक दुर्गेश ठाकर, धिरज चौधरी, जामनेरचे नगरसेवक महेंद्र बाविस्कर, जितेंद्र पाटील, बाबूराव हिवराळे, नवलसिंग पाटील, आतिष झाल्टे ,कैलास नरवाडे, संदीप सारतळे, राजू अजमरे, रामन चौधरी, नामदेव तेली, शंकर राजपूत, प्रल्हाद बोरसे, मयूर चौधरी, डॉ.योगेश सरताडे, राजू तेली,प्रकाश तेली, सोपान चौधरी, मोहन चौधरी आदिंसह तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.