१) भारतीय इतिहास सुरूचहोतो तेल्यापासून- प्राचीन भारतीय पहिला सम्राट चंद्रगुप्त मौर्य हा तेली होता. २) तेली म्हणजे तेल काढून विकणारे,हा एक संकुचित अर्थ आहे. उलट तेली लोकांनी बियांपासून जो रस काढून उपयोगात आणला, त्याला तेल हे नाव मिळाले. ३)तेली हा शब्द त्रिलिंगीशब्दापासून तैलिंगी - तैलिक -तैली -तेली असा उत्क्रांत झाला आहे.ज्याचा अर्थ - तीन चिन्हे किंवा वर्णातील असा होतो. म्हणजे तेली क्षत्रिय, ब्राह्मण व वैश्य या तीन ही वर्णात होते. ४) शाक्यमुनी म्हटले गेलेले तथागत गौतम बुद्ध सुद्धा तेली होते, त्यामुळे तेली सम्राटांनी बौद्ध धर्माचा स्वीकार, प्रचार व प्रसार केला. ४) जगप्रसिद्ध सम्राट अशोक हा गुप्त होता. गुप्त हे घराणे नाही तर तेली लोकांनी वापरायची पदवी आहे. ५) गुप्त प्रमाणेच साहू (मूळ शब्द साधू),भूती,वर्धन, प्रसाद,पाल, आप्पा ई. तेल्यांच्या पदव्या आहेत. ६) दुसरा चंद्रगुप्त म्हणजेच विक्रमादित्य हा तर आशिया, आफ्रिका व युरोपीय खंडात दंतकथा ठरलेला सम्राट होय. ७) गुप्त राजे तेली होते, याबद्दल पटना गँझिटियर मध्ये मेसर्स ओ मेले व जेम्स या ब्रिटिश संशोधकांनी - ते प्राचीन तैलधाका किंवा तैलडहाका वंशाचे होते, असे लिहून ठेवले आहे. ८) महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी ही तेली कन्या आहे व आजही बुरानगर येथील भगत कुटुंबातील तेली हे तीला मुलगी मानतात. ९) तेली समाजातील प्रत्येक पोटजातीत शिव हेच प्रधान दैवत आहे.म्हणजे पूर्वी हे सर्व तैलिंगी शिवलिंग पूजक होते. १०) शनी या देवाला तेली मानले जाते. हा यमाचा मोठा भाऊ आहे, म्हणजे यम व या दोघांचाही पिता सूर्य हे तेली आहेत.आजही तेल्यात सूर्य किंवा सूर्यवंशी तेली आहेत. ११) यम ही अतिप्राचीन देवता असून ऋग्वेदातील महत्त्वाच्या देवतांमध्ये त्याचा पर्यायाने तेल्यांचा समावेश होतो. १२) भारतीय इतिहासातील मौर्य, गुप्त, वर्धन,भूती,नंदी,पाल, सोलंकी,मौखरी, चालुक्य, कलचुरी,वर्मन,चोळ, राष्ट्रकूट ई.राजघराणी तेली आहेत. १३)इ.स.च्या १६व्या शतकापर्यंत तेली राजे होते. हेमचंद्रशहा विक्रमादित्य उर्फ हेमू - ज्याचा अकबर नावाच्या परकिय आक्रमकाने शिरच्छेद केला,शेवटचा तेली सम्राट होय.