२९ ऑक्टोबर अमरावती-अमरावती जिल्हा तैलिक समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी संताजी विकास पॅनलने १२ पैकी १२ जागा जिंकून एकतर्फी विजय संपादन केला.या निवडणुकीमध्ये मोठ्या दमाने उतरलेल्या जय संताजी पॅनल ला पराभवाचा सामना करावा लागला. अमरावती जिल्हा तैलिक समितीच्या बारा संचालक पदासाठी रविवारी निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये सत्ताधारी संताजी विकास पॅनल व त्यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या जय संताजी पॅनल मध्ये तुल्यबळ लढत झाली एकूण १०८२ मतदारापैकी ८२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावली. दुपारी चार वाजता मतदान संपल्यानंतर मतमोजणीस प्रारंभ झाला मतमोजणीच्या सुरुवातीपासून सत्ताधारी संताजी विकास पॅनलच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली होती. ती आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत संताजी विकास पॅनलचे बाराही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले तर विरोधात असलेल्या जय संताजी पॅनल ला पराभवाचा सामना करावा लागला. रात्री नऊ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. विजवे यांनी निकाल जाहीर केल्यानंतर उपस्थित समाज बांधवांनी व सत्ताधारी संताजी विकास पॅनलच्या समर्थकांनी जय संताजी चा गजर करीत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
विजयाचे श्रेय सर्व समाज बांधवांना.
गेल्या पाच वर्षात आम्ही केलेल्या कामाची पावतो समाज बांधवांनी देत आम्हाला विजयी करीत पुन्हा काम करण्याची संधी दिली आहे समाज बांधवांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवीत सवांना सोबत घेऊन पुढील पाच वर्षात चांगले काम करून दाखविणार असून या विजयाचे श्रेय सर्व समाज बांधवांना असल्याची प्रतिक्रिया संताजी विकास पॅनलचे प्रा.संजय असोले यांनी दिली.