खालील लेखामध्ये तेली गल्लीचे संपादक श्री. मोहन देशमाने यांच्या मागील महिण्याच्या म्हणजे जुलै 2016 च्या अंकातीलकाही भाग व इतर मुद्दे यामध्ये घेतले असुन समाजाने खरे तर याच मुद्यावर चिंतन करणे गरजेचे आहे. हा लेख म्हणजे सध्याची खरी वस्तुस्थिती आहे. समाजाची वाटचाल कोठे व कशी चालली आहे याचे ज्वलंत उदाहरण मोहनराव देशमाने यांनी त्यांच्याच शब्दात प्रखरपणे मांडले आहे. एक प्रकारची समाजजागृतीच त्यांनी आपल्या लेखणीद्वारे केली आहे.
आणि ती पुन्हा थोड्याशा वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि ती सत्य परिस्थिती आहे.
पहिली गोष्ट म्हणजे राजकारणातला ठसा कोठे समाजाने स्वत:च्या ताकदीवर मिळविला आहे. त्यासाठी आपण कोणाच्या कुबड्या वापरल्या नाहीत पक्षापेक्षा समाज मोठा मानुन अनेक पक्षाचे कार्यकर्ते पुर्वीपासुनच समाज संघटनेत कार्यरत होते. सर्वच राजकीय पक्षांनी समाजाचा फक्त कामापुरताच वापर केला. समाजाला डोके वर काढायला संधीच दिली नाही. हे वास्तव आहे आणि ते कोणालाही नाकारता येत नाही किंवा येणार नाही नुसती भाषणबाजी करूण परिवर्तन होत नसते. तर परिवर्तन होत असते ते समाजाला त्याच्या हक्कासाठी मिळणार्या सवलतीसाठी शासनापर्यंंत घेवुन जाणे वैयक्तीक फायद्याचा विचार न करता त्यांच्या प्रश्नांची सोडवणुक करणे.
पक्षीय विचारांपेक्षा समाज विचार हा मोठा होता. परंतु आज आपली काय परिस्थिती आहे. जो पक्ष सत्तेवर आह त्याच्याच मागे आपण फिरत आहोत. ठिक आहे सत्ताधारी पक्ष आहेपण आपण समाजासाठी काहीतरी मागीतले पाहिजे. काहीतरी समाजाला मिळवुन दिले पाहिजे. उदाहरार्थ भाजपाने विदर्भात जी आघाडी घेतली त्याला तेली समाज हाच महत्त्वाचा आहे कारण तेथे आपला समाज फार मोठ्या प्रमाणात आहे. एक खासदार आणि चार आमदार या भागातुन आपल्या समाजाच्या मतावर निवडुन गेले भाजपाच्या पायावर समाज ठेवण्यापुर्वी दबाव गट निर्माण केला असता तर निश्चितच संख्याबळ वाढले असते हे सांगायलांच नको. लोकसंख्येने अल्प असणार्या ब्राह्मण समाजाची लोकसंख्या साडेतीन टक्के आहे. त्यांचे तेरा आमदार व दहा मंत्री आहेत. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या मतदार संघात आहेत तेथे तेली समाजाचे मतदान 30 ते 35 टक्के आहे. म्हणजेच तेली समाजाच्या मतांवर ते निवडुन गेलेत. आणि तेली आमदारांवरच ते मुख्यमंत्री झालेत. हे सत्य नाकरता येणार नाही. ना. बावनकुळे साहेब त्यांच्या अगदी जवळचे म्हणुन त्यांना फक्त त्यांनाच मंत्रीपद दिले आहे. या पेक्षा समाजासाठी वेगळे काय केले. काही पुढारी काही उद्योजक काही संघटनेतील नेते मंडळींनी आपआपली वैयक्ीक कामे करूण घेतली असतील हे आपण मान्य करू परंतु मुळ प्रश्न असा कि मा. देवेद्र फडणविसांनी समाजासाठी काय केले ? सामाजाचा साधा एकतरी प्रश्न समजावुन घेतला का ? प्रश्न सोडवणे दुरच विदर्भात कुणबी समाजाच्या वेगवेगळ्या पोट शाखा आहेत. त्या खर्या ओबीसी विषयी समाजाच्या वेगवेगळ्या पोट शाखा आहेत. त्या खर्या ओबीसी विषयी आपले काही दुमत नाही. परंतु कॉग्रेसच्या राजवटीत मराठा - कुणबी विशेषत: विदर्भ सोडुन झालेत त ती मंडळी म्हणजे गावचा पाटील आणि देशमुख मंडळी आहेत. यांच्या टाचे खाली समाज भरडतोय हि खरी वस्तुस्थीती आहे. यांनी राजकीय जागा बळकावल्या आहेत शैक्षणिक जागाही सोडल्या नाहीत, शासकीय नोकर्या मिळविल्या आहेत, ओबीसी सवलती पळविल्या आहेत. या बाबतीत मात्र कोणीच काही बोलत नाही. मुख्यमंत्री तर म्हणताच की तेली समाज माझा आहे. आपल्या समाजाला त्यांनी तर गृहीतच धरण ठेवले आहे. त्यामध्ये वावगेही काहीच नाही. कारण आपल्या समाजातील काही नेत्यांनी तेली समाज हा भाजपाच्या पायावर नेहूण ठेवला आहे. त्यांच्या वळचळणीला बांधला आहे. हे त्रिवार सत्य आहे. आणि प्रत्येक समाज बांधवांना हाच प्रश्न भेडसावत आहे की हे सर्व काय चालले आहे. याला जबाबदार कोण ? कोण आहे आपला वाली कोण आहे खरा समाजसेवक कोण करतयं हे सर्व.......
साडेतिन टक्के ब्राह्मण समाजाचे 13 आमदार व 10 मंत्री आहेत 16 % मराठा समाजाचे आजसुद्धा 50 % पेक्षा जास्त आमदार व मंत्री आहेत. आणि 13 % तेली समाजाचे काय ? ह्या प्रश्नाचे उत्तर कोणी देवु शकेल काय ? यासाठी विकासाच्या चाव्या आपल्या हाथी असणे गरजेचे आहे.
संताजी उत्सव, खानेसुमारी, वधु-वर मेळावे विद्यार्थी गुणगौरव एवढ्यांच मर्यादित कार्यासाठी संघटन नको आहे. तर समाजाला अशी बरेच कामे आहे की ज्यामुळे समाज जागृत होऊ शकतो., गोरगरीबांना मदत मिळु शकते याचीही दखल आपण घेतली पाहिजे. समाजातील घटस्फोटांचे प्रमाण कमी केले पाहिजे, दोन्ही कुटुंबाचा समेट घडवुन आणला पाहिजे. फक्त खिशात पैसा आणि फिरयला चार चाकी गाडी हे महत्वाचे नाही तर डोक्यात सामाजिक प्रश्न असणे फार महत्वाचे आहे. आपल्या हातुन समाजाचे संघटन झाले पाहिजे !
कोणत्याही समाजाचे प्रगतीचे लक्षण काय ? सत्ता संपत्ती हे तर आहेतच पण ही तर झाडावरची फळे आहेत. ही कायम पुढच्या अनेक पिढ्यांना मिळत रहावी यासाठी समाजाच्या वृक्ष कायम वाढत राहिला पाहिजे व बहरत राहिला पाहिजे त्यासाठी या झाडाची पाळेमुळे खोलवर व दुरवर पसरली पाहिजे झाडाला कोणते खाद्य पुरविलूे म्हणजे ते साध्य होईल याचा आपण विचार करायला हवा ! त्यावेळेस कोठे आपला समाज प्रगती पथावर जाईन हेच खरे.
वरील लेखावर समाजाने चिंतन करणे फार गरजेचे आहे. त्याचया शिवाय परिवर्तन आणि बदल होणार नाही कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे. आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे !
वरील सर्व मुद्दे समाज बांधवांनी विचार करण्याजागे आहेत.
धन्यवाद ! जय संताजी !! जय महाराष्ट्र !!!
श्री. रमेश सदाशिव भोज
विश्वस्त :- तेली समाज पुणे
अध्यक्ष :- ओबीसी सेवा संघ
संस्थापक अध्यक्ष :- संताजी ब्रिगेड महाराष्ट्र
संघटक :- श्री संताजी प्रतिष्ठाण कोथरूड
कार्यकारीणी सदस्य :- श्री. संताजी जगनाडे महाराज संस्था, सुदुंबरे