संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत संताजी जगनाडे महाराज या पालख्यांचे स्वागत संताजी ब्रिगेड व जयभवानी टेक्नीकल इंस्टीट्युटच्या वतीने करण्यात आले. येणार्या सर्व वारकरी बंधु आणी भगनींना ४००० बिस्कीट पुड्यांच वाटप करण्यात आले. संस्थेचे पुणे शहर अधयक्ष श्री. संतोषशेठ व्हावळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. पुणे शहरात अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम हि संस्था राबवी असुन गरीब महिलांना मोफत साडी वाटप, मोफत शिलाई मशिन, मुलांचा गुणगौरव, जेष्ठ समाज बांधवांचा सत्कार अरोग्य शिबीर मोफत शालेय साहित्य वाटप चष्मे वाटप असे अनेक प्रकारचे सामाजीक कार्य श्री. संताजी ब्रिगेड पुणे शहर आणि जय भवानी टेक्नीकल इंस्टीट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने राबीवले जातात.
या प्रसंगी संताजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्री. रमेश भोज व जयभवानी टेक्नीकलच्या संस्थापक अध्यक्षा सौ. राधिका मखामले, ब्रिगेडचे महाराष्ट्राचे महासचिव दिलीपराव शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष प्रितम केदारी प्रसिद्धीप्रमुख सुर्यकांत बारमुख, पुणे शहर अध्यक्ष संतोषजी व्हावळ, उपाध्यक्ष महेशजी अंबीके , विजयराव भोज कॉग्रेस पुणे शहर सचिव कल्पना उनवणे नितीन गोमन, संजय दुबे, वनराज व्हावळ, स्वप्नील भोज, आर्यन उनवणे, ईश्वरी वखारीया, वैष्णवी व्हावळ,, ऋतुजा उनवणे, संताजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष विजयरावजी रतनपारखी, महेंद्र शेलार आणि अनेक कार्यकर्ते हजर होते.