उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाज सेवाभावी संघ शाखा कळंब च्या वतीने आज कळंब शहरात संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी समाजाचे जिल्हाअध्यक्ष रवि कोरे आळणीकर,जेष्ठ मार्गदर्शक तथा माजी जि प सदस्य कोंडाप्पा कोरे ,जिल्हा कोषाध्यक्ष महादेव मेंगले,उस्मानाबाद तालुकाध्यक्ष दत्ताञय बेगमपुरे,सुर्यकांत चौधरी आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले . याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष रवि कोरे यांनी संताजी जगनाडे महाराज यांचा महिमा सांगुन.प्रत्येक कुटुंबात संताची शिकवन रूजवा.जयंती साजरी करण्यामागचे उद्देश समाज बांधवांना सांगितले.अशा जयंती साजरी करण्याने समाज एकञित येऊन एकमेंकाचे विचार जुळतात.व समाजात चांगला संदेश जातो. कोंडाप्पा कोरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,संताचा संदेश व शिकवण समाजाच्या प्रत्येक कुटुंबा प्रयंत पोहचवा.समाज व्यवस्था संस्कृती समाज बांधवाना सांगा.तरूणांनी व्यसणापासुन दुर राहिले पाहिजे.संतानी जी ज्ञानाची शिदोरी करून ठेवली आहे ती समाजा प्रयंत पोहचवायची आज काळाची गरज आहे. यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मुकबधीर विद्यालय कळंब याठीकाणी मुख्याध्यापक बालाजी जाधवर यांच्या उपस्थितीत विद्यार्थींना खाऊ वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याकार्यक्रमास कळंब तालुकाध्यक्ष सचिन देशमाने,शहराध्यक्ष अशोक चिंचकर,सचिव दत्ताञ्य शेवडे,सहसचिव दादा चिंचकर,उत्तरेश्वर देशमाने,विजय देशमाने,बालाजी देशमाने,संदिप शेवते,अमोल गुरूसनाळे,राहुल चालक,आदिंच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे आभार बसवलिंग शेवते यांनी केले.