तेली समाज विकास मंच अकोला यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सर्व शाखीय तेली समाज उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार , २३ डिसेंबर रोजी करण्यात आले असून, सर्व शाखीय तेली समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन येथील तेली समाज विकास मंचचे कार्यकर्ते संतोष शेटे यांनी केले आहे. तेली समाज विकास मंच द्वारा समाजाच्या सर्वांगिण विकासाकरिता शैक्षणिक शिबिर, स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा, उद्योजक परिषद, महिला बचत गट व संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. तसेच दरवर्षी सर्व शाखीय तेली समाज उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन सुद्धा केल्या जाते. यावर्षी सुद्धा सर्व शाखीय तेली समाज उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार, २३ डिसेंबर रोजी अकोला येथील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे करण्यात आले असून, ज्यांचे उपवर - वधू परिचय मेळाव्यासाठी अर्ज द्यावयाचे राहिले असतील त्यांनी आपले अर्ज तेली समाज विकास मंचतर्फे आयोजित संकलन समितीकडे १० डिसेंबरपर्यन्त पाठवावे आणि या उप वर-वधू परिचय मेळाव्याकरिता सर्वशाखीय तेली समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.