२५ डिसेंबर नरखेड: संताजी मंदिर, नरखेड येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विधीवत पुजना, आरती व माल्यार्पण करून मान्यवरांचे हस्ते महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवी देवरावजी टेकाडे, विशेष अतिथी खासदार कृपाल तुमाने, मुख्याधिकारी शेखर गुल्हाने, डॉ.महेंद्र धावडे, जि.प.सभापती उकेश चव्हान तर प्रमुख अतिथी म्हणून भाजप तालुकाध्यक्ष श्यामराव बारई, काटोल पं.स.सभापती संदीप सरोदे, नरखेड पं.स.सभापती राजु हरणे, मनोज कोरडे, रविंद्र येनुरकर, गणेश चन्ने, साहेबराव वघाळे, भगवान गिरडकर, अशोक क्षिरसागर, बाबाराव वैद्य, संजय गुरमुळे, कृष्णा ठोंबरे, प्रशांत खुरसंगे, नगरसेवक सचिन चरडे, विजय क्षिरसागर, हरिकांत माळोदे, जितेंद्र कळंबे, तुकाराम रेवतकर, संजय कामडे, नरहरी बांदरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी संत जगनाडे महाराजांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन माजी नगराध्यक्ष संजय चरडे तर आभार प्रदर्शन सतीश टेकाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक राजेश क्षिरसागर, स्वप्नील बारई, मनोज कळंबे, रामदास बालपांडे, दीपक खोडे, उमेश कळंबे, शशी सरोदे, सुमित मेटांगळे यांनी सहकार्य केले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade