जालना : संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९५ वी जयंतीनिमित्त शहरात विविध उपक्रम साजरे करून त्यांची जयंती शनिवारी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विशेषत: महिलांनी उत्सफुर्त सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाच्या सुरूवातील संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मोदीखाना भागातील पंचायत वाडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात ४० जणांनी वदान केले. या कार्यक्रमानंतर दुपारी कन्हैयानगर येथील संताजी चौकातून दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महिला, युवक, युवती तसेच ज्येष्ठ व प्रतिष्ठित मान्यवरांनी सहभाग घेतला होता. या रॅलीचा समारोप भोकरदन नाका परिसरातील संताजी महाराज चौकात करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अशोक पांगारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सायंकाळी कन्हेयानगर परिसरातून संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची रथ यात्रेद्वारे शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी किसन जेठेकैलास लिधोरिये, राजू वसंते, राजेंद्र नरवये विश्वनाथ क्षीरसागर सुनील साखरे, ज्ञानेश्वर सोनुने, राजेंद्र वाघमारे विण वाघमारे विजय पांगारकर, विनोद सिनगारे आदींची उपस्थिती होती अभियंता संजय चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.