चला सुदुंबरे या उपक्रमामागची भूमिका । तेली समाज बांधवांनी एकत्रित यावे, आणि समाजाला एक उन्नत दिशा द्यावी, या उदान्त विचारांनी आदरणीय केशरकाकु क्षिरसागर यांनी पुढाकार घेवून महाराष्ट्राच्या राज्य पातळीवर महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा या नावाची संस्था स्थापन केली.
नागपुरच्या पातळीवर या संस्थेच्या कार्याची जबाबदारी युवा नेतृत्व म्हणून श्री. सुभाष घाटे यांच्याकडे सोपविण्यात आली. नागपूर युवा आघाडीच्या नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत श्री. सुभाष घाटे यांनी, त्यांच्या सहकार्याने समाज कार्य केले. त्यांच्या कार्याची समाजानेही दखल घेतली.... कार्य पूर्ण जोमाने सुरू असतांनाच काही घटनाक्रम असा बदलत गेला की कार्याचा वेग कमी होत गेला. श्री. सुभाष घाटे यांच्या मनात सतत ही खंत राहात गेली. कारण कोणतेही असू द्या, पण त्यामुळे समाज कार्य थांबले जावे, हे काही योग्य नाही. हे बोचरे शल्य सतत अस्वस्थ करू लागल्यामुळे आपण काही तरी केले पाहिजे या जाणीवा प्रखर होवू लागल्या. यातूनच संताजी नवयुवक मंडळ स्थापन करण्यात आले. समाजातील युवा शक्तीला सुभाष भाऊंचे विचार पटत गेले. अल्पवधीत संगठन वाढले. पहिल्याच कार्यक्रमात समाजातील गुणी लहान-मोठ्या लोकांना हेरून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला, नागपुरमध्ये पूर्वीच स्थापीत असलेल्या सर्व ख्यातनाम संस्थेच्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम खूपच चर्चेत राहिला. उत्तम आयोजन म्हणून सर्वांनी कौतुक केले. आज आम्ही स्त्रीयाही कोणत्याच क्षेत्रात कमी नाही याची जाणीव होवून संताजी नारी शक्ती मंडळ स्थापन झाले. मागील वर्षभरात या दोन्ही मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने गुणवंत विद्याथ्र्यांचा गुणगौरव, शिष्यवृत्ती तसेच शालेय सामुग्री, सायकल वाटप इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. संस्थेच्या या कार्याने सर्वांचे लक्ष्य वेधल्या गेले.
स्थानिक पातळीवर समाज जागृती करत समाज जोडण्याच्या कार्याला वेग आलेला असतानाच आपल्या तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या कार्याने जागृतीचे अंकुर फुलविले. पुण्याजवळील सदंबरे स्थित संत जगनाडे महाराजांच्या समाधी स्थळी 8 डिसेंबर 2018 रोजी जन्मोत्सवाचे आयोजन केल्या जावे ही संकल्पना समोर आली. श्री. नागेश चिंचकर (पंढरपूर), श्री. सुभाष घाटे, श्री. मंगेश सातपुते, श्रीमती विजयाताई भारोतकर, सौ. मंजुताई कारमोरे, भाष्कर लांजेवार, निलेश चांदेकर, श्रावण नागुलकर, निखिल भुते, पंकज सावरकर, राकेश ईखार, रूपेश कांबळे, गजू डफ, धर्मेंद्र कारमोरे, रूपेश बांगडे, विनोद बांगडे, मंगेश क्षीरसागर, राजू झाडे, पंकज वंजारी, राजु वंजारी व इतर सर्व युवा शक्ती व नारी शक्तीच्या सभासद यांनी मांडलेल्या प्रस्तावासह सर्वांनीच सम्मती दिली आणि एकमताने ठराव पास झाला, आणि मग सुरू झाली ऐतिहासिक क्षणांना जागविण्याचा कार्यक्रमाच्या आयोजनाची जय्यत तयारी.... मागील 4 महिन्यापासून श्री. सुभाष भाऊ आणि संताजी नवयुवक मंडळातील सर्व बांधवांनी या कार्याला अक्षरशः वाहन घेतले. संताजी नारी शक्ती मंडळातील स्त्रीयाही मागे राहिल्या नाही, सौ. मंजुताई कारेमोरे, विजयाताई मारोतकर यांच्यासह इतर भगीनीही कार्याला पुढे नऊ लागल्या. एकूणच नागपुर नगरीत सदुंबरेच्या श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या जन्मउत्सव कार्यक्रमाचे पडसाद वेगाने पडू लागले. श्री. सुभाष भाऊ तर समाज कार्याच्या निमित्ताने सतत भ्रमण करतात पण या कार्यक्रमाकरीताही मुद्दाम नागपुर सदुंबरे असा प्रवास करावा लागला. तो करतांना त्यांना श्री. अरुणभाऊ टिकले. अरुणभाऊ मोगरकर, रामेश्वरभाऊ बावणकर यांचे सतत सहकार्य राहिले. या नागपुरकर कार्यकत्र्याची उर्जा पाहन सदंबरे आणि परिसरातील समाज बांधव प्रभावित झाले. अनेक ज्येष्ठ व मान्यवर मंडळीकडून कौतुकाची थाप प्राप्त झाली. तुम्ही ! नागपूरसारख्या दूर शहरावरून कार्य करता आहात तेव्हा आम्हीपण काही सहकार्य केलेच पाहिजे अशी जाणीवा प्रबळ झाल्या व अनेक हात पुढे आले. सोशल मिडीया अर्थात फेसबुक आणि व्हॉटस्अॅप च्या माध्यमातून महाराष्ट्रच काय तर भारताच्या कानाकोर्यात व नेपाळ आणि भूतान मधील समाज बंधु भगिनी या कार्याशी जुळत आहे हे पाहून अतिशय आनंद वाटतो. आणि म्हणूनच सर्व समाज बंधु भगिनींना नम्रपणे विनंती करावीशी वाटते की, आपण कुठेही राहात असाल, तरी अंतर लांब आहे असे न म्हणता आपल्यातील अंतर कमी करत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या जन्मउत्सवाच्या जल्लोषात सहभागी होण्याकरीता दि. 8 डिसेंबर 2018 रोजी सदंबरे येथे यावे, आपली उपस्थिती नितांत प्रार्थनीय आहे ।
इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून जन्मउत्सवाची शोभा वाढवालच असा विश्वास वाटतो.
इतकं मोठं शिवधनुष्य तर उचललेच आहे ते पेलण्याची शक्ती श्री संत संताजी देतीलच अशी आशा वाटते.
श्री सुभाषभाऊ घाटे आणि त्यांची चमू गेली कित्येक महिन्यापासून याकरीता कार्य करीत आहे. यांच्या कार्याला यश प्राप्त होवून एक समाधान सर्वाना प्राप्त होईल अशी अपेक्षा करू या.... धन्यवाद!