अहमदनगर - तेली समाजातर्फे २ डिसेंबर रोजी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा झोपडी कैंटीन येथील माऊली सभागृहात होणार आहे, अशी माहिती संयोजक विजय काळे, प्रा. सोमनाथ बनसोडे यांनी दिली. तसेच जिल्हा तिळवण तेली समाजातर्फे अहमदनगर तेली वधू-वर डॉट कॉम ही वेबसाइट सुरू करण्यात आलेली आहे. संबंधितांनी या वेबसाईटवर नोंदणी करावी. नोंद करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर आहे. तरी जास्तीत जास्त विवाहेच्छूनी मेळाव्यातसहभाग घ्यावा, असे आवाहन विजय खंडागळे, विशाल पवार, भगवत लुटे, श्याम करपे, शांताराम काळे, ज्ञानेश्वर राऊत आदींनी केले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade